जळगावातील डाळ व्यापाऱ्याला लावला ३६ लाखाचा चुना, चौघांविरुध्द गुन्हा दाखल

सप्टेंबर 12, 2025 8:22 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । सध्या फसवणुकीचे प्रमाण प्रचंड वाढले असून नागरिकांना विविध प्रकारचे आमिष दाखवून लुबाडले जात आहे. अशात जळगाव एमआयडीसीमधील ‘सक्षम उद्योग’चे संचालकास दलाल आणि तीन व्यापाऱ्यांनी संगनमत करून ३६ लाख ३९ हजार रुपयांत आर्थिक फसवणूक केली. या प्रकरणी चौघांविरुध्द एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून एकाला पोलिसांनी अटक केली आहे.

fraud jpg webp

डाळ प्रक्रिया उद्योजक यांच्या विनोदकुमार जैन फिर्यादीनुसार, बालाजी ट्रेडिंगचा दलाल सूर्यकांत उर्फ राज संजय व्यास याने त्यांचा विश्वास संपादन केला. व्यासने जैन यांना किशोर ट्रेडर्स, आयुष ट्रेडर्स आणि विष्णुकांत पुरोहित ट्रेडर्स यांना मोठ्या प्रमाणात डाळ हवी असल्याचे सांगितले. दलालाच्या सांगण्यावरून जैन यांनी २८ जानेवारी २०२४ रोजी आयुष ट्रेडर्सला ४ लाख ३८ हजार ६० रुपयांची मूग डाळ पाठवली.

त्यानंतर १ फेब्रुवारी रोजी पुन्हा ६ लाख ८० हजारांचा माल पाठवला. सुरुवातीला आरोपींनी १० ते १२ दिवसांत पैसे देण्याचे आश्वासन दिले; मात्र दीपक व्यासने दिलेला चेक बाउंस झाल्याने फसवणुकीचा संशय बळावला. जैन यांनी दिलेल्या माहितीनुसार ३६ लाख ३९ हजार ६५० रुपयांचा माल देऊनही त्यांना आरोपींकडून मोबदला मिळाला नाही. जेव्हा त्यांनी आपल्या पैशांची मागणी केली तेव्हा आरोपींनी त्यांना ‘पैसे मिळणार नाहीत, जे होईल ते करून घे’ अशी धमकी दिली. त्यानंतर जैन यांनी बुधवारी पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपी किशोर मिठालाल पुरोहित याला अटक केली. पुढील तपास अशोक काळे हे करत आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now