जळगाव शहरराजकारण

गिरीश महाजनांच्या अडचणी वाढणार? जळगावमधून पुणे पोलिसांनी जप्त केले टेम्पो भरुन कागदपत्रे

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ११ जानेवारी २०२१ । जळगावातील मराठा विद्या प्रसारक संस्थेच्या वादाप्रकरणी कोथरूड पोलीस ठाण्यात गुन्हा आहे. या पार्श्वभूमीवर गेल्या दिवसापासून कोथरूड पोलीस जळगावात दाखल झाले असून त्यांनी अनेक ठिकाणी छापेमारी सुद्धा केली. या छापेमारीत पुणे पोलिसांच्या टीमने तब्बल एक टेम्पो भरुन कागदपत्रे जप्त केली असल्याची माहती समोर आली आहे. या प्रकरणात आता भाजप नेते गिरीश महाजन (Girish Mahajan) यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहेत.

पुणे पोलिसांच्या टीमने जळगावातून कागदपत्रे जप्त केली आहेत. संस्थेशी संबंधित कागदपत्र ही भोईटे आणि आणखी एक आरोपी तानाजी यांच्या घरी मिळून आली. ही कागदपत्रे संस्थेत असणं अपेक्षित होतं मात्र, भोईटे आणि आणखी एका व्यक्तीच्या घरात आढळून आली आहेत. या कागदपत्रांतून मोठे लीड मिळण्याची शक्यता असल्याची माहिती पुणे पोलिसांनी दिली आहे.

काय आहे प्रकरण?

मविप्र संस्थेच्या संचालकांचे राजीनामे घेऊन संस्था माजी मंत्री गिरीश महाजन यांच्या ताब्यात द्यावी यासाठी दबाव टाकून अॅड. विजय पाटील, महेश पाटील यांचे अपहरण करत त्यांना पुण्यातील एका फ्लॅटमध्ये डांबून ठेवत मारहाण केली. याप्रकरणी कोथरूड पोलिसात दाखल गुन्ह्याचा तपासासाठी पुणे पोलिसांचे पथक रविवारी जळगावात आले आहे.

पुणे पोलिसांचे पथक दोन दिवसांपूर्वी जळगावात दाखल झाले आणि त्यांनी अनेक ठिकाणी छापेमारी केली. पोलिसांच्या पथकाने भोईटे कुटुंबीयांसह इतर ठिकाणी झाडाझडती घेतली. महत्त्वाचे धागेदोरे व दस्तावेज पोलिसांकडून हस्तगत केले असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. गिरीश महाजन हे या प्रकरणातील मुख्य सूत्रधार असून गिरीश महाजन यांना मराठी विद्या प्रसारक संस्था हडप करत होते. मात्र त्यांना तसं न करता आल्याने त्यांनी आपल्याला त्रास दिल्याचा आरोप या प्रकरणातील फिर्यादी अ‍ॅडवोकेट विजय पाटील यांनी केला आहे.

पुण्यात संस्थेचे कागदपत्रे देण्याच्या बहाण्याने बोलावून घेतले. ते पुण्यात आल्यानंतर त्यांना शिवीगाळ करत दमदाटी करण्यास सुरुवात केली. तसंच त्यांना गाडीत जबरदस्तीने बसवत सदाशिव पेठेत असलेल्या एका फ्लॅटवर नेले. त्या ठिकाणी मारहाण करत गळ्याला आणि पोटाला चाकू लावला. फिर्यादी यांच्यासोबत असलेल्या दुसऱ्या एका व्यक्तीलाही त्यांनी याठिकाणी डांबल असल्याचा आरोप करण्यात आले होते.

खोटी तक्रार केल्याचा दावा
दरम्यान मराठा विद्या प्रसारक मंडळाच्या वतीने आपल्या विषयी खोटी तक्रार देवून दीड वर्षानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर तक्रारी खोटी असून या विरोधात आम्ही कायदेशीर लढा देत असल्याचे गिरीश महाजन यांनी काही दिवसांपूर्वी प्रतिक्रिया देताना म्हटले.

हे देखील वाचा :

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button