जळगाव लाईव्ह न्यूज । १५ जानेवारी २०२२ । जळगाव जिल्ह्यात कोरोना पुन्हा हातपाय पसरवू लागला आहे. जिल्हयातील बहुतांश तालुक्यांमध्ये कोरोनाची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याचे दिसून येतेय. दरम्यान, जिल्ह्यात कोरोना संसर्ग वाढत असतानाच आठवड्याभरात कोरोनाचा पहिला मृत्यूदेखील झाला आहे. कोरोना बाधिताचा मृतदेह हा घरी न नेता रुग्णालयातून सरळ स्म्शानभूमीत पाठवण्याचा नियम आहे. सध्या मृत्यू कमी असल्याने डेथ कमिटी याबाबत काम करत नसली तरी कुटुंबीयांनी मृतदेह ताब्यात घेतल्यानंतर तो घरी न नेता स्मशानभूमीतच न्यावा, अशा सूचना रुग्णालय प्रशासनातर्फे देण्यात आल्या आहे.
जिल्ह्यात कोरोनाच्या पहिल्या दोन लाटेवेळी जीएमसी हे कोविड रुग्णालय होते. त्यामुळे डेथ कमिटी नातेवाइकांची समजूत घालून त्यांना मृतदेह स्मशानभूमीत नेण्यासाठी मदत करत होती; मात्र आता जीएमसी हे नॉन कोविड आहे मात्र याठिकाणी एक आयसीयू हा कोरोना बाधितांसाठी अधिग्रहित केला आहे. त्यामुळे याठिकाणी कोरोनाचे गंभीर रुग्ण दाखल आहे. दरम्यान, मृत्यू झाल्यानंतर कोणत्याही नातेवाइकांनी मृतदेह घरी न नेता तो सरळ स्मशानभूमीतच न्यावा अशा सूचना नातेवाइकांना रुग्णालय प्रशासनाकडून दिल्या जात असतानाही नातेवाईक मृतदेह घरी नेत आहे. कोविडचा मृतदेह घरी नेल्यास संसर्गाचा धोका असल्याने नागरिकांनी नियमांचे पालन करण्याचे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन.एस. चव्हाण यांनी केले आहे.
कमिटीची केली स्थापना
वाढती रुग्णसंख्या पाहता व तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका ओळखून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात ६४ बेडचा सीटू वॉर्ड सज्ज करण्यात आला असून, हे सर्व बेड ऑक्सिजनचे आहे. त्यामुळे रुग्ण वाढल्यास अडचण निर्माण होणार नाही. यासोबतच दुसऱ्या लाटेप्रमाणे रुग्णालयात डेथ कमिटी व वॉररूमही स्थापन करण्यात आली असून, जीएमसी कोरोना बाधितांसाठी खुले झाल्यानंतर ही यंत्रणा काम करण्यास सुरुवात करणार असल्याची माहिती अधिष्ठाता डॉ.जयप्रकाश रामानंद यांनी दिली.
हे देखील वाचा :
- जळगाव जिल्ह्यात मविआला धोबीपछाड! सर्वच ११ जागांवर महायुतीचा विजय निश्चित
- महाराष्ट्रात पुन्हा महायुतीचं सरकार? मविआ सर्वात मोठा धक्का, आताची आकडेवारी वाचा
- LIVE : मतमोजणी सुरू : विधानसभा २०२४ निकाल
- धडधड वाढली! पोस्टल मतमोजणी सुरु
- या राशीच्या लोकांना शनिदेवांचा आशीर्वाद लाभणार ; वाचा शनिवारचे राशिभविष्य