जळगाव लाईव्ह न्यूज । ०७ मे २०२१ । कोरोनाच्या पार्श्वभुमीवर जमावबंदीचे आदेश असतांना धरणगाव तहसीलदारांविरुद्ध जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करणाऱ्या जिल्हा परिषद सदस्या माधूरी अत्तरदे यांच्यासह सहा जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुरूवारी रात्री उशीरा गुन्हा दाखल करण्यात आला.
सावळा- बांभोरी गटातून जिल्हा परिषद सदस्या म्हणून निवडून आलेल्या माधुरी अत्तरदे यांच्यासह बांभोरीचे माजी सरपंच राकेश नन्नवरे, कविता नन्नवरे, वर्षा झोपे, नयना चौधरी, सुनिता बोरोले यांनी धरणगावात असलेल्या समस्या घेवून नागरीकांना न्याय देण्यासाठी विविध मागण्यांसाठी तहसीलदार नितीन देवरे यांच्याविरोधात गुरूवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले. जिल्ह्यात कोरोनाच्या पार्श्वभुमीवर जमावबंदीचे आदेश असतांना तसेच साथरोग प्रतिबंध कायदा लागून असतांना देखील बेकायदेशीररित्या ७ मे रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करीत नियमांचे उल्लंघन केले.
याप्रकरणी जि.प. सदस्या माधूरी अत्तरदे यांच्यासह सहा जणांविरुद्ध कोरोनाचे नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात पोलीस विकास पहूरकर यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक जितेंद्र सुरवाडे करीत आहे.