मोठी बातमी : तत्कालीन सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांच्यासह जळगावातील दोघांविरुद्ध गुन्हा

जळगाव लाईव्ह न्यूज | १६ जानेवारी २०२३ | बीएचआर पतसंस्थेत मुख्य संशयीत असलेले सुनील झंवर यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांना गुन्ह्यात आणखी न अडकविता तसेच त्यांचा मुलगा सूरज झंवर याला गुन्ह्यात न अडकविता आणि मोक्का कायद्यात अडकवण्याची भीती दाखवून तिघांनी २ कोटी रुपयांची खंडणी मागितली होती. याप्रकरणी तत्कालीन सरकारी वकील प्रवीण चव्हाण, चाळीसगाव येथील उदय पवार आणि जळगावातील शेखर सोनाळकर यांच्याविरोधात पुणे डेक्कन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तक्रारदार सूरज सुनील झंवर यांनी दिलेल्या फिर्यादनुसार,

मी सुरज सुनिल झंवर, वय 31 वर्षे, धंदा व्यवसाय, रा- साई बंगला, प्लॉट नं 11, सुहास कॉलनी, जळगाव,

जबाब

-9423421111/9323421111. समक्ष हजर राहुन जबाब लिहुन देतो की, मी वरील ठिकाणी माझ्या कुंटूंबासह राहणेस असुन माझे व वडीलांचे वेयर हाउसिंग, अन्नधान्य व किराणा मालाचे सरकारी सप्लायर असे वेगवेगळे व्यवसाय आहेत. जळगाव येथे प्रमोद रायसोनी यांनी स्थापन केलेल्या भाईचंद हिराचंद रायसोनी मल्टीस्टेट को-ऑप क्रेडिट सोसायटी. संदर्भात अतिरिक्त सचिव तथा केंद्रीय निबंधक सहकार विभाग, केंद्र सरकार नवी दिल्ली यांनी सदरची संस्था ठेवीदारांचे पैसे परत करण्यास असमर्थ झाल्यामुळे दिनांक 27/10/2015 रोजी लिक्वीडेटर जितेंद्र गुलाबराव कंडारे यांची नेमणुक केलेली होती. सदरील लिक्वीडेटर यांनी मल्टीस्टेट क्रेडीट कोपरेटीव्ह सोसा. अधिनियम 2002 अन्वये कार्यवाही’ करुन सदरील संस्थेच्या मालमत्ता विकुन, तसेच वसुली पोटी कर्जदारांच्या मालमत्ता जप्त करुन, त्या जाहीर ई लिलावाद्वारे विकुन ठेवीदारांची देणी परत करण्याची कार्यवाही करत असताना, केवळ राजकीय हेतुने कलुषित होऊन काही पोलीस अधिका-यांना हाताशी धरून दिनांक 25/11/2020 रोजी एकाच दिवशी डेक्कन पोलीस स्टेशन पुणे येथे गु.र.क्र.673/2020 भादंवि कलम 420, 464, 465, 467, 468, 471, 406, 409, 474, 477अ, 225, 120 (ब), 34, सह महाराष्ट्र ठेविदारांच्या हितसंबंधाचे संरक्षण अधिनियम 1999 चे कलम 03 अन्वये तसेच आळंदी पो.स्टे व शिक्रापुर पो.ठाणे या तीन ठिकाणी वरिल एकाच विषयावर तीन वेगवेगळे खोटे गुन्हे दाखल करण्यात आले.

वर नमुद लिक्वीडेटरने कायद्यानुसार ई-लिलाव प्रक्रिया राबवुन दिनांक 02/07/2016 रोजी एकूण 7 मिळकतीची विक्री केली व नियमानुसार उच्चतम बोलीधारकास म्हणजेच माझे वडील श्री. सुनिल देवकीनंदन झंवर प्रोप्रा. श्री. साई मार्केटींग अॅन्ड ट्रेडींग कंपनी जळगाव यांनी घोले रोड, निगडी, नशिराबाद, येथिल तीन मिळकती या कायदेशिर अशा जाहीर ई लिलावात खरेदी केल्या. त्यासंदर्भात आतापर्यंत कोणत्याही न्यायालयात मल्टीस्टेट क्रेडीट कोपरेटीव्ह सोसा. अधिनियम 2002 च्या अधिनियमान्वये नेमलेल्या लवादाने किंवा इतर सक्षम अधिका-याने संबधित ई-लिलाव प्रक्रिया बेकायदेशिर अथवा कायदेशिरदृष्टया अनियमित होती असा निष्कर्ष नोंदविला नव्हता व नाही. म्हणजेच सदरील खोटे गुन्हे कुठलीही कायदेशिर धारणा नसताना राजकीय हेतुने प्रेरित होऊन, केवळ माझ्या वडीलांना खोट्या गुन्हयात अडकविण्याकरिता दाखल करण्यात आलेले होते हे सिध्द होते.

डेक्कन पो.स्टे गु.र.नं 673/2020 भादंवि कलम 420, 464, 465, 467, 468, 471, 406, 409, 474, 477अ, 225, 120 (ब), 34, सह महाराष्ट्र ठेविदारांच्या हितसंबंधाचे संरक्षण अधिनियम 1999 चे कलम 03 अन्वये दाखल गुन्हयामध्ये माझे वडील श्री सुनिल देवकीनंदन झंवर यांना दिनांक 10/08/2021 रोजी अटक करण्यात आली. सदर गुन्हयाचा तपास गुन्हा दाखल झालेपासून आर्थिक गुन्हे शाखा, पुणे यांचेकडील पोलीस निरीक्षक, सुचेता खोकले या करीत होत्या. वरील तिन्ही नोंदविलेले गुन्हे व त्यात झालेली कार्यवाही राजकीय षडयंत्राचा भाग असल्यामुळे सोईस्करित्या अॅड. प्रविण चव्हाण (मो नं. 9850009747) यांची लगेचच विशेष सरकारी वकील म्हणुन नेमणुक करण्यात आली. डेक्कन येथिल गुन्हयात अॅड. प्रविण चव्हाण यांची स्पेशल पीपी म्हणुन नियुक्ती करण्यात आल्यानंतर लगेचच माझा सदर गुन्हयार्शी वैयक्तिक काहीही संबंध नसताना माझी, माझ्या सर्व कंपनीची तसेच आमच्या नातेवाईकांची तसेच माझ्या ऑफिसमधील काम करणा-या कामगारांची बँक खाती जाणिवपुर्वक त्रास देण्याच्या व आर्थिक कोंडी करण्याच्या तसेच भितीचे वातावरण निर्माण करण्याच्या उद्देशाने गोठवण्यात आली.

सदर गुन्हयातील नमुद असलेली श्री. साई मार्केटींग अॅन्ड ट्रेडींग कंपनी जळगाव या कंपनीसोबत माझा कसलाही कागदोपत्री संबंध नसताना सदरची कंपनी ही पुर्णतः माझ्या वडीलांच्या नावावर असुन तसे कायदेशिर तसेच माझ्याविरुध्द कोणताही सबळ पुरावा नसताना मला दिनांक 22/01/2021 रोजी वरिल नमुद गुन्हयात अटक करण्यात आली होती. परंतु मा. उच्च न्यायालय, मुंबई यांनी मला सदर गुन्हयात दिनांक 30/05/2021 रोजी जामिनावर मुक्त केले व माझा सदर गुन्हयात काहीच सहभाग नसल्याचे न्यायालयीन आदेशात नमुद केले होते.

त्यानंतर दिनांक 09/07/2021 रोजी मला पोलीस निरीक्षक, सुचेता खोकले आर्थिक गुन्हे शाखा, पुणे यांचेकडुन दिनांक 11/07/2021 रोजी सकाळी 11.00 वा तपासकामी हजर राहणेबाबतचे नोटीस प्राप्त झाले. मला मा. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार महाराष्ट्रात येण्यास मज्जाव असल्याने मी माझे दोन मित्र नामे आयुष कमलकिशोर मणियार व विशाल रविंद्र पाटील यांचेसह इंदौर या ठिकाणी राहत होतो. सदरचे नोटीस प्राप्त होताच मी त्यांचेसह पुणे येथे आलो. व दिनांक 11/07/2021 रोजी 11.00 वा तपासकामी हजर राहिलो. तेथील काम पुर्ण करुन मी माझे वरनमुद मित्रांसह घोले रोड येथील माझ्या वडीलांच्या मालकीच्या दुकानावर आलो.

मी घोले रोड पुणे येथील माझ्या वडीलांच्या मालकीच्या दुकानावर माझा मित्र नामे आयुष मणियार व विशाल पाटील यांचेसह बसलेलो असताना दुपारी 04.00 वा च्या सुमरास एक त्रयस्त इसम माझ्याकडे आला, त्याने काळया रंगाचा कोट घातलेला होता. वकीली पेहराव केलेला होता. तो अंदाजे 30 ते 35 वर्षे वयोगटातील होता, उंची अंदाजे 6 फुट व सडपातळ शरिरयष्टीचा होता. त्यास पुन्हा पहिल्यास मी ओळखीन. अॅड. प्रविण चव्हाण, विशेष सरकारी वकील यांनी सदर त्रयस्थ इसमातर्फे मला निरोप दिला की, “तुझे वडीलांची चार पाच वर्षे जेलमध्ये वाट लावुन टाकतो मी यापूर्वी सुरेशदादा जैन, डिएसकेचे कुलकर्णी व इतर आरोपींची देखील अशीच वाट लावलेली • आहे. तुमच्या कुंटूबीय यांची जप्त केलेली बँक खाती पुढील दहा वर्षात मुक्त होवु देणार नाही. तेव्हा काहीतरी पुर्तता कर. तरच फायदा होईल. अन्यथा आयुष्यभर पश्चाताप करावा लागेल.” सदरील मध्यस्थ इसमाने मला स्पष्टपणे सांगितले की, तुझे सरकारी वकील अॅड. प्रविण चव्हाण यांनी चाळीसगाव येथील ओरीजनल वाईन शॉपचे मालक उदय नानासाहेब पवार, मो.नं. 9623938188, यांच्या मार्फत हा निरोप पाठविला आहे व त्यासंदर्भात योग्य तो निर्णय तुझा तु घेऊन टाक. माझा या प्रकरणाशी काहीएक संबंध नाही. असे सांगितल्याने मी लगेच उदय पवार या इसमांबाबत अधिक माहिती घेतली असता, असे कळाले की, उदय पवार यांचे वडील कै. अॅड. नानाभाऊ जंगलु पवार हे पेशाने वकील होते. व त्यांचे सरकारी वकील अॅड. प्रविण चव्हाण यांचेशी कौटुंबिक व जिव्हाळ्याचे संबंध होते. त्यानंतर सलग 07 दिवस दिनांक 17/07/2021 रोजी पावेतो मला पोलीस निरीक्षक, सुचेता खोकले

आर्थिक गुन्हे शाखा, पुणे यांनी तपासकामी कार्यालयात बोलावले व माझ्याकडे कसलाही तपास न करता फक्त बसवुन ठेवले. व “आम्ही सांगणार नाही तो पर्यंत पुणे सोडायचे नाही.” असे सांगितले हे सर्व काम अॅड. प्रविण चव्हाण यांच्या सांगण्याप्रमाणे होत होते.

N.C.R.B (एनआ I. I. F. I (एकीकृत अ

मा. सर्वोच्च न्यायालय क्रिमी. अॅप्ली. नं 1481/2019 नेवदा प्रोपरटीज प्रा.लि विरुद्ध महाराष्ट्र शासन या न्यायनिवडया अनुसार पोलीसांनी कोणतीही स्थावर मिळकत जप्त करु नये. असे स्पष्ट निर्देश असुनही अॅड. प्रविण चव्हाण हे आमच्यावर दबाव आणण्यासाठी आमची मिळकत जप्त करण्यासाठी मां. एमपीआयडी न्यायालय नं 1, पुणे आर्थिक गुन्हे शाखा, पुणे यांनी तपासकामी कार्यालयात बोलावले व माझ्याकडे कसलाही तपास न करता फक्त बसवुन ठेवले. व “आम्ही सांगणार नाही तो पर्यंत पुणे सोडायचे नाही.” असे सांगितले हे सर्व काम अॅड. प्रविण चव्हाण यांच्या सांगण्याप्रमाणे होत होते.

मा. सर्वोच्च न्यायालय क्रिमी. अॅप्ली. नं 1481/2019 नेवदा प्रोपरटीज प्रा.लि विरुद्ध महाराष्ट्र शासन या न्यायनिवडया अनुसार पोलीसांनी कोणतीही स्थावर मिळकत जप्त करु नये. असे स्पष्ट निर्देश असुनही अॅड. प्रव चव्हाण हे आमच्यावर दबाव आणण्यासाठी आमची मिळकत जप्त करण्यासाठी मा. एमपीआयडी न्यायालय नं 1, पुणे येथे अर्ज देऊन मंजुरी मागत होते. परंतु माझ्या वडीलांना अटकेपूर्वी मा. उच्च न्यायालय, मुंबई येथे जामिनासाठी केलेल्या अर्जात मा. न्यायालयाने यांनी सदर गुन्हयातुन अटकेपासुन 14 दिवसांची सुट दिली असता, माझ्या वडीलांनी स्वतः न्यायालयात हजर राहुन लेखी म्हणणे सादर केल्यानंतर, मा. एमपीआयडी न्यायालय नं 1, पुणे यांनी सदरचे प्रॉपर्टीचे जप्ती वॉरंट रद्द केले. मा. मुंबई उच्च न्यायालयात विशेष सरकारी वकील प्रविण चव्हाण हा जाणीवपूर्वक न्यायालयात गैरहजर राहुन जामिन अर्जाची सुनावणी होणेस अडथळा आणत होता. सदरबाबत मा. उच्च व सर्वोच्च न्यायालयाने लेखी नाराजी व्यक्त केली होती. अता पुन्हा जामिन अर्जासाठी असेच अडथळे आणतील या भितीने तसेच सदर घडत असलेल्या प्रकारामुळे उदय पवार यांच्यामार्फत माझ्याकडे अॅड. प्रविण चव्हाण याने पाठविलेल्या धमकीला मी प्रचंड घाबरलो होतो.

माझे वडील सुनील झंवर जेलमध्ये अडकुन पडल्यामुळे व घरामध्ये आजोबांची तसेच माझ्या आईची मानसिक व शारिरीक स्थिती अत्यंत खराब झाल्यामुळे, मला लवकरात लवकर वडीलांना जेलमधुन सोडविल्याशिवाय पर्याय नव्हता, म्हणुनच मी विशेष सरकारी वकील प्रविण चव्हाण यांनी चाळीसगाव येथील इसम उदय पवार मार्फत पाठविलेल्या धमकीला बळी पडलो व मध्यस्थीने सांगितल्याप्रमाणे मी दिनांक 20/11/2021 रोजी रात्री 09.00 वा च्या सुमारास प्रथमत चाळीसगाव येथे जावुन ओरिजनल वाईन शॉपमध्ये उदय पवार यांची भेट घेतली. व त्यांना मी माझी ओळख सांगितली व त्यांनी पाठवलेला निरोप मला मिळालेला असून मी पुढील बोलणी करण्यासाठी आलो असंलेबाबत सांगितले. त्यावेळेस उदय पवार यांनी सिग्नल या मोबाईलच्या अॅपवरुन विशेष सरकारी वकील प्रविण चव्हाण यांच्याशी माझे बोलणे करुन दिले. त्यावेळेस विशेष सरकारी वकील अॅड. प्रविण चव्हाण यांनी मला सांगितले की, “मी व शेखर सोनाळकर सोबत आहोत, तुझ्या वडीलांना जामीनवर लवकर सोडावयाचे असल्यास व तुमची गोठवलेली बँक खाती मुक्त करावयाची असल्यास, दोन कोटी रुपयांची व्यवस्था कर. अन्यथा तुझे खानदानाची पुरी वाट लावुन टाकेन, तुझ्या बापाला पाच सहा वर्षे जेलमध्ये सडवेल, अजुनही बीएचआर च्या दोन गुन्हामध्ये अटक होण्याची बाकी आहे, तसेच कोथरुड पोलीस स्टेशन चा गुन्हा ही प्रलंबित आहे व मीच त्यामध्ये विशेष सरकारी वकील आहे हे विसरु नको. मी तुला पण कोथरुड पोलीस स्टेशनच्या गुन्हयात (कोथरुड पोलीस ठाणे गु.र.क्र. 03/2021, भादंवि कलम 109, 120 (ब), 331, 34, 379, 384, 447, 448, 449, 454, 465, 467, 468, 471, 474, 504, 506 (2), 511, दिनांक 05/01/2021) अडकवेन. तुमच्या बापलेकांवर मोक्का लावेन, जर तु माझे म्हणने ऐकलेस तरच मी व शेखर सोनाळकर तुला मदत करेल.” त्यावेळी शेखर सोनाळकर हा देखील संभाषणामध्ये सहभागी होता. त्यानेही मला मदत करण्याची शा·ाती दिली. तसेच पुढील संपर्काकरिता सिग्नल हे ऑनलाईन कॉलींग एप मोबाईलमधे डाउनलोड करुन पुढील सर्व संभाषन त्याद्वारेच करण्यास सांगितले. शेखर सोनाळकर हे बीएचआर सोसायटीचे ऑडीटर होते हे मला माहित होते.

त्यानंतर मला 2 कोटी एवढी रक्कम देणे शक्य नसल्याने मी अॅड. प्रविण चव्हाण यांची बरीच विनवणी केल्यानंतर, त्यांनी वरील काम करुन देण्यास एक कोटी रुपयांची मागणी केली. व त्याखाली एक रुपयाही कमी करणार नाही. असे स्पष्ट सांगीतले. त्याचवेळेस ओरीजनल वाईन शॉपचे मालक श्री. उदय पवार यांनीसुध्दा मला स्पष्टपणे सुनावले कि, विशेष सरकारी वकील प्रविण चव्हाण यांचे एक कोटी रुपये त्वरीत जमा कर. व त्या व्यतिरीक्त मी तुम्हा दोघांमध्ये मध्यस्थी करुन दिली म्हणुन मला सुध्दा विस लाख रुपये स्वतंत्र दे. व दोन लाख रुपये रक्कम पुणे येथे पाठविण्यासाठी कोरीयरच्या हवाल्याकरीता द्यावे लागतील. उदय पवार व विशेष सरकारी वकील अॅड. प्रविण चव्हाण यांनी मला वरील प्रमाणे धमकी दिल्यामुळे भयभीत झालो होतो. त्यामुळे प्रविण चव्हाण व उदय पवार यांचे बेकायदेशिर खंडणी पैशाच्या मागणीस मी होकार दिला. आमचे सदरचे संभाषण मोबाईल मधील सग्निल एपद्वारेच झालेले होते.

यानंतर दि.23/11/2021 रोजी मा. उच्च न्यायालयात फौजदारी जामीन अर्ज क्र. 3910/2021 मध्ये सरकार तर्फे शपथपत्र दाखल झाले त्यामध्ये विशेष सरकारी वकील प्रविण चव्हाण याने माझ्या वडीलांवर गंभिर आरोप केले होते, कारण तोपर्यन्त मी त्यांची व उदय पवार यांनी मागणी केल्याप्रमाणे एक कोटी बावीस लाख रुपयांची पुर्तता करु शकलो नव्हतो. तेव्हा उदय पवार मार्फत विशेष सरकारी वकील अॅड प्रविण चव्हाण यांनी निरोप पाठविला की, पैशाची व्यवस्था ताबडतोब कर अन्यथा तुझे कुटुंब याचे वाईट परिणाम पुढचे पंधरा वर्ष भोगतील.

तेव्हा मी विशेष सरकारी वकील अॅड. प्रविण चव्हाण यांनी उदय पवार मार्फत दिलेल्या धमकी नुसार

व्यवसायातील रक्कम रुपये पाचशे व दोन हजार रुपयेच्या चलनी नोटा घेवून एकूण एक कोटी बावीस लाख रुपये

घेवुन उदय पवार यांचेकडे दिनांक 26/11/2021 रोजी चाळीसगांव येथे गेलो होतो. ओरीजनल वाईन शॉप येथे

पोहोचल्यावर मी उदय पवार यांना फोन केला. त्यानंतर ते तेथे त्यांचेकडील बुलेट गाड़ी घेवुन आले व मला सुचना

दिल्या की, मी त्यांचे मोटार सायकलचे मागे मागे येत राहावे अशा प्रकारे उदय पवार मोटार सायकलवर व मी मागे

कारमध्ये त्यांच्या घरी पोहोचलो. तेव्हा उदय पवार यांनी विशेष सरकारी वकील अॅड. प्रविण चव्हाण यांचे

सांगणेवरून एक कोटी रोख व स्वतःसाठी विस लाख रुपये रोख व हवाल्याचे दोन लाख रुपये रोख असे एकूण एक

कोटी बावीस लाख रुपये माझेकडून रोख स्वरुपात घेतले. पैसे घेतल्यानंतर व ते मोजल्यानंतर उदय पवार यांनी

विशेष सरकारी वकील अॅड. प्रविण चव्हाण यांना सिंगल अँपवरुन “एक फाईल (1 कोटी रुपये) जमा झाली आहे”.

असे सांकेतीक भाषेत सांगितले व त्यावेळेस उदय पवार यांच्या सिंगल अँपवरुन मी विशेष सरकारी वकील अॅड.

प्रविण चव्हाण यांना आता तरी माझ्या वडीलांना जेलमधुन सोडण्यासाठी व आमची गोठवलेली बँक खाती मुक्त

करण्यासाठी मदत करा. मी तुमची मागणी पुर्ण केली आहे अशी विनंती केली. त्यावेळी उदय पवार याने सिग्रल

अॅपवरुन अॅड. प्रविण चव्हाण यांना संपर्क केला व माझे बोलणे करुन दिले तेव्हा मला त्यांनी सांगितले की, तु

आम्ही सांगितल्याप्रमाणे एक फाईल (1 कोटी रुपये) दिली आहेस, चिंता करु नको जी मदत गिरीष महाजन करु

शकले नाहीत ती आम्ही करू. मी व शेखर सोनाळकर तुझे सर्व काम करुन देतो. असे सांगितले तेव्हा शेखर

N.C.R.B (एन.सी.आर. I.I.F. I (एकीकृत अन्वेषण फॉर्म-

सोनाळकर हा देखील संभाषणात सहभागी होता. रुपये 1 कोटी 22 लाख रक्कम घेतल्यानंतरही प्रविण चव्हाण यांनी कुठलीच मदत केली नाही. या उलट माझ्या वडीलांचे माननीय उच्च न्यायालयात जामीनासाठी अर्ज प्रलंबीत असतांना व माझ्या वडीलांनी फक्त ई-निविदेव्दारे मिळकती विकत घेतल्या असतांना सुध्दा मा. उच्च न्यायालयात 61 कोटी रुपयांची अफरातफर केल्याचे व मा. सर्वोच्च न्यायालयात 163 कोटी रुपयांची अफरातफर केल्याचा खोटा अहवाल सादर केला. त्याच दरम्यान मा. सर्वोच्च न्यायालयात वडील सुनिल झंवर यांच्या वतीने विशेष अनुमती याचिका (फौजदारी) नं. 9584/2021 जामीन साठी दाखल करण्यात आली त्यामध्ये वेळोवेळी सुनावणी होवुन, केवळ फौजदारी जामीन अर्जाच्या गुणवत्तेच्या आधारावर मा. सर्वोच्च न्यायालयातील सरन्यायाधीश यांचे पिठाने दि. 21/02/2022 रोजी माझे वडील सुनिल झंवर यांना जामीन दिला.

माझे वडील सुनिल झंवर जेलमधुन येरवडा मध्यवर्ती कारागृह पुणे येथुन दि. 22/02/2022 रोजी मुक्त झाल्यावर सहाजिकच मार्चमध्ये पहिल्या आठवड्यात मी त्यांना वरील प्रकार सांगितला असता, माझे वडील माझ्यावर चिडले व त्यांनी सांगितले की, तु अशा प्रकारे प्रविण चव्हाण यांची बेकादेशिर मागणी पुर्ण करायला नको होती. त्यावेळेस मी त्यांना समजावले कि, त्यांच्यावरील प्रेमापोटी मी प्रविण चव्हाण व उदय पवार यांच्या धमकीला मी घाबरल्यामुळे सदरील पैसे दिले. तेव्हा वडील सुनिल झंवर यांनी उदय पवार यांचेशी संपर्क साधला व. दि. 06/03/2022 (रविवार रोजी) सुनिल झंवर यास माझ्या वडीलांचे मित्र नामे दिपक ठक्कर यांचेसह जावुन कजगांव पेट्रोल पंप येथे संध्याकाळी भेटले. त्यावेळेस उदय पवार याने आपल्या मोबाईलवरून फोन लावून विशेष सरकारी वकील अॅड प्रविण चव्हाण यांचेशी बोलणे करुन दिले. तेव्हा माझ्या वडीलांनी उदय पवार समोर विशेष सरकारी वकील अॅड प्रविण चव्हाण याला स्पष्ट सांगितले की, “तुम्ही बेकादेशिरपणे माझ्या मुलाकडुन धमकी देवुन पैसे घेतलेले आहेत, तेव्हा दोघांनीही माझा मुलगा सुरज झंवर यांचेकडुन दि. 26/11/2021 रोजी घेतलेले एक कोटी बाविस लाख रुपये परत द्या”, त्यावेळी विशेष सरकारी वकील अॅड. प्रविण चव्हाण याने फोनवर शिव्या देवुन धमकी दिली की, “मी पाहतो तुझे बँक अकाऊट कसे ओपन होतात ते. तुला आता इतर दोन केसमध्ये देखील राम द्यावा (तोंड दयावे लागेल) लागेल.” असे बोलून फोन बंद केला. व लगेचच उदय पवार सुध्दा तेथुन निघुन गेला. त्यानंतर दि. 09/03/2022 रोजी महाराष्ट्र विधानसभेमध्ये विशेष सरकारी वकील अॅड. प्रविण चव्हाण हे लोकांना ब्लॅकमेल करून खोट्या गुन्हामध्ये अडकवण्याचे पोलीस अधिका-यांना दबावतंत्र वापरतात व आपल्या पदाचा गैरवापर करतात याचे रेकॉर्ड केलेले टेपचे मा. विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस साहेब यांनी सभागृहात नमुद केले, त्यावेळी विधानसभेतील थेट प्रक्षेपण मी टिव्हिवर पाहीले. त्यानंतर लगेचच दि. 11/03/2022 रोजी मी माझे वडीलांच्या सांगण्यानुसार उदय पवार यांना फोन लावला व माझेकडुन एक कोटी बावीस लाख रुपयांची खंडणी स्वरुपात घेतलेली रक्कम परत करा. अशी मागणी केली ते संभाषण अत्यंत थोडक्यात आहे परंतु रेकॉर्ड केलेले आहे. ते मी आपल्या अवलोकनार्थ पेनड्राईव्हमध्ये सादर करीत आहे. त्यावेळेस उदय पवार यांनी सांगितले की, कालच्या प्रकरणामुळे म्हणजे (काल महाराष्ट्र विधिमंडळात विशेष सरकारी वकील अॅड. प्रविण चव्हाण यांचे विरुध्द विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस साहेब यांनी हा मुद्दा उपस्थित केलेला असल्यामुळे) आता सध्या प्रविण चव्हाण फोन घेत नाहीत. मी उदय पवार यांना स्पष्ट सांगितले कि, सदरील पैसे परत द्यावे लागतील पुन्हा सरकारी वकील बदलल्यास मी पुन्हा एबीसीडी करणार नाही तेव्हा उदय पवार यांनी फोन कट केला.

वकील बदलल्यास मी पुन्हा एबीसीडी करणार नाही तेव्हा उदय पवार यांनी फोन कट केला..

यादरम्यान माहे जुन 2022 मध्ये तेजस मोरे मला घोलरोड, पुणे येथे भेटला. तेजस मोरेची व माझी ओळख येरवडा कारागृहामध्ये झालेली होती व कारागृहामधेच मला कशा पध्दतीने फसविण्यात आले याची सर्व हकीकत मी तेजस मोरेला सांगितलेली होती व आता प्रविण चव्हाण याने मला कसे फसविले व माझ्याकडुन पैसे घेवुनही र मदत करीत नसल्याचे सांगीतले. त्यावेळी त्याने मला मदत करण्याच्या उददेशाने 1 ऑडीओ क्लिप व 2 व्हिडिओ क्लिप दिली त्यामध्ये कोथरुड पोलीस स्टेशनमध्ये कशा पध्दतीने माझ्या फ्लॅटवर चाकू ठेवण्याचा प्लान प्रविण चव्हाण इतर लोकांनी केला होता ते मोबाईलव्दारे संभाषण केल्याचे स्पष्ट ऐकवले व व्हिडीओ क्लिपमध्ये प्रविण चव्हाण यांना एक कोटी रुपये संदर्भात बिल्डरशी संभाषण करतांनाची व्हिडिओ रेकॉर्डींग पाहीली… त्यानंतर काही दिवसांनी मी व माझे वडील सुनिल झंवर चाळीसगांव येथे उदय पवार यांना भेटण्यासाठी त्यांचे ओरिजनल वाईन शॉप येथे गेलो असता, ते तेथे उपलब्ध नव्हते. परंतु तेथील त्यांचे नातेवाईकांनी मला व माझे वडीलांना, ओरिजनल वाईन शॉपचे आतमध्ये घेताना, नेहमी प्रमाणे आमचे दोघांचे मोबाईल काढुन घेवुन बाहेरच ठेवले व आतमध्ये प्रवेश केल्यावर तेथे लागुनच असलेल्या दरवाज्यातुन आतील बाजुस घेवुन गेले तेथे गोडाउन हो व थोडी उभा राहण्यासाठी जागा होती. त्यानंतर तेथील इसमाने स्वतःचे मोबाईलवरुन उदय पवार यांना फोन लावला व तो स्पिकर फोनवर ठेवला, त्यावेळेस माझे वडील त्याचेशी बोलले व पुन्हा पैसे परत देण्याची विनंती केली. सदरील पुर्ण घटनेचे दृकश्राव्य चित्रीकरण मी माझ्या चायना बनावटीच्या कॅमेरा असलेल्या घड्याळात चित्रित केले. त्यावेळेस उदय पवार यांनी फक्त उडवाउडवीची उत्तरे दिली. व तेथील इसमास ते संभाषण मी माझ्या घड्याळात रेकॉर्ड करत आहे असा संशय आल्यावर त्याने उदय पवार यांना फोन लावलेला फोन त्वरीत बंद केला.

तरी उदय नानाभाऊ पवार व विशेष सरकारी वकील अॅड. प्रविण चव्हाण व शेखर सोनाळकर यांनी माझे वडील कारागृहात असतांना माझ्या वडीलांना तुरंगातुन बाहेर येवु देणार नाही, मोक्का लावुन कारवाई करु, तुझ्या संपूर्ण कुंटुंबाला यामध्ये अडकवुन टाकेन, अजुनही खुप गुन्हे दाखल होतील अशी धमकी देवुन मला भिती घालुन माझेकडुन एक कोटी बावीस लाख रुपये इतकी रक्कम वसुल केली, त्या पैकी एक कोटी रुपये प्रविण चव्हाण यांनी ठेवले व विस लाख रुपये उदय पवार यांनी मध्यस्थी करण्याच्या मोबदल्यात व दोन लाख रुपये हवाल्याच्या मोबदल्यात घेतले. अशा प्रकारे एक कोटी बावीस लाख रुपयांची खंडणी वसुल केली. अॅड. प्रविण चव्हाण यांनी ते विशेष सरकारी वकील असल्याने त्यांनी त्यांच्या पदाचा गैरवापर करुन त्यापोटी मला धमकी देत माझ्या कडुन खंडणी वसुल केली आणि मला खोटे आश्वासन देवुन ते माझे वडीलांना जामीन मिळवुन देवु शकतात अशी बतावणी केली व जामीन हा न्यायालयात केवळ गुणवत्तेवरच होणार आहे. याची संपुर्ण जाणिव व माहीती असुनही, त्यांनी उपरोक्त रक्कम खंडणीच्या स्वरुपात वसुल करुन माझी फसवणुक केली व अशाच प्रकारे खोट्या तक्रारी नोंदवुन खंडणी वसुल करण्याचे रॅकेट आहे. हे आपणास ऑडीओ क्लिप व व्हिडिओ क्लिप पाहील्या व ऐकल्यावर लक्षात येईल.

तरी दिनांक 20/11/2021 ते माहे जुन 2022 च्या दरम्यान विशेष सरकारी वकील अॅड. प्रविण पंडीत – चव्हाण रा. सुमंगल अपा., स.न. 2291, मोदीबाग, शिवाजीनगर, पुणे मो. नं. 9850009747 व शेखर मधुकर सोनाळकर, रा. फ्लॅट नं 301, नयनतारा अपा. इश्वर कॉलनी, सुपारी कारखान्याजवळ, जळगाव, मोनं 9823293938, उदय नानाभाऊ पवार रा. चाळीसगाव, जि. जळगाव, मो.नं. 9623938188 यांनी आपसांत संगणमत करून, सरकारी लोकसेवक असल्याचा पदाचा गैरवापर मला व माझ्या वडीलांना नुकसान पोहचवण्यासाठी त्यांच्या अधिकारांचा गैरवापर करुन माझ्या वडीलांस जामिन मिळणेकामी सहकार्य करेन असे आश्वासन देवुन तसेच कोथरुड पोलीस ठाणे येथे (कोथरुड पोलीस ठाणे गु.र.क्र. 03/2021, भादंवि कलम 109, 120 (ब), 331, 34, 379, 384, 447, 448, 449, 454, 465, 467, 468, 471, 474, 504, 506(2), 511, दिनांक – 05/01/2021) अन्वये दाखल गुन्हयात मला अडकवण्याची भिती घालुन तसेच मला व माझ्या वडीलांना मोक्का केस लावुन त्यात अडकवण्याची भिती घालुन आपसात आम्हाला उद्देशपूर्वक गुन्हयात अडकवण्याचा कट करुन माझ्याकडुन 2 कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी केली व माझ्या कडुन एक कोटी बावीस लाख रुपये इतकी रक्कम वसुल केली, त्या पैकी एक कोटी रुपये प्रविण चव्हाण यांनी ठेवले व विस लाख रुपये उदय पवार यांनी मध्यस्थी करण्याच्या मोबदल्यात व दोन लाख रुपये हवाल्याच्या मोबदल्यात उदय नानाभाऊ पवार यांच्या मालकि ओरिजनल वाईन शॉप, मेनरोड, चाळीसगाव, जि. जळगाव या ठिकाणी घेतले. अशा प्रकारे एक कोटी बावीस लाख रुपयांची खंडणी वसुल केली आहे. म्हणुन माझी वर नमुद आरोपींविरुध्द कायदेशिर तक्रार आहे.