नर्सिंग अभ्यासक्रमास प्रवेशासाठी योग्य महाविद्यालयाची निवड गरजेची
जळगाव लाईव्ह न्यूज । ४ जुलै २०२४ । नर्स किंवा ब्रदर्स हा शब्द आपण नेहेमी वैद्यकिय क्षैत्रात ऐकले आहे. यात करीयर व मोठया संधी आहे. पण नर्सिंग कॉलेज निवडताना अनेक गोष्टींचा विचार करणे महत्त्वाचे आहे. योग्य कॉलेजची तुम्ही निवड केली नाही तर तुमच्या करियरवर दूरगामी परिणाम होतो. म्हणूनच सर्व निकषात बसणा या नर्सिंग प्रवेशासाठी गोदावरी नर्सिंग महाविद्यालयास पसंती दिली जात आहे.
अद्यायावत डीजीटल क्लासरूम,१०० टक्के निकालाची परंपरा, शासकिय नियम व निकष तसेच मेरीट नुसार प्रवेश, कडक शिस्त तसेच राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावरील कार्यशाळात सहभाग आणि परराज्यातील उच्च शिक्षीत शिक्षक व विदयार्थी नोकरी व प्रवेशासाठी गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगला पसंती देत असल्याचे प्रशासन अधिकारी प्रविण कोल्हे यांनी सांगितले.
आमच्या प्रतिनीधीशी बोलतांना त्यांनी २१ वर्षाची परंपरा महाविद्यालयास असून १२०० बेडचे रूग्णालयाशी सलग्नीत तसेच नॅक दर्जा प्राप्त असल्याने विदयार्थ्यांचा ओढा या महाविद्यालयाकडे आहे. ए.एन.एम. ते एम. एस्सी अभ्यासक्रमासाठी एकुण ३०० च्या वर जागांना परवानगी महाराष्ट्र राज्य नर्सिंग आणि पॅरामेडीकल शिक्षण मंडळ, आरोग्य विज्ञान विदयापिठ नाशिक, भारतिय परीचर्या परिषदने दिलेली आहे.
आतापर्यत केरळ, गुजरात, मध्यप्रदेश, तामीळनाडू व महाराष्ट्रातील जवळपास ५००० ते ६००० विदयार्थी शिक्षण घेवून बाहेर पडले असून शासकिय व निमशासकिय तसेच विदेशात उच्चपदावर कार्यरत आहे. विदयार्थ्यांच्या सोयीसाठी सर्व सोयीयुक्त हॉस्टेल, मेस, रिडींग हॉल, स्पर्धा परिक्षेची तयारी, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय जर्नल, तसेच क्रिडांगण आणि राज्य व राष्ट्रीय स्तरावरील सांस्कृतिक व क्रिडा स्पर्धा मध्ये सहभागासाठी प्रोत्साहन दिले जाते व अनेक बक्षीसेही या महाविद्यालयाने प्राप्त केली आहे. विशेष म्हणजे प्रवेशाचा निकष हा मेरीटनुसार लावला जातो आणि शासकिय नियमानुसार शिष्यवृत्ती दिली जात असल्याने विदयार्थ्यांचा ओढा गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंग कडे असून पहिली पसंती दिली जाते असे प्रशासन अधिकारी प्रविण कोल्हे यांनी सांगितले.