गोदावरी नर्सिंग कॉलेजमध्ये ‘कॅम्पस रिक्रूटमेंट ड्राईव्ह’ उत्साहात

जून 24, 2026 5:32 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंग येथे दि. २२ व २३ जून २०२६ रोजी अंतिम वर्ष बी.एस्सी. नर्सिंग आणि जी.एन.एम. विद्यार्थ्यांसाठी नागपूर येथील नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट यांच्या वतीने कॅम्पस रिक्रूटमेंट ड्राइव्हचे यशस्वी आयोजन करण्यात आले.

Campus recruitment drive

या प्रक्रियेसाठी नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटच्या भरती पथकात दीपा देशपांडे (मॅनेजर – एचआर),कुंजन कुलकर्णी (नर्सिंग सुपरवायझर) आणि माधवी चकोले (फ्लोअर मॅनेजर) यांचा समावेश होता. त्यांनी विद्यार्थ्यांशी प्रत्यक्ष संवाद साधत संस्थेची कार्यपद्धती, करिअरमधील प्रगतीच्या संधी, व्यावसायिक कौशल्यांचा विकास तसेच आरोग्यसेवा क्षेत्रातील अपेक्षा याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.निवड प्रक्रियेमध्ये कागदपत्रांची पडताळणी, अभिक्षमता चाचणी, तांत्रिक मूल्यमापन आणि वैयक्तिक मुलाखतींचा समावेश करण्यात आला होता.

ही कॅम्पस रिक्रूटमेंट ड्राइव्ह विद्यार्थ्यांसाठी प्रतिष्ठित आरोग्यसेवा संस्थेत रोजगाराच्या संधी मिळवून देणारे महत्त्वाचे व्यासपीठ ठरले. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांना शैक्षणिक ज्ञानासोबतच व्यावसायिक क्षेत्रात प्रवेश करण्यासाठी आवश्यक मार्गदर्शन व संधी मिळतात, असे मत उपस्थितांनी व्यक्त केले.कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगच्या व्यवस्थापनाने, प्राचार्यांनी आणि प्राध्यापकवृंदांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाच्या शेवटी महाविद्यालयाच्या वतीने नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट, नागपूरच्या भरती पथकाचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले.या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना नामांकित आरोग्यसेवा संस्थेत करिअरच्या संधी उपलब्ध झाल्या.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now