---Advertisement---
कृषी जळगाव जिल्हा

जिल्ह्यात किसान क्रेडिट कार्ड उपलब्ध करुन देण्याची मोहीम सुरु

---Advertisement---

kisan credit card jpg webp

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज | १९ एप्रिल २०२२ | केंद्र शासनाने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांना किसान क्रेडिट कार्ड उपलब्ध करून देण्याबाबतची मोहीम सुरू केली आहे. सदरची मोहीम ही भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव वर्षांतर्गत आत्मनिर्भर भारताचा एक भाग म्हणून देशभर राबविण्यात येत आहे.

यासाठी “किसान भागीदारी प्राथमिकता हमारी” नावाची मोहीम दि. 24 एप्रिल, 2022 ते 1 मे, 2022 या कालावधीत देशभर राबविण्यात येणार आहे. या मोहिमेत प्राधान्याने प्रधानमंत्री  किसान सन्मान निधि योजनेच्या सर्व पात्र शेतक-यांना किसान क्रेडिट कार्ड (KCC) उपलब्ध करण्यात येतील.

राज्यात पी.एम.किसान नोंदणीकृत एकुण 114.93 लाख लाभार्थ्यांपैकी 81.36 लाख लाभार्थी किसान क्रेडिट कार्ड धारक आहेत.  राज्यात जवळपास 33.57 लाख पी.एम.किसान नोंदणीकृत लाभार्थी हे अद्यापही किसान क्रेडिट कार्ड धारक नाहीत. यासाठी दि. 24 एप्रिल, 2022 रोजी राज्यातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये पी.एम.किसान लाभार्थ्यांना किसान क्रेडिट कार्ड उपलब्ध करून देण्यासाठी विशेष ग्रामसभा आयोजित करण्यात आली आहे. या विशेष ग्रामसभेत पी.एम.किसान लाभार्थ्यांना किसान क्रेडिट कार्ड देण्यासाठी विहीत नमुन्यातील अर्ज देण्यात येतील.

केंद्र शासनाने या मोहिमेच्या अंमलबजावणीसाठी सविस्तर कार्यप्रणाली (SOP) उपलब्ध करून दिलेली असून किसान क्रेडिट कार्ड उपलब्ध करून देण्याची कार्यवाही सहकार, महसूल, ग्रामविकास, कृषि, पशुसंवर्धन , दुग्धविकास व मत्स्य विभाग, नाबार्ड आणि जिल्हा अग्रणी बँक या सर्व यंत्रणांच्या समन्वयाने करावयाची आहे. यासाठी जिल्हाधिकारी यांचे मार्गदर्शनाखाली सदरची मोहिम राविण्यात येईल.

संबंधित सर्व बँक किसान क्रेडिट कार्ड उपलब्ध करून देण्याच्या विहित कार्यपध्दतीनुसार पात्र लाभार्थ्यांचे अर्ज विशेष ग्रामसभेत घेऊन दि. 01 मे, 2022 पर्यंत त्यांना किसान क्रेडिट कार्ड मंजूर करणेची कार्यवाही पुर्ण करतील. यासाठी जिल्हा अग्रणी बँक यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील संबंधित सर्व बँकांनी योजनेतील लाभार्थ्यांना किसान क्रेडिट कार्ड उपलब्ध करून देण्याची आणि त्यांचे पी.एम.किसान योजनेचा लाभ मिळत असलेले बँक खाते आधार आधारीत पेमेंटसाठी अधिकृत करून घेण्यासाठी संनियंत्रण करावे असे निर्देश मा. आयुक्त  कृषि यांनी दिले आहेत.

तसेच प्रधानमंत्री पीक विमा योजना अंतर्गत विमा कंपन्यांचे जिल्हा व्यवस्थापक व कृषि विभाग हे  दि. २४ एप्रिल २०२२  रोजी आयोजित विशेष ग्रामसभेत पीक विमा योजने विषयी शेतकऱ्यांना माहिती देतील. तसेच राज्यातील शेतकऱ्यांनी पीक विमा योजनेत भाग घ्यावा यासाठी दि. 26 एप्रिल 2022 रोजी गावनिहाय “पीक विमा पाठशाला” चे आयोजन करण्यात येत आहे. या पाठशाळेमध्ये शेतक-यांना प्रधानमंत्री पीक विमा योजनेबाबत सविस्तर माहिती देऊन शेतक-यांचा सहभाग वाढविण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्यासाठी निर्देश आयुक्त  कृषि यांनी दिले आहेत.

           या अनुषंगाने संबंधित सर्व यंत्रणांनी समन्वयाने कार्यवाही करून  “किसान भागीदारी प्राथमिकता हमारी” मोहीम यशस्वी करण्यासाठी मा. आयुक्त  कृषि यांनी सुचना निर्गमित  केल्या आहेत.असे उपायुक्त (कृषि गणना) तथा पथक प्रमुख पी.एम. किसान कृषि आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी एका प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकान्वये कळविले आहे.   

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---