जळगाव लाईव्ह न्यूज । ८ नोव्हेंबर २०२१ । गोलाणी मार्केटमधील एका दुकानाबाहेरील सीसीटीव्ही कॅमेरे चोरट्यांनी लांबवले. गोलाणी मार्केट येथील श्री बाबा चष्माघर दुकानावर या दुकानात ही चोरी झाली. रोहित भगवानदास चंदनानी यांच्या मालकीचे हे दुकान आहे. ५ नोव्हेंबर रोजी रात्री नऊ वाजता त्यांनी दुकान बंद केले. यानंतर रात्रीतून चारेट्यांनी दुकानावर लावलेली लायटिंग व उजव्या बाजूच्या भिंतीस असलेला सीसीटीव्ही कॅमेरा चोरून नेला.
शनिवारी सकाळी चंदनानी दुकानावर आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. त्यांनी शेजारच्या दुकानदारांकडे विचारपूस केली. या वस्तू चोरट्यांनी लांबवल्याचे निष्पन्न झाल्यानंतर चंदनानी यांनी शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, सुरुवातीला कॅमेरे लांबवायचे. त्यानंतर टेहळणी करून त्याच भागात चाेरी करायची, अशी चाेरट्यांची माेडस अाॅपरेंडी असण्याची शक्यता नाकारता येत नाही. या पार्श्वभूमीवर पाेलिसांनी व्यापारी संकुलात रात्रीच्या वेळी गस्त वाढवावी, असा सूर व्यापारी बांधवांतून आता उमटू लागला आहे.