जळगाव लाईव्ह न्यूज । २२ जानेवारी २०२१ । नागरिकांना आपत्कालीन परिस्थितीत तात्काळ पोलीस सेवा किंवा मदत मिळावी यासाठी टोल फ्री क्रमांक ११२ ही आपत्कालीन सुविधा संपुर्ण महाराष्ट्रात सुरु करण्यात आलेली आहे. मात्र, या त्याचा दुरुपयोग केला तर काय होऊ शकते, याचा प्रत्यय देणारी एक घटना अमळनेर तालुक्यात घडलीय. पोलिसांना ११२ नंबर डायल करून खोट्या भांडणाची माहिती देणाऱ्या अमळनेर तालुक्यातील डांगर येथील एका इसमास चांगलेच महाग
काय आहेत प्रकार?
अमळनेर तालुक्यातील डांगर येथील धनराज कडू भिल याने २२ रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास ११२ नंबरवर कॉल करून गावात वाद होत असल्याची तक्रार केली. तात्काळ मदतीची मागणी त्याने केली. नियंत्रण कक्षाकडून ११२ च्या कर्तव्यावर असलेले पोलीस कर्मचारी मिलिंद भामरे व सूर्यकांत साळुंखे यांना घटनेची माहिती देण्यात आली.
ताबडतोब मदतीची सूचना मिळाल्याने भामरे व साळुंखे आणि चालक घटनास्थळी डांगर येथे पोहचले. तर तेथे उभ्या असलेल्या धनराज याने मी सहज मजाक मजाकमध्ये ११२ ला कॉल केला. भांडण वगैरे नाही. पोलीस खरंच मदतीला येतात की नाही हे पाहत होतो, असे सांगितले.
त्यावेळी त्याच्या तोंडाचा दारूचा उग्र वास येत होता. पोलिसांनी त्याला समजावण्याचा प्रयत्न केला असता त्याने आरडाओरडा सुरू केला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनला आणले. पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांना हकीकत सांगितल्यानंतर त्याच्यावर भादंवि कलम १८२ आणि दारूबंदी कायद्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एकंदरीत पोलिसांशी केलेली मजाक धनराजला चांगलीच भोवली आहे.
आधी नागरिकांच्या मदतीसाठी १०० नंबर देण्यात आला होता. मात्र, लहान मुले, दारुडे आणि समाजकंटकांमुळे ठाणे अंमलदाराला त्रास व्हायचा. म्हणून शासनाने १०० नंबर बंद करून ११२ हा टोल फ्री नंबर सुरू केला. त्यासाठी स्वतंत्र पोलीस आणि वाहने तैनात केली आहेत.
हे देखील वाचा :
- जळगावात अवैध गॅस भरणा केंद्रावर पोलिसांचा छापा; ३४ गॅस सिलेंडर जप्त
- अखेर सरकारने शब्द पाळला; शासनाच्या ‘या’ निर्णयामुळे शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त
- गोदावरी नर्सिंगच्या एएनएम द्वितीय वर्षाचा उत्कृष्ट निकाल
- सहा.संचालक डॉ विवेकानंद गिरी यांची डॉ.उल्हास पाटील वैद्यकिय महाविद्यालय व रूग्णालयास भेट
- जळगाव जिल्ह्यात अजय-अतुलचा लाईव्ह कार्यक्रम; कुठे आणि कधी होणार?