मौलाना अबुल कलाम आजाद आदर्श सम्मान पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन

ऑक्टोबर 8, 2022 2:50 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । ८ ऑक्टोबर २०२२ । रावेर तालुक्यातील कर्जोद येथे मौलाना अबुल कलाम आजाद सार्वजनिक वाचनालय संस्थेतर्फे अबुल कलाम आजाद राष्ट्रीय शिक्षण दिनानिमित्त शैक्षणिक, साहित्यिक व सामाजिक तसेच विविध क्षेत्रातील बंधू-भगिनीना ‘मौलाना अबुल कलम आजाद आदर्श सम्मान पुरस्कार’ प्रदान करण्यात येणार असून या आदर्श सम्मान पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

jalgaon 2022 10 08T144735.781 jpg webp

प्रस्ताव एक प्रतीत व दोन रंगीत छायाचित्रासह पाठवावयाचे आहेत. (मौलाना अबुल कलम आजाद सार्वजनिक वाचनालय व ग्रँथालय कर्जोद ता रावेर जि जळगाव, या पुरस्काराचे हे 11 वे वर्ष असून हा कार्यक्रम भव्यदिव्य होणार आहे. शैक्षणिक , साहित्यिक व सामाजिक कारकीर्दीचा प्रस्ताव दि. 28 आॕक्टोबर 2022 पर्यत पाठवायचे आहे. शिक्षक, साहित्यिक, कवी, पोलीस कर्मचारि अदिनी बंधू-भगिनीनी आपल्या कार्यचा प्रस्ताव पाठवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. यात शैक्षणिक, साहित्यिक व सामाजिक, कार्यातही हातभार लावत आहेत आशा गुरुमाऊलींचा गौरव अवश्य व्हावा, ही या संस्थेचेची भूमिका आहे. या पुरस्काराचे स्वरुप असे आहे की, आकर्षक स्मृतीचिंन्ह, मानपत्र, शाल ,पेन इत्यादी रावेर यावल तालुक्याचे आमदार व जळगाव जिल्ह्यातील मान्यवरांचे हस्ते प्रदान केले जाणार आहे.

Advertisements

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now