Cabinet Expansion : ..अखेर ठरलं, उद्या होणार महाराष्ट्राचा मिनी मंत्रिमंडळ विस्तार!

ऑगस्ट 8, 2022 2:31 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । ४ ऑगस्ट २०२२ । महाराष्ट्र्रात शिंदे-भाजप (Shinde – BJP) सरकार स्थापनला महिना उलटून गेला. तरी अद्यापही मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाहीय. यावरून विरोधकांकडून जोरदार टीका केली जात. अशातच मंत्रिमंडळ विस्ताराशी संबंधित एक मोठी बातमी समोर आली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार उद्या दि.९ रोजी मंत्रिमंडळाचा विस्तार राजभवनात होणार आहे. पहिल्या टप्प्यात १५ मंत्र्यांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार केला जाणार असून त्यापैकी १२ संभाव्य मंत्र्यांची यादीही समोर आलीय. त्यात भाजपकडून 7 आणि शिंदे गटातील 5 नावांचा समावेश आहे. Cabinet expansion in Maharashtra

eknath shinde and devendra fadanvis

मंगळवारी पुण्यात माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, लवकरच आम्ही आमच्या मंत्रिमंडळाचा विस्तार करणार आहोत. पूर्ण मंत्रिमंडळ नसले तरी सरकार सक्षमपणे काम करत आहे. आम्ही असे अनेक निर्णय घेतले आहेत जे लोकाभिमुख आहेत, असेही ते म्हणाले होते. त्याचवेळी महाराष्ट्र मंत्रिमंडळाचा विस्तार एका महिन्यात झाला नसला तरी शिंदे सरकारने महिनाभरात 751 सरकारी आदेश जारी केले आहेत. यापैकी १०० हून अधिक आदेश एकट्या आरोग्य विभागाशी संबंधित आहेत. यापूर्वी शिवसेनेच्या बंडानंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारने चार दिवसांत १८२ सरकारी आदेश जारी केले होते.

रविवारीच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देत, सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणीचा आणि मंत्रिमंडळ विस्ताराचा काहीही संबंध नसल्याचं सांगत लवकरच मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याची माहिती त्यांनी दिली होती. राज्यात १५ ऑगस्टपूर्वी मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याची शक्यता व्यक्त होत होती. खरे तर सरकार स्थापन होऊनही मंत्रिमंडळ विस्तार न झाल्यास शिंदे यांचे सरकारही विरोधकांच्या निशाण्यावर आहे. मंत्रिमंडळ विस्तार न झाल्याने राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने अनेकवेळा शिंदे सरकारवर निशाणा साधला आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार उद्या दि.९ रोजी सकाळीच मंत्रिमंडळ विस्तार होणार असून १५ मंत्र्यांना शपथ दिली जाणार आहे. विधिमंडळ सचिवांनी तातडीची बैठक बोलाविल्याने तसा अंदाज व्यक्त केला जात आहे. शिंदे गटाने मंत्रिमंडळ विस्ताराचा फॉर्म्युला तयार केला आहे. दरम्यान, सध्या १२ संभाव्य मंत्र्यांची यादीही समोर आली असून त्यात भाजपकडून ७ आणि शिंदे गटातील ५ नावांचा समावेश आहे. त्यात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil), सुधीर मुनगंटीवार यांच्या नावाचा समावेश आहे. तर शिंदे गटाकडून गुलाबराव पाटील, दादा भुसेंचाही समावेश करण्यात आल्याची माहिती आहे.

शिंदे गटातील कुणाची लॉटरी लागणार?
गुलाबराव पाटील
उदय सामंत
अब्दुल सत्तार
दादा भुसे
शंभुराज देसाई

भाजपकडून कुणाला संधी मिळणार?
चंद्रकांत पाटील
सुधीर मुनगंटीवार
गिरीश महाजन
चंद्रशेखर बावनकुळे
राधाकृष्ण विखे पाटील
आशिष शेलार
प्रवीण दरेकर

चेतन वाणी

पत्रकारिता क्षेत्रात गत ११ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १० वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now