⁠ 
गुरूवार, डिसेंबर 12, 2024
[aioseo_breadcrumbs]

…पण भाजप सोडणार नाही : आमदार सावकारे

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २८ एप्रिल २०२२ । यापूर्वी मी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होतो. आताही वेळोवेळी राष्ट्रवादीकडून ऑफर मिळतात. मात्र, आता भाजप सोडणार नाही. एकवेळ निवडणूक लढणार नाही, पण भाजपमध्येच राहीन. खुर्ची, पदापेक्षा देशाची सुरक्षा महत्त्वाची असल्याचे आमदार संजय सावकारे यांनी सांगितले.

भुसावळ शहरातील सिंधी कॉलनीत प्रभाग २१ मध्ये सिंधी कॉलनी येथील रामभाऊ बेकरीपासून भक्त निवासापर्यंत पेव्हर ब्लॉक बसवण्याच्या कामाचा शुभारंभ आमदार संजय सावकारे यांचा हस्ते झाला त्यावेळी ते बोलत होते. तसेच आमदार की, प्रभाग क्रमांक २१ मध्ये खूप चांगली विकास कामे झाली आहेत. काही कामे राहिली असली तरी ती देखील पूर्ण होतील. निधी कमी पडू देणार नाही. सिंधी समाज भाजपचा पारंपरिक मतदार आहे. आज देशाच्या सुरक्षेसाठी भाजपची आवश्यकता आहे. मला आताही राष्ट्रवादी काँग्रेसमधून ऑफर्स येत आहेत. पण मी आता भाजप सोडणार नाही. देशाच्या सुरक्षेसमोर पद, खुर्ची मोठी नाही. एकवेळ उमेदवारी नाही भेटली तरीही चालेल पण भाजप सोडणार नाही. कारण देशाच्या सुरक्षेसाठी भाजप शिवाय पर्याय नाही, असे सावकारे म्हणाले.

यांची होती उपस्थिती

यावेळी माजी नगरसेवक निक्की बतरा आणि अजय नागराणी यांनी मनोगत व्यक्त केले. माजी उपनगराध्यक्ष रमेश नागराणी, ज्ञानसेठ लेखवानी, त्रिलोक मनवानी, मनोहर सोढाई, राजकुमार वादवानी, सुनीलकुमार बसंतानी, मनोहरलाल तेजवणी, नारायणदास बठेजा आदी उपस्थित होते.