---Advertisement---
बातम्या

रावेर वनविभागात कारवायांचा धडाका : तस्करमध्ये खळबळ

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्युज| सुभाष धाडे| अवैध डिंक वाहतुक तसेच अवैध लाकुड वाहतुक प्रकरणी रावेर वनविभागाकडुन कारवाईचा सपाटा सुरू असल्याने डिंक तस्कर तसेच लाकुडतोड्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

police jpg webp webp

अधिक माहिती अशी कि, मागील आठवड्यात डिंकाची अवैधपणे वाहतुक करणाऱ्या दोन मोटारसायकवर कारवाई करण्यात आली होती. तसेच काल पहाटेच्या सुमारास कडुलिंब वृक्षाची अवैध वाहतूक करणारा ट्रक जप्त करण्यात आला होता. दुपारच्या सुमारास डिंक तस्कराला मोटारसायकल सह ताब्यात घेण्यात आल्याची कारवाई करण्यात आली होती. यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

वनविभागाला मिळालेल्या माहितीनुसार दिनांक २६ फेब्रुवारी २०२३ रोजी पहाटे रसलपुर ते रावेर रस्त्याने विनापरवाना जळावू वृक्षाचे वाहतूक करणारे ट्रक क्रमांक एम एच १९ झेड ७७६२ ट्रक मुद्देमालासह सापळा रचून जप्त करण्यात आला.

---Advertisement---

वाहन चालक शेख कलीम शेख कबीर रा.रावेर यांच्याविरुद्ध भारतीय वन अधिनियम १९२७ अन्वये आगार रक्षक प्रथम रिपोर्ट क्रमांक ०१/२०२३ दिनांक २६/०२/२०२३चा दाखल करून गुन्हा नोंदविला आहे. पुढील तपास आगार रक्षक रावेर करीत आहे. सदर कार्यवाही मा.वनसंरक्षक धुळे (प्रा.) दिगंबर पगार, मा.उपवनसंरक्षक यावल जमीर शेख, सहाय्यक वनसंरक्षक यावल प्रथमेश हाडपे यांच्या मार्गदर्शनाने नपरिक्षेत्र अधिकारी रावेर अजय बावणे, वनपाल रावेर रवींद्र सोनवणे, वनपाल पालश, अरुणा ढेपले, वाहनचालक विनोद पाटील यांनी केली.
तसेच दुसऱ्या घटनेत मोराव्हल ते जीन्सी तांडा जवळ अवैध गौण धावडा डिंक वाहतुक करणारी मोटार सायकल क्रमांक एम एच १९ डि जी ०६६५ किंमत रु ३०,००० डिंक ५५ किलो किंमत १५००० हजार रुपये असा एकुण ४५००० हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल ताब्यातत घेतला. भा.दं.क १९२७ चे कलम ४१/(ब) ४२,५२ नुसार वनरक्षक जिन्सी प्र.री.क्र.०१/२०२३ दि २६/०२/२०२३ अन्वये जप्त केला आहे.आरोपी मीर सुभन तडवी याची चौकशी सुरू आहे.सदर कारवाई व वनपरीक्षेत्र अधिकारी अजय बावणे,पालच्या वनपाल अरुणा ढेपले, जिन्सीचे वनरक्षक रमेश भुतेकर यांनी संयुक्तरीत्या कारवाई केली.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---