⁠ 
शुक्रवार, नोव्हेंबर 22, 2024
Home | जळगाव जिल्हा | एरंडोल | कट मारण्याच्या संशयावरून बस चालकास मारहाण

कट मारण्याच्या संशयावरून बस चालकास मारहाण

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १५ नोव्हेंबर २०२२ । कट मारण्याच्या संशयावरून बस चालकास मारहाण करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. या प्रकणी पोलिसांत तक्रार दाखल असून पोलीस पुढील करीत आहे.

सविस्तर आहे की, एरंडोल बस आगारातील चालक साहेबराव महाजन चालक क्र १९७२८ हा दि. १४ नोव्हेंबर रोजी रापम च्या बस क्रमांक एम एच ०६ एस ८६२३ या बसने एरंडोल पाचोरा फेरी मारीत असताना त्याला भातखेडा बस स्थानक परिसरात समाधान गोसावी नामक तरुणाने त्याच्या गाडीला कट मारला याचा राग येऊन कोणतीही चौकशी न करता विनाकारण मारहाण केली या घटनेची माहिती चालकाने स्थानक प्रमुख गोविंदा बागुल यांना फोन करून दिली व नंतर संबंधित तरुण गोसावी याचे विरुद्ध कसोदा पोलीस स्टेशन येथे चालक साहेबराव महाजन याने वाहक अनिल महाजन यांचे सोबत जाऊन फिर्याद दिली त्यावेळी पोलिसांनी सदर घटनेचे साक्षीदार यांची विचारपूस करून चौकशी केली व त्यानंतर पो. नि. नीता कायटे यांचे मार्गदर्शनाखाली त्याचे विरुद्ध भारतीय दंड संहिता १८६० कलम क्रमांक ३५३,३२३,३३२,५०४ व ५०६ नुसार गुन्हा दाखल केला.

तसेच याप्रसंगी ,कष्टकरी जनसंघाचे डेपो अध्यक्ष निलेश पाटील ,विभागीय प्रसिध्दी सचिव किशोर मोराणकर ,डेपो उपाध्यक्ष पंकज पाटील उपस्थित होते सायंकाळी उशिरा आरोपी समाधान गोसावी याला अटक केली याकामी ठाणे अंमलदार नंद कुमार पाटील व पोलीस कॉन्स्टेबल इम्रान पठाण यांनी सहकार्य केले

author avatar
टीम जळगाव लाईव्ह