⁠ 
रविवार, एप्रिल 28, 2024

तळीरामाला वाचविण्याच्या नादात बस गेली खड्ड्यात ; तीन विद्यार्थी जखमी, यावल नजीक घटना

जळगाव लाईव्ह न्यूज । २१ सप्टेंबर २०२३ । रस्त्याच्या मधोमध दुचाकी उभी करून दारूच्या नशेत झोपलेल्या व्यक्तीला वाचविण्याच्या प्रयत्नात बस खड्ड्यात गेल्याची घटना यावल शहरापासुन सुमारे १ किलो मिटरवर घडलीय. या घटनेत तीन विद्यार्थी किरकोळ जखमी झाले असून त्यांना खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

नेमका प्रकार काय?
यावल एसटी आगारातील बस क्रमांक (एमएच २० डी ९९७५) ही सकाळच्या सुमारास वड्री कडून प्रवाशी घेवून यावलच्या दिशेने येत होती. याच दरम्यान, यावल शहरापासुन सुमारे १ किलो मिटर लांब असलेल्या ठिकाणी एक दारूच्या नशेतचिंब असलेला दारूडा व्यक्ती आपली दुचाकी लावून रस्त्यावर झोपलेला होता. वाहनचालक यांनी त्यास वाचविण्यासाठी एसटी बस रस्त्याच्याकडेला जात असतांना रोडच्या खाली उतरवून खड्ड्यात गेल्याची घटना घडली आहे

या अपघातात तिन विद्यार्थीनी जखमी झाले आहे. त्यांना खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान घटना घडल्यानंतर त्या दारूड्याने वाहनचालकाशी हुज्जत घालून पळ काढला आहे.

दरम्यान, यावल तालुक्यात अवैध धंदे बेधडकपणे सुरू असून यात खुलेआम गावटी दारू विक्री केली जात आहे. तालुक्यातील अनेक खेडेगावांमध्ये गावठी दारू, पन्नी दारूची विक्री होत आहे. मात्र यावर पोलिसांकडून कुठलीही कारवाई केली जात नसून पोलीस दादांच्या आशीर्वादानेच हे धंदे सुरु आहेत का? असा प्रश्न निर्माण होतोय.