⁠ 
बुधवार, एप्रिल 24, 2024

बुलढाणा येथे घाटात बस पलटली; बसमध्ये २० विद्यार्थ्यांसह एकूण ५५ प्रवासी असल्याची माहिती

जळगाव लाईव्ह न्यूज। २५ जुलै २०२३। बुलढाणा जिल्ह्यात पुन्हा एकदा मलकापूर-बुलढाणा एसटी बसचा मोठा अपघात झाला आहे. ब्रेक फेल झाल्याने चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले. त्यांनतर ही बस घाटात पलटी झाली. या बसमध्ये एकूण ५५ प्रवासी करत होते. या बसमध्ये २० विध्यार्थी असल्याची माहिती देखील मिळत आहे. स्थानिक घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरु केले आहे. हि बस मलकापूर वरून बुलढाण्यावरून निघाली होती.

बुलढाण्यात अपघात कमी होताना काही दिसत नाही. दिवसेंदिवस अपघात वाढतानाचा दिसत आहेत. आज २५ जुलै रोजी सकाळी १०.१५ वाजेच्या सुमारास ही घटना घडली. या बसमध्ये ५५ प्रवासी प्रवास करत असल्याचे प्रत्यक्ष दर्शनी सांगितले. एसटी बस क्रमांक ८३७५ या बसचा जॉईंचर निसटला होता. बस घाटातून जात असताना ब्रेक लागले नाहीत. त्यामुळे चालकाचे नियंत्रण सुटले आणि असपघात झाला. अशी प्राथमिक माहिती मिळत आहे. या अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले.

सर्व जखमींवर बुलढाणा सामान्य रुग्णालयात सुरु असल्याची माहिती मिळत आहे. या बसमध्ये २० विद्यार्थी असल्याची माहिती देखील मिळत आहे. स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरु केले आहे. ही बस मलकापूरहून बुलढाण्याकडे निघाली होती. घाट चढत असताना पायथ्याशी असणाऱ्या चढावावर अचानक बस खाली येत असल्याचे चालक आणि वाहकाच्या लक्षात आले. दरम्यान त्यांनी बसवर नियंत्रण साधण्याचा प्रयत्न केला.मात्र बस खाली येऊन रस्त्यालगतच्या झाडावर मागील बाजूने धडकली आणि बस रस्त्याच्या कडेला पलटी झाली. जखमी प्रवाशांना जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले आहे