⁠ 
सोमवार, मे 6, 2024

थेरोळा शिवारात दहा एकरातील ऊस जळून खाक

जळगाव लाईव्ह न्यूज । सुभाष धाडे । मुक्ताईनगर तालुक्यातील थेरोळा शिवारातील शेतकरी शांताराम काशीराम भोंबे, रामेश्वर पांडुरंग पाटील, संदिप रमेश पाटील या शेतकऱ्यांच्या एन तोडणीवर आलेला दहा एकरातील ऊस जळुन खाक झाला. ही घटना शुक्रवारी सायंकाळच्या दरम्यान घडली.

ऊसाची तोडणी झालेल्या शेतातील उर्वरीत पालापाचोळा शेतकऱ्याने पेटवुन दिल्याने हवेने उडालेल्या ठिंणगीमुळे बाजुच्या शेतातील ऊसाने पेट घेतला. आजूबाजूच्या सुमारे दहा एकरातील ऊस जळुन खाक झाला तसेच ठिंबक संच व पीव्हीसी पाईपही जळुन लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. थेरोळा येथील शेतकरी शांताराम काशीराम भोंबे, रामेश्वर पांडुरंग पाटील, संदिप रमेश पाटील या शेतकऱ्याचे अतोनात नुकसान झाले आहे. घटनेची माहीती पोलीस पाटील समाधान भोंबे यांनी महसुल प्रशासन व पोलीस प्रशासनास दिली. तातडीने तलाठी प्रविण शिंपी, अरुण भोलाणकर कुऱ्हा पोलीस दुरक्षेत्राचे पोलीस हरीश गवळी, पोलीस राहुल नावकर, गोपीचंद सोनवणे, अरुण लोहार तसेच महावितरणचे हनुमंत लांजुळे, गुलाबराव उमाळे घटनास्थळी दाखल झाले.
कृषीपंपांचा विजपुरवठा बंद असल्याने घटनेची माहीती कळताच साहाय्यक अभियंता निळकंठ राठोड यांनी आग विझविण्यासाठी एका तासापुरता सुरळीत केला.