⁠ 
शुक्रवार, एप्रिल 26, 2024

पाचोऱ्यात घरफोडी, हजारोंचा ऐवज लंपास

जळगाव लाईव्ह न्यूज । ११ जुलै २०२२ । पाचोरा शहरातील बंद घर फोडत चोरटयंनी सोने-चांदीच्या दागिन्यांसह ६ हजारांच्या रोकडसह 38 हजारांचा ऐवज लंपास केल्याची घटना घडली असून या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पाचोरा पोलिसात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरातील पुनगाव रोडवरील भाग्यलक्ष्मीनगर भागात भिकन विठ्ठल पाटील हे वास्तव्यास आहेत. गुरुवार, 7 जुलै ते शनिवार, 9 जुलै दरम्यान भिकन पाटील हे घरी नसल्याचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी घराचा सेफ्टी दरवाजाचा कडी कोंडा तोडत घरात प्रवेश केला. घरातील गोदरेज कपाटातील तिजोरी तोडत त्यात ठेवलेले 32 हजार रुपये किंमतीचे सोन्या-चांदीचे दागिने व सहा हजार रुपये रोख असा 38 हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला.

या प्रकरणी भिकन विठ्ठल पाटील यांच्या फिर्यादीवरून पाचोरा पोलिस स्टेशनमध्ये अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला. पुढील तपास पोलिस निरीक्षक किसनराव नजनपाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक सुर्यकांत नाईक हे करीत आहे.