जळगाव लाईव्ह न्यूज । १६ सप्टेंबर २०२२ । निमखेडी शिवारातील हिरागौरी पार्क येथील अपार्टमेंटमधील बंद घर फोडून चोरट्यांनी एक लाख 44 हजार रूपये किंमतीचे दागिने लंपास केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
गोविंदा हिलाल पाटील (41, हिरागौरी पार्क, निमखेडी शिवार, जळगाव) यांनी पोलिसांत फिर्याद दाखल केली आहे. पाटील हे मंगळवार, 13 सप्टेंबर रोजी सायंकाळी 5 ते रात्री 8 वाजेच्या दरम्यान ते घर बंद करून बाहेर गेले असता चोरट्यांनी संधी साधली. चोरट्यांनी बंद घराचा कडी-कोयंडा तोडून आत प्रवेश करत एक लाख 44 हजार रूपये किंमतीचे दागिने लांबवले. गोविंदा पाटील हे रात्री आठ वाजता घरी आल्यानंतर चोरी उघडकीस आली. जळगाव तालुका पोलीस ठाण्यात बुधवारी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.