जळगाव लाईव्ह न्यूज । १० जून २०२२ । घरफोडी करून ६४ हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने लंपास केल्याची घटना शहरातील समर्थ कॉलनीत घडली आहे. या प्रकरणी रामानंदनगर पोलिसांत अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल झाला आहे.
संदीप सुरेश सोमनी (वय ५५) रा. समर्थ कॉलनी हे आपल्या कुटुंबीयांसह वास्तव्याला आहे. खाजगी नोकरी करून आपला उदरनिर्वाह करतात. दरम्यान दि. १४ मे रोजी सायंकाळी ६ वाजता ते १६ मे सायंकाळी ५ वाजेच्या दरम्यान खासगी कामासाठी ते बाहेरगावी गेले असताना त्यांचे घर बंद होते. बंद घराचा फायदा घेवून अज्ञात चोरट्यांनी बंद घर फोडून घरातील ६४ हजार २७६ किमतीचे सोन्याचे दागिने लंपास केले. वीस दिवसानंतर अखेर संदीप सोमानी यांनी गुरुवार दि. ९ जून रोजी सायंकाळी ५ वाजता रामानंदनगर पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्यांवर रामानंदनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास संजय सपकाळे करीत आहे.