आणखी चार ठिकाणी घरफोडी, लाखोंचा ऐवज लंपास
जळगाव लाईव्ह न्यूज । १० जुलै २०२२ । जिल्ह्यात तब्बल चार ठिकाणी घरफोडी केल्याची घटना समोर आली आहे. या घरफोडीत चोरट्यांनी तब्ब्ल लाखोंचा ऐवज केल्याचा अंदाज असून या घटनेने पुन्हा नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याबाबत वेगवेगळ्या पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रामदेव कुशवा (वय ४६ रा. साई नगर, मनखेडा, जळगाव) यांनी पोलिसांत फिर्याद दिली. यांच्या घराचा दरवाजा उघडा असल्याचे हेरत चोरटयांनी घरात डाव साधला. दरम्यान चोरटयांनी सोन्या-चांदीचे एकूण ६४ हजार किमतीचे दागिने लांबवून नेले. याबाबत कुशवा यांनी नशिराबाद पोलिसांत तक्रार दिली. त्यानुसार अज्ञात भामट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास रवींद्र तायडे करत आहेत.
भिकन पाटील (वय ३८ रा. हिराबापू नगर ता. पाचोरा, जळगाव) यांनी पोलिसांत फिर्याद दिली. यांच्या घरात अज्ञात चोरटयांनी प्रवेश करून घरातील सोन्या- चांदीचे एकूण ३८ हजार रुपये किमतीचे दागिने चोरून नेले. याबाबत पाटील यांनी पाचोरा पोलिसांत तक्रार दिली. त्यानुसार अज्ञात भामट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सूर्यकांत नाईक करत आहेत.
पुष्पाबाई नेरपगार (वय ६५ रा.पिंप्री ता.पाचोरा, जळगाव) यांनी पोलिसांत फिर्याद दिली. संशयित आरोपी मीनाबाई पाटील यांनी फिर्याद यांच्या राहत्या घराच्या मागील भिंत तोडून घरातील विविध साहित्य चोरून नेले. याबाबत फिर्याद यांनी पाचोरा पोलिसांत तक्रार दिली. त्यानुसार संशयित आरोपी मीनाबाई पाटील यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास नरेंद्र शिंदे करत आहेत.
सुमित मंडोरे (वय ३२ रा. गायत्री नगर शिरसोली, जळगाव) यांनी पोलिसांत फिर्याद दिली. यांच्या दुकानाच्या मागील बाजूने दुकानात प्रवेश करून अज्ञात चोरटयांनी ३८ हजाराची रोकड लांबवून नेली. याबाबत मंडोरे यांनी शनिपेठ पोलिसांत तक्रार दिली. त्यानुसार अज्ञात भामट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास प्रदीप बोरदे करत आहेत.