⁠ 
मंगळवार, मे 7, 2024

राज्यातील ‘या’ पाच ठिकाणी उभारली जाणार शिवसृष्टी !

जळगाव लाईव्ह न्यूज । १५ जून २०२३ । छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेरणादायी कर्तृत्वाची माहिती पुढील पिढ्यांना व्हावी व पर्यटकांना शिवरायांच्या अपार शौर्याची कल्पना यावी यासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळातर्फे शिवनेरी, गोराई, बुलढाणा, छत्रपती संभाजीनगर, नाशिक व रामटेक येथे ५ ठिकाणी शिवसृष्टी, उद्यान, संग्रहालय व शिवकालीन थीम पार्क उभारण्यात येणार आहे.

पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी बुधवारी पत्रपरिषदेत ही माहिती दिली. शिवसृष्टींची उभारणी येत्या पाच वर्षांत केली जाणार असून, त्यासाठी ४१० कोटी रुपयांची तरतूद केली आहे. शिवसृष्टीसाठी जनतेच्या सूचनांनुसार बदल करण्यात येईल. विविध लोगो स्पर्धाचे आयोजनही करण्यात येईल.

गोराई (मुंबई) येथील पर्यटन महामंडळाच्या २५ एकर जागेत छत्रपती शिवाजी महाराज यांचे युद्धकौशल्य व आरमार संद॒र्भात प्रेरणा देणारे संग्रहालय (वॉर म्युझियम) उभारण्यात येणार आहे.

बुलढाणा येथे राजमाता ३ जिजाऊ संग्रहालय, छत्रपती संभाजीनगर येथे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज संग्रहालय, नाशिक येथे छत्रपती शिवाजी महाराज राजकौशल्य संग्रहालय, रामटेक येथील छत्रपती शिवाजी महाराज हिंदवी स्वराज्य संग्रहालयासाठी प्रत्येकी ५० कोटी रुपयांची तरतूद केली जाणार आहे.