विवऱ्यात चोरट्यांचा उच्छाद, चक्क ट्राॅन्सफॉर्मर फोडून ऑइल व बुशिंग लांबविले

डिसेंबर 9, 2021 1:21 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । ९ डिसेंबर २०२१ । निंभोरा (ता.रावेर) येथे शेतात असलेले ट्रान्स्फॉर्मर अज्ञात इसमाने फोडून ऑईल व बुशिंग चोरून नेल्याचा प्रकार समोर आला आहे. यामुळे महावितरण कंपनीचे ३० हजारांचे नुकसान झाल्याचे प्राथमिक अंदाज आहे.या प्रकरणी महावितरणचे सहाय्यक अभियंता किनगे यांच्या फिर्यादीवरून येथील पोलिसांत अज्ञात चाेरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

crime

सविस्तर असे की, रावेर तालुक्यातील निंभोरा येथील विवरे शिवारातील गोपाळ जगन्नाथ बऱ्हाटे यांच्या शेतात असलेले ट्रान्स्फॉर्मर अज्ञात इसमाने फोडून ऑईल व बुशिंग चोरून नेला. यामुळे महावितरण कंपनीचे अंदाजे ३० हजारांचे नुकसान केले. या प्रकरणी येथील पोलिसांत येथील महावितरणचे सहाय्यक अभियंता किनगे यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चाेरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास एपीआय स्वप्नील उनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार राजेंद्र पाटील व सहकारी करत आहेत.

दरम्यान, या आधीही एक दिवसापूर्वी याच शिवारात ट्रान्स्फॉर्मर फोडून खाली टाकून नुकसान केले होते. त्यातच आता या ठिकाणी ट्रान्सफाॅर्मर बसवण्यासाठी शेतकऱ्यांकडून वीज बिल भरल्याशिवाय ट्रान्स्फॉर्मर मिळणार नसल्याने शेतकऱ्यांची कुचंबणा हाेत आहे.

 

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now