चोपड्यात घरफोडी, ३ लाखांचा ऐवज लंपास

ऑक्टोबर 9, 2022 5:47 PM

Chopada News-जळगाव लाईव्ह न्यूज । ९ ऑक्टोबर २०२२ । चोपडा तालुक्यातील चुंचाळे येथील स्ट्रीम बिल्डींगमध्ये बंद घरात प्रवेश करीत सुमारे ३ लाख रुपयांचे सोन्याच्या दागिन्यांसह घरातील भांडे चोरून नेल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी चोपडा शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

crime theft jpg webp

तालुक्यातील चुंचाळे येथील स्ट्रीम बिल्डींगमधील २०१ रूममधील घराचे कुलूप तोडून संशयित तिघांनी प्रवेश करीत घरातील सोन्याचे दागिने व गृहउपयोगातील लहान मोठे स्टील व पितळी भांडे असा एकूण ३ लाख रुपयाचा ऐवज चोरून नेला आहे. याबाबत संदीप छगन पटेल (रा.चुंचाळे) यांनी चोपडा शहर पोलिसात तक्रार दिली आहे.

Advertisements

याप्रकरणी संशयित आरोपी सुभाष रमेश चौधरी, दीपक शांताराम पाटील व कल्पेश मधुकर चौधरी (सर्व रा. चुंचाळे) या तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सपोनि अजित सावळे हे करीत आहेत.

Advertisements

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now