जळगाव लाईव्ह न्यूज । २५ एप्रिल २०२२ । पाचोरा तालुक्यातील लोहारी बुद्रुक येथील नवीन प्लॉट भागातील मुकुंदा पाटील यांच्या घरात रविवारी पहाटे अज्ञात चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून घरातील कपाटातून २ लाख ८३ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने व २७ हजार रुपये रोख रक्कम असा एकूण ३ लाख १० हजारांचा ऐवज चोरुन नेल्याची घटना घडली.
ही बाब सकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास सुरेखा पाटील या नियमितपणे उठून खाली आल्यानंतर चोरी झाल्याची त्यांच्या लक्षात आले.
या घटनेबाबत पिंपळगाव हरेश्वर पोलिस ठाण्यास भ्रमण ध्वनीद्वारे कळवण्यात आले. ही खबर मिळताच पिंपळगाव हरेश्वर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक महेंद्र वाघमारे यांनी सहकाऱ्यांसह घटनास्थळी भेट दिली. पाहणी करुन घरमालक मुकुंदा पाटील यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आदेशान्वये सहायक पोलिस निरीक्षक महेंद्र वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली पिंपळगाव हरेश्वर पोलिस ठाण्यात नव्यानेच रुजू झालेले पोलिस उपनिरीक्षक अमोल पवार करत आहे.