⁠ 
शुक्रवार, सप्टेंबर 20, 2024
Home | बातम्या | जळगाव शहरात घरफोडीचे सत्र सुरूच ; वृद्धेच्या घरातून चोरट्यांनी लांबविला ७२ हजारांचा ऐवज

जळगाव शहरात घरफोडीचे सत्र सुरूच ; वृद्धेच्या घरातून चोरट्यांनी लांबविला ७२ हजारांचा ऐवज

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २१ ऑगस्ट २०२४ । जळगाव शहरात घरफोडीचे सत्र सुरूच आहे. चोरट्यांना खाकीचा धाकच दिसून येत नाहीय. दिवसेंदिवस घरफोडीच्या घटना घडत असून यामुळे जळगावकर धास्तावले आहे. याच दरम्यान, मुलीकडे गेलेल्या ७२ वर्षीय वृद्धेच्या घरात चोरट्यांनी डल्ला मारून सोने, चांदीचे दागिने व तांबे, पितळीची भांडे असा ७२,५०० रुपयांचा ऐवज लांबवल्याची घटना उघडकीस आली आहे.

चोरट्याने चोरी केल्यानंतर पहिल्या कुलपासारखेच दिसणारे कुलूप आणून दरवाजाला लावल्याने ही घटना परिसरात चर्चेचा विषय ठरली. या प्रकरणी एमआयडीसी पोलिसांत सोमवारी गुन्हा दाखल करण्यात आला. कमल गोपाल तेली (वय ७२) या ढाके कॉलनी येथे वास्तव्यास आहेत. त्या गेल्या महिनाभरापासून त्यांच्या सैनिक कॉलनीत राहणाऱ्या मुलीकडे गेल्या होत्या.

त्यामुळे गेल्या महिनाभरापासून त्यांचे घर बंद होते. हीच संधी साधत अज्ञात चोरट्याने त्यांच्या घराचे कुलूप तोडून घरात लोखंडी पेटीत ठेवलेले ७२,५०० रुपयांचे सोने-चांदीचे दागिने व तांब्या पितळीची भांडी लंपास केली. २ जुलै ते २ ऑगस्टदरम्यान ही घटना घडली. या प्रकरणी सोमवारी कमल तेली यांनी पोलिसांत फिर्याद दिली. या घटनेचा पुढील तपास उपनिरीक्षक राजेंद्र उगले हे करीत आहेत

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.