जळगाव लाईव्ह न्यूज । १४ डिसेंबर २०२१ । नशिराबाद पोलिस स्टेशनला दाखल असलेल्या घरफोडीच्या गुन्ह्यातील चोरट्याचा जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मुसक्या आवळल्या आहे. हमीदखान अय्युबखान (रा. गणेशपुरी मेहरुण जळगांव) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याला एमआयडीसी हद्दीतील काशिनाथ चौकातून अटक करण्यात आली. पुढील तपासकामी त्याला नशिराबाद पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
काय आहे प्रकरण?
जळगाव तालुक्यातील मन्यारखेडा येथे इम्रान शरीफ खान (वय-३६) हे आपल्या कुटुंबियांसह राहतात. ३१ मे २०२१ रोजीच्या मध्यरात्री १ ते ३ वाजेच्या दरम्यान घरातील सर्व सदस्य झोपलेले असतांना अज्ञात चोरट्यांनी घरातील कपाटातून रोकड आणि दोन मोबाईल असा एकुण २२ हजार ५०० रूपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याचे आले होते. याप्रकरणी इम्रान खान यांच्या फिर्यादीवरून नशिराबाद पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या गुन्ह्यातील पाहिजे असलेला संशयित आरोपी हा जळगावातील काशिनाथ चौकात असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली. त्यानुसार त्याला एमआयडीसी हद्दीतील काशिनाथ चौकातून अटक करण्यात आली.
यांनी केली कारवाई
पो.नि. किरणकुमार बकाले यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ विजयसिंग पाटील, जितेंद्र पाटील, अक्रम शेख, पोना नितीन बाविस्कर, प्रीतम पाटील, राहुल पाटील, चा.स.फौ राजेंद्र पवार कारवाई केली.