जळगाव लाईव्ह न्यूज । २ सप्टेंबर २०२१ । शहरातील रामानंद नगरच्या घाटाजवळ रात्रीच्या वेळेस अज्ञात व्यक्तींनी मेलेला बैल आणून टाकला होता. कुत्र्यांनी रात्रभरात बैलाच्या शरीराचे लचके तोडले असून त्या ठिकाणी माशांचा त्रास होत आहे.
रामानंद नगर घाटावरून दररोज हजारो नागरिकांची ये-जा असते. घाटाच्या खालच्या बाजूला रस्त्यालगत रात्री कोणीतरी मेलेला बैल आणून टाकला होता. कुत्र्यांनी रात्रभरात बैलाच्या मृत शरीराचे लचके तोडले आहेत. बैलाच्या शरीरावर माशा भिणभिणत असून कुत्रे आजूबाजूला फिरत आहे. मनपा प्रशासनाने वेळीच दखल घेत बैलाची विल्हेवाट लावावी आणि संबंधित व्यक्तींवर कारवाई करावी अशी मागणी होत आहे.