बहिणीशी प्रेमविवाह केला म्हणून युवकाचा निर्घृण खून

जळगाव लाईव्ह न्यूज । ५ फेब्रुवारी २०२२ । बहिणीशी प्रेमविवाह केल्याच्या कारणावरून अरबाज खाटीक या युवकाची हत्या करण्यात आली होती. नंदुरबार शहरातील मच्छी बाजार परीसरात शुक्रवारी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास ही घटना घडली.

या खुनानंतर शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाल्यानंतर जमावाला नियंत्रीत केले. खुनानंतर संशयीत जयेश दयाराम सोनवणे (रा. सां.बा. विभाग कार्यालयाच्या शासकीय निवास्थान, मच्छी बाजार, नंदुरबार) यास पोलिसांनी अटक केली आहे.

मच्छी बाजार परीसरात राहणार्‍या जयेश सोनवणे याच्या बहिणीशी प्रेमविवाह केल्याच्या कारणावरून शुक्रवार, 3 जानेवारी रोजी सायंकाळच्या सुमारास नंदुरबार शहरातील बोहरी मशिदला लागून असलेल्या रस्त्यावर सातपीर बाबा दर्ग्याजवळ अरबाज खाटीक या युवकाची जयेश सोनवणे याने हत्या करण्यात आली.

खून प्रकरणी राज सलीम खाटीक (रा.घरकुल, जिल्हा रुग्णालयाजवळ नंदुरबार) यांच्या फिर्यादीवरून जयेश दयाराम सोनवणे (रा. सा. बां.विभाग कार्यालयाच्या शासकिय निवास्थान मच्छी बाजार नंदुरबार) याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर करीत आहेत.