⁠ 
शनिवार, एप्रिल 27, 2024

Breaking : डॉक्टरच्या निष्काळजीपणामुळे विवाहितेचा मृत्यू, गुन्हा दाखल

जळगाव लाईव्ह न्यूज । १ ऑक्टोबर २०२२ । डॉक्टरच्या निष्काळजीपणामुळे एका विवाहितेचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी डॉक्टराविरोधात निंभोरा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आली आहे.

पीएसआय काशिनाथ कोळबे यांनी पोलिसांत फिर्याद दाखल केली. कोळबे हे निंभोरा पोलिसांत पीएसआय म्हणून कार्यरत आहेत. फिर्यादीत म्हटले आहेत की, अर्जदार सचिन पाटील यांच्या तक्रार अर्जानुसार दि. १३ मार्च २०२१ रोजी सकाळी १० वाजे ते ३१ मार्च २०२१ रोजीचे रात्री १.३० वाजेच्यादरम्यान संशयीत डॉ. प्रशांत अहिरे, समर्थ क्लीनिक विवरा रा. सावदा ता. रावेर याने सचिन पाटील यांच्या पत्नी गायत्री हिच्यावर प्राथमिक उपचार निष्काळजीपणाने, हयगयीने करून औषधे लिहून देण्यास सक्षम नसताना ओव्हर डॉस लिहून दिले त्यामुळे गायत्री हीचा मुत्यू झाला.

या प्रकरणी अर्जदार सचिन पाटील यांच्या अर्जावर पीएसआय काशिनाथ कोळबे यांनी निंभोरा पोलिसांत फिर्याद दाखल केली. त्यानुसार डॉ. प्रशांत अहिरे, समर्थ क्लीनिक विवरा रा. सावदा ता. रावेर याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास गणेश धुमाळ करत आहेत.