---Advertisement---
अमळनेर जळगाव जिल्हा विशेष

अमळनेरकरांचा संताप : ५१ हजार पोस्टकार्ड लिहून निवडणुकीवर बहिष्काराचा इशारा

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । ३ फेब्रुवारी २०२३ । जळगाव व धुळे जिल्ह्यास वरदान ठरणारा निम्न तापी पाडळसे प्रकल्प खान्देशातील मोठा सिंचन प्रकल्प आहे. मात्र, गेल्या २३ वर्षांपासून या प्रकल्पाचे काम रखडले आहे. १९९७ ला १४२. ६४ कोटी रुपयांची मूळ प्रशासकीय मान्यता मिळाली होती. आता या प्रकल्पाचे बजेट तब्बल २ हजार ७५१ कोटींवर जावून पोहचले आहे. मात्र अजूनही या प्रकल्पाचे काम पूर्ण झालेले नाही. हे काम जलदगतीने व्हावे, यासाठी केंद्र शासनाच्या ‘प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेत पाडळसे धरणाचा समावेश करावा, यासाठी मागणीसाठी अमळनेर तालुक्यातील नागरिकांनी आठ भाषांमध्ये ५१ हजार पोस्टकार्ड लिहून मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांना पाठवली आहेत. विशेष म्हणजे, शेतकरी प्रताप छबुलाल साळी यांनी शासनाचे लक्ष वेधण्यासाठी चक्क स्वतःच्या रक्ताने पोस्टकार्ड लिहिले आहे.

padlse jpg webp webp

अमळनेर तालुक्यात मौजे पाडळसे गावाजवळ तापी नदीवर हा प्रकल्प होत आहे. एप्रिल १९९९ पासून या प्रकल्पाच्या कामास सुरुवात झाली असून प्रकल्पाचे ४३ टक्के काम पूर्ण झाले आहे. प्रकल्पाचे उजव्या तीरावरील माती धरणाचे काम पूर्ण झाले असून डाव्या तीरावरील माती धरणाचे काम ७० टक्के झाले आहे. तर धरणाचे बांधकाम सांडवा मुर्धा पातळी १३९.२४ मी.पर्यंत झाले आहे. प्रकल्पाचे स्थापत्य कामे, वक्राकार दरवाजे, उर्वरित भूसंपादन व पुनर्वसन कामे वेळेत (जून २०२६) पूर्ण होण्यासाठी दरवर्षी ३५० ते ४०० कोटींची गरज आहे. हा प्रकल्प पूर्ण व्हावा यासाठी पाडळसे धरण जनआंदोलन समितीसह अनेक सामाजिक संस्था/संघटनांतर्फे प्रयत्न करण्यात आले. हा प्रकल्प अपूर्ण असल्याने दरवर्षी लाखों लिटर पावसाचे पाणी वाहून जाते. राजकीय व प्रशासकीय पातळीवरील उदासिनतेमुळे हा प्रकल्प गेल्या २३ वर्षांपासून अपूर्ण स्थितीत आहे.

---Advertisement---

अमळनेरसह सहा तालुक्यातील शेतकर्‍यांसह नागरिकांनी ५१ हजार पोस्टकार्ड आठ भाषेत लिहिली आहेत. प्रकल्प लवकर पूर्ण न झाल्यास लाभक्षेत्रातील जनता येणार्‍या निवडणुकीत मतदानावर बहिष्कार टाकतील, असा इशाराही या पोस्टकार्डातून देण्यात आला आहे. स्वहस्ताक्षरात लिहिलेली ५१ हजार विक्रमी पत्र ९ फेब्रुवारीला भव्य मिरवणुकीने पोस्टात टाकण्याचे अभिनव आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती पाडळसे धरण जनआंदोलन समितीचे प्रमुख सुभाष चौधरी, रणजित शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---