जळगाव लाईव्ह न्यूज । १४ ऑगस्ट २०२४ । जळगाव येथील डॉ. वर्षा पाटील वुमन्स कॉलेज ऑफ होम सायन्स महाविद्यालयात ग्रंथालय सप्ताह निमित्ताने आज ग्रंथ प्रदर्शन आयोजित करण्यात आले. प्रदर्शनाचे उदघाटन अॅड महेश येवले यांचे हस्ते झाले.
यात महाविद्यालयातील विद्यार्थिनींनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. यावेळी विद्यार्थ्यांनी या प्रदर्शनातील ग्रंथाची उत्सुकतेने वाचन केले तसेच ग्रंथपाल कविता राहुल भोरटके यांनी विविध ग्रंथांची उपयुक्त माहिती उपस्थितांना दिली. हे प्रदर्शनी यशस्वी करण्यास जयश्री कुलकर्णी, तेजस्विनी चौधरी, समृद्धी सराफ, रेणुका सूर्यवंशी तसेच श्रीमती मीनल राणे यांचे मोलाचे सहकार्य लाभले. प्राचार्य उज्वला मावळे यांनी मान्यवरांचे स्वागत व आभार मानले.