पुस्तक एके पुस्तक बालनाट्याचा प्रयोग उत्साहात
जळगाव लाईव्ह न्यूज । ११ जुलै २०२२ । येथील सृजन कला अकादमी आणि नाट्यरंग थिएटर जळगाव निर्मित रंगकर्मी अमोल ठाकूर लिखित आणि दिग्दर्शित बालनाट्य ‘पुस्तक एके पुस्तक’ याचे सादरीकरण भाऊंचे उद्यान या ठिकाणी काल रविवार रोजी उत्साहात पार पडले. कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून डॉ. हेमंत कुलकर्णी आणि जैन उद्योग समूहाचे व्यवस्थापक विजय मोहरी हे होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला धनश्री जोशी यांनी बुरगुंडा या भारुडाचे सादरीकरण करून प्रेक्षकांची मने जिंकली. पुस्तक एके पुस्तकचा हा ११ वा प्रयोग होता. बालनाट्याच्या प्रयोगाला मोफत प्रवेश होता. नाट्यरसिकांसह बालकांनी या प्रयोगास उपस्थिती देवून मनमुराद आनंद लुटला. या उपक्रमात बालनाट्य शिबिरातील बालकलाकारांना सहभागी करून घेण्यात आले. पुस्तके एके पुस्तक हे बालनाट्य विद्यार्थ्यांचे बालपण आणि पुस्तकी शिक्षण मार्मिक भाष्य करणारे होते. बाल कलाकारांनी तसेच तंत्रज्ञांनी आपली कामगिरी चोखपणे पार पाडली. या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. दरम्यान स्रोजन कला अकादमी तर्फे पुढील कार्यक्रमासाठी सूचना देण्यात आल्या असून यासाठी संस्थेतर्फे आवाहन करण्यात आले आहे.
पात्र परिचय प्रतीक्षा
संस्कृती पवनीकर, विद्यार्थी एक -मयंक ठाकूर, विद्यार्थी दोन -अंशा चव्हाण, मराठी – शर्वा जोशी, हिंदी – नेहा वंदना सुनिल, इंग्रजी – कृतिका कोरे, विज्ञान – कृष्णा पाटील, गणित -विकास वाघ, इतिहास -चंद्रकांत चौधरी, भूगोल -अमोल ठाकूर, नागरिक शास्त्र –अथर्व, प्रकाश योजना -स्वप्निल गायकवाड, रंगभूषा व वेशभूषा -दिशा ठाकूर, पार्श्वसंगीत -दर्शन गुजराती, धनश्री जोशी, रंगमंच व्यवस्था -ज्ञानेश्वर वाघ, सचिन महाजन, दीपक महाजन, रोहन चव्हाण, विशेष आभार जैन उद्योग समूह, हनुमान सुरवसे.