मुंबई हायकोर्टात पदवीधरांना सरकारी नोकरीचा गोल्डन चान्स; 177000 पर्यंत पगार मिळणार

नोव्हेंबर 4, 2025 1:34 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । नोकरी संदर्भ । जर तुम्ही सरकारी नोकरी शोधत असाल, तर तुमच्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात नोकरी मिळवण्याची चांगली संधी आहे. मुंबई उच्च न्यायालयाने स्टेनोग्राफर पदांसाठी भरती जाहीर केली आहे. या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया आधीच सुरू झाली असून इच्छुक उमेदवार 10 नोव्हेंबर 2025 पर्यंत अर्ज करू शकतात. उमेदवार अधिकृत वेबसाइट bombayhighcourt.nic.in ला भेट देऊन अर्ज करू शकतात. Bombay High Court Bharti 2025

Bombay High Court

भरतीसाठी पात्रता काय?

अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे ग्रॅज्युएशन पदवी असावी. लॉ ग्रॅज्युएट्स उमेदवारांना प्राधान्य दिले जाते. याचसोबत उमेदवाराला इंग्लिश शॉर्टहँड सर्टिफिकेट मिळालेले असावे. 21 ते 43 वयोगटातील उमेदवारांनी या नोकरीसाठी अर्ज करायचा आहे. याचसोबत राखीव प्रवर्गातील उमेदवारांना वयोमर्यादेत सूट मिळणार आहे.

Advertisements

परीक्षा शुल्क : अर्ज करताना उमेदवारांना 1000 रुपये शुल्क भरावे लागणार आहे.
पगार : स्टेनोग्राफर पदासाठी 56,100 ते 1,77,500 रुपये पगार मिळणार आहे. याचसोबत तुम्हाला महागाई भत्ता, एचआरए आणि इतर सरकारी अलाउंसदेखील मिळणार आहे.

Advertisements

निवड प्रक्रिया कशी असणार?
मुंबई हायकोर्टातील या नोकरीसाठी सिलेक्शन तीन स्टेजमध्ये होणार आहे.शॉर्टहँड टेस्ट होणार आहे. त्यानंतर टायपिंग टेस्ट घेतली जाणार आहे. यानंतर पर्सनल इंटरव्ह्यू होणार आहे. यानंतर मेरिट लिस्ट तयार केली जाणार आहे. परीक्षा आणि इंटरव्ह्यूची तारीख अधिकृत वेबसाइटवर दिली जाईल.

अर्ज कसा करावा?
सर्वात आधी bombayhighcourt.nic.in वेबसाइटवर जा.
यानंतर Recruitment सेक्शनवर जा. यानंतर Stenographer (Grade-3) वर क्लिक करा.
यानंतर नवीन रजिस्ट्रेशन करावे.यानंतर लॉग इन करा.
यानंतर वैयक्तिक माहिती, शैक्षणिक सर्टिफिकेट आणि इतर माहिती भरा.
यानंतर तुम्ही तुमचे कागदपत्र अपलोड करा. फॉर्म सबमिट केल्यानंतर प्रिंट आउट काढून ठेवा.

 जाहिरात (PDF)पद क्र.1: Click Here
पद क्र.2: Click Here
चारित्र्य प्रमाणपत्रClick Here
Online अर्ज पद क्र.1: Apply Online
पद क्र.2: Apply Online

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now