बोहरा समाजाला कब्रस्थानासाठी जागा मिळणार!

ऑगस्ट 10, 2022 12:34 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । अमीर पटेल । यावल शहरात वास्तव्यास असलेल्या बोहरा समाजाला कब्रस्थान मिळावे, यासाठी बोहरा समाजाचे प्रयत्न होते. अखेर प्रशासनाने त्यांच्या मागणीची दाखल घेत जिल्हाधिकारी यांनी येथील नगरपालिकेला बोहरा समाज कब्रस्तानसाठी 19 गुंठे जागा देण्या बाबतचे आदेश दिले आहे. त्यामुळे उशिरा का होई ना पण बोहरा समाजाच्या मागणीला यश आले आहे.

jalgaon 50

बोहरा समाजाला कब्रस्थानासाठी जागा मिळावी, यासाठी येथील शेखर पाटील व कदिर खान यांनी कागदपत्रांची पूर्तता करून जिल्हाधिकारी यांच्याकडे प्रस्ताव पाठविण्यात आला. जिल्हाधिकारी कार्यालयातून चौकशी करून झाल्यानंतर जिल्हाधिकारी यांनी नगरपालिकेला बोहरा समाज कब्रस्तान साठी 19 गुंठे जागा देण्या बाबतचे आदेश दि. 8. रोजी नगरपालिकांना ना दिले.यावेळी हाजी छब्बीर, प्रभाकर आप्पा सोनवणे , शेखर पाटील , कदिर भाई उपस्थित होते.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now