गुन्हेजळगाव शहर

जळगावात तरुणाचा मृतदेह आढळला, खून झाल्याचा संशय!

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । चेतन वाणी । जळगाव शहरातील शाहू नगर परिसरात असलेल्या जळकी मील ते रेल्वे ट्रॅक दरम्यान असलेल्या गटारीत एका तरुणाचा मृतदेह आढळून आला आहे. जवळच रक्त आणि काही दगड पडलेले असल्याने तरुणाचा खून झाल्याचा संशय व्यक्त होत आहे. घटनास्थळी पोलीस अधिकारी व कर्मचारी पोहचले आहेत.

जळगाव शहरातील गेंदालाल मिल परिसरात राहणारा रहीम शहा मोहम्मद शहा उर्फ रमा हा हातमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह भागवित होता. बुधवारी दुपारी ४.३० वाजेच्या सुमारास त्याचा मृतदेह जळकी मीलजवळ असलेल्या गटारीत मिळून आला. रेल्वे ट्रॅकला लागूनच असलेल्या गटारीत रमाचा मृतदेह उलटा पडलेला होता तर जवळच रक्त आणि काही दगड पडलेले होते.

घटनास्थळी अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, सहाय्यक पोलीस अधीक्षक कुमार चिंथा, एलसीबीचे निरीक्षक किरणकुमार बकाले, शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक विजय ठाकूरवाड हे पथकासह पोहचले आहेत. मयताच्या कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला असून बघ्यांची मोठी गर्दी जमली आहे. दरम्यान, रहीम शहा याचा घातपात झाल्याचा संशय व्यक्त होत असून दुपारी त्याला तीन तरुणसोबत घेऊन गेले होते अशी माहिती नातेवाईकांनी दिली आहे.

पहा व्हिडीओ प्रक्षेपण :

https://www.facebook.com/JalgaonLiveNews/videos/740743983802542

godavari advt (1)

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button