जळगाव जिल्हा
म्हसावदजवळ रेल्वे रुळावर आढळला मृतदेह
जळगाव लाईव्ह न्यूज । १५ नोव्हेंबर २०२१ । जळगाव तालुक्यातील म्हसावदजवळ रेल्वे रुळावर एका ३५ वर्षीय अनोळखी इसमाचा मृतदेह आढळून आला. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात नोंद करण्यात आली आहे.
म्हसावद जवळील रेल्वे मार्गावरील खांब क्रमांक ४०३/१६-१ जवळ एका ३० ते ३५ वर्षीय अनोळखी इसमाचा मृतदेह रविवारी आढळून आला. शेख शब्बीर रज्जाक यांनी तो मृतदेह रात्री १.४५ वाजेच्या सुमारास जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केला. वैद्यकीय अधिकारी डॉ. संदीप पाटील यांनी दिलेल्या खबरीवरून एमआयडीसी पोलिसात नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस नाईक सुनिल सोनार, पोलीस कॉन्स्टेबल किशोर बडगुजर करीत आहेत.