⁠ 
सोमवार, मे 27, 2024

गोदावरी नर्सिंग महाविद्यालयात अवतरल्या फ्लोरेन्स नाइटिंगेल; जागतिक परिचारीका दिन उत्साहात

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १४ मे २०२४ । १२ मे रोजी आंतरराष्ट्रीय परिचारिका दिन म्हणून ओळखला जातो, हा दिवस आधुनिक नर्सिंगच्या प्रणेत्या फ्लोरेन्स नाइटिंगेलचा जन्मदिवस असून जागतिक स्तरावर साजरा केला जातो, या निमीत्ताने गोदावरी नर्सिंग महाविद्यालयात जणू फ्लोरेन्स नाइटिंगेलच अवतरल्याचा आभास होत होता.

गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगच्या डॉ. अक्षता पाटील सभागृहात आयोजित कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी संस्थेचे अध्यक्ष माजी खा. डॉ. उल्हास पाटील,सचिव डॉ. वर्षा पाटील, सदस्या डॉ. केतकीताई पाटील, हदयरोग तज्ञ डॉ. वैभव पाटील,डॉ. अनिकेत पाटील, डॉ. अक्षता पाटील,डॉ.उल्हास पाटील वैद्यकिय महाविद्यालयाचे वैद्यकिय संचालक डॉ. एन एस आर्विकर,अधिष्टाता डॉ. प्रशांत सोळंके, प्रशासन अधिकारी प्रमोद भिरूड, गोदावरी नर्सिंगच्या प्राचार्य विशाखा गणविर,डॉ केतकी पाटील स्कुल ऑफ नर्सिंग संचालक शिवानंद बिरादर, नर्सिंग अधिक्षक संकेत पाटील, सहायक अधिक्षक मनिषा खरात, कार्यक्रमाचे उदघाटन दिपप्रज्वलन फ्लोरेन्स नाइटिंगेल प्रतिमेला पुष्पहार करून मान्यवरांचे हस्ते करण्यात आले.

GD

प्रमुख मान्यवरांचे स्वागत पुष्पगुच्छ देवून करण्यात आले. यानंतर फ्लोरेन्स नाइटिंगेलच्या वेषात विदयार्थ्यांनी सभागृहात प्रवेश केला.डॉ. अक्षता पाटील सभागृहाचे फित कापून उदघाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. मार्गदर्शन करतांना प्राचार्य विशाखा गणविर यांनी परिचारिका या आरोग्यसेवेचा कणा आहेत, रूग्णांच्या आरोग्याची काळजी व आरोग्य सुखकर करण्यासाठी त्या पडद्यामागे राहुन काम करतात. त्यांची करुणा, सहानुभूती आणि उपचारासाठी त्यांचे समर्पणाची दखल घेऊन कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस असतो आंतरराष्ट्रीय परिचारिका दिन २०२४ च्या शुभेच्छा! दिल्यात प्रमुख अतिथी डॉ. उल्हास पाटील यांनी मार्गदर्शन पर भाषणात वैद्यकिय तज्ञांसोबत खांद्याला खांद्या लावून परिचारीका देखिल दिवसरात्र रूग्णांची सेवा करत असतात रूग्ण बरा होण्यात त्यांचा सिंहाचा वाटा असतो असे सांगत शुभेच्छा व्यक्त केल्यात, डॉ. वर्षा पाटील यांनी सेवाभावी परिचारीकांमूळेच रूग्ण व नातेवाईकांना दिलासा मिळतो तर डॉ. अनिकेत आणि डॉ. अक्षता यांनी मार्गदर्शन केले.

यानंतर भिरूड एन्टरप्राईजेस तर्फे परिचारीकांना ५०००/- पारीतोषीक देण्यात आले. स्पंदन स्पर्धेत सहभागी व उकृष्ट सहभागाबददल सत्कार करण्यात आला.यानंतर लॅम्प लाईटिंग व परिचारीकेचे कार्य प्रामाणिकपणे करण्याची शपथ, विविध मनोरंजनात्मक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले कार्यक्रमाचे सुत्रसंचालन बीएस्सी नर्सिंगची शेख मेहविश,मानसी अहिरे यांनी तर आभार खुशबू घोष यांनी मानले यशस्वीतेसाठी गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगचे प्राध्यापक, कर्मचारी यांनी परिश्रम घेतले