---Advertisement---
बातम्या जळगाव जिल्हा बोदवड

बोदवड येथे गटारीचे बांधकाम रखडले

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । २० एप्रिल २०२२ । बोदवड शहरातील जामठी रोडवरील नयनतारा नगर ते दिवाणी व फौजदारी न्यायालयापर्यंत गटारीचे बांधकाम लवकरात लवकर करा, अन्यथा आंदोलन करू असा इशारा सामाजिक कार्यकर्ते जफर मण्यार यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता यांना दिला.

sandpani

बोदवड शहरातील जामठी रोडवरील नयनतारा नगर ते दिवाणी व फौजदारी न्यायालयाकडे जाणारी गटारीच्या बांधकामासाठी तीन महिन्यांपूर्वी वर्कऑर्डर मिळाली आहे. तरी देखील काम सुरू होत नाही. गटार नसल्यामुळे सांडपाणी रस्त्याच्या आजू बाजूला व घरात शिरत असल्याची तक्रार जामठी रोड ते नयनतारा नगर रहिवासी करत आहे.

---Advertisement---

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---