⁠ 
शनिवार, मे 4, 2024

भडगाव येथे ३० जानेवारीला रक्तदान शिबिराचे आयाेजन

जळगाव लाईव्ह न्यूज । २७ जानेवारी २०२२ । भडगाव येथील माउली फाउंडेशनच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबवले जातात. त्या अंतर्गत गेल्या पाच वर्षांपासून सलग रक्तदान शिबिर आयोजित केले जात आहे. रक्तदान श्रेष्ठ दान असून रक्तदान केल्यामुळे अनेकांचे प्राण वाचू शकतात. कोरोनामुळे रक्ताचा तुटवडा निर्माण झाला असून त्यासाठी या शिबिराचे आयाेजन करण्यात आले आहे.

याबाबत फाउंडेशनचे स्वयंसेवक जाकीर कुरेशी यांनी अधिक माहिती दिली. माऊली फाउंडेशन दरवर्षी रक्तदान शिबिराचे आयोजन करते. त्याला भरभरून प्रतिसाद मिळतो. रक्तदान शिबिर यशस्वी होण्यासाठी सर्व स्वयंसेवक संपूर्ण भडगाव शहर व तालुक्यात फिरून रक्तदान करणाऱ्या इच्छुक नागरिकांचा अर्ज भरून नोंदणी करुन घेतात. यावर्षी होणारे रक्तदान शिबिर माऊली फाउंडेशनसाठी महत्त्वपूर्ण असून ते भव्य करण्याचा मानस कुरेशींनी बोलून दाखवला.

येत्या ३० जानेवारीला शहरातील निदान हाॅस्पिटल, भवानी बागेसमोर, पारोळा रोड येथे सकाळी ७ ते दुपारी ३ वाजेपर्यंत हे शिबिर हाेईल. जास्तीत जास्त तरुण, नागरिकांनी रक्तदान करावे, असे आवाहन आयाेजकांनी केले. या शिबिरासाठी नोंदणी सुरू असल्याची माहिती फाउंडेशनचे सचिव देवेंद्र पाटील यांनी दिली. यावेळी दिलीप महाजन, एकनाथ महाजन उपस्थित होते.

हे देखील वाचा :