शिवसेनाप्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त जळगावात रक्तदान शिबीर
जळगाव लाईव्ह न्यूज । १७ नोव्हेंबर २०२२ । शिवसेनाप्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त युवासेना व शिवसेनेच्या वतीने जळगावातील रेडक्रॉस सोसायटी येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराला नागरिकांचा उस्फुर्त प्रतिसाद मिळाला.
याशिबिराची सुरुवात शिवसेनाप्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे माल्यार्पण करून करण्यात आली. या प्रसंगी शहराच्या प्रथम नागरिक व महापौर, जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेडच्या संचालिका आणि जळगाव जिल्हा सरकारी नोकरांची सहकारी पतपेढीच्या तज्ज्ञ संचालिका जयश्री सुनिल महाजन, शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, महानगरप्रमुख शरद तायडे, युवासेनेचे विभागीय सचिव विराज कावडिया, युवासेना जिल्हायुवाधिकारी पियुष गांधी, युवासेना कॉलेज कक्ष जळगाव लोकसभा प्रमुख प्रितम शिंदे, उपजिल्हायुवाधिकारी विशाल वाणी, ज़िल्हा युवा चिटनीस अंकित कासार, महानगर युवा अधिकारी अमोल मोरे, यश सपकाळे, महानगर युवा समानवयक महेश ठाकुर,विधानसभा शेत्र युवाअधिकारी अमित जगताप यांच्यासह अनेक शिवसैनिक व युवासैनिक उपस्थित होते. यावेळी युवासेनेतर्फे सर्वांचे आभार मानण्यात आले.