⁠ 
शनिवार, एप्रिल 20, 2024

चांगल्या रस्त्यासाठी आमदार आले रस्त्यावर : आंदोलनाचा दिला इशारा

जळगाव लाईव्ह न्यूज । २२ मे २०२३ ।  अडावद येथील बस स्थानाकासमोर राष्ट्रीय महामार्ग दुरुस्तीसाठी आमदार लता चंद्रकांत सोनवणे यांनी माजी आमदार चंद्रकांत सोनवणे यांच्या नेतृत्वात शेकडो कार्यकर्त्यांसह रास्ता रोको केला. यावेळी प्राधिकरणाने सात दिवसात रस्त्याचे काम करण्याचे लेखी आश्वासन दिले. सात दिवसांत काम सुरू न झाल्यास शिवसेना स्टाईलने आंदोलन करू असा ईशारा यावेळी आमदार लता सोनवणे यांनी महामार्ग प्राधिकरणाच्या अभियंत्यास दिला.

२१ रोजी सकाळी ९ वाजता अंकलेश्वर – बुऱ्हाणपूर महामार्गावर अडावद बस स्थानाकासमोर आमदार लता सोनवणे यांनी शेकडो कार्यकर्त्यांसमवेत माजी आमदार चंद्रकांत सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको आंदोलन केले. प्रकल्प महाप्रबंधक शिवाजी पवार, महामार्ग प्राधिकरण उपप्रबंधक तकनिकी अभियंता स्वतंत्र गौरव स्वतंत्र गौरव , चंदन गायकवाड , दिग्विजय पाटील, तहसिलदार अनिल गावित यांनी लेखी स्वरूपात पत्रावर लवकरात लवकर कामाला सुरूवात करू असे लेखी पत्र देऊन आश्वस्त केले. त्यानंतरच आंदोलन मागे घेण्यात आले.

यावेळी सरपंच भावना पंढरीनाथ माळी, ग्रामपंचायत सदस्य भारती सचिन महाजन, नायजा बारेला, ग्रामपंचायत सदस्य जावेदखा पठाण, विधानसभा संघटक सुकलाल कोळी, विकासो चेअरमन रमेशचंद्र काबरा, कृषि उत्पन्न संचालक रावसाहेब पाटील शिवराज पाटील, गोपाल पाटील, नरेद्र पाटील, किरण देवराज, पंचायत समितीचे माजी सभापती माणिकचंद महाजन, माजी नगरसेवक राजेद्र जैस्वाल, विकास पाटील, दिपक चौधरी, कांतिलाल पाटील, सुनिल बरडिया आदिवासी सेवक संजय शिरसाठ, मंगल इंगळे,विकासो चेअरमन रमेशचंद्र काबरा, संजय मुरलीधर पाटील, संचालक सचिन महाजन, प्रकाश महाजन, प्रभाकर महाजन, वासुदेव महाजन, वरगव्हान सरपंच भूषण पाटील, वडगावाचे सरपंच कडू कोळी, नामदेव पाटील, विकासो चेअरमन रमेशचंद्र काबरा, बबलु कोळी, कृषी उत्पन्न बाजार समिती उपसभापती यावल