⁠ 
मंगळवार, सप्टेंबर 17, 2024

सावधान : रिक्षा चालकांनी मीटरप्रमाणे भाडे नाकारल्यास परवाना रद्द होणार

0
rickshaw driver refuses to pay the fare as per the meter, the license will be suspended

जळगाव लाईव्ह न्यूज । १० मार्च २०२१ । सर्व ऑटोरिक्षा चालकांना परवाना अटीप्रमाणे प्रवासी वाहतूक करतांना मीटरप्रमाणे भाडे घेणे बंधनकारक आहे, असे न केल्यास संबंधित रिक्षाचालकांचा परवाना रद्द करण्यात येणार आहे.

एखाद्या प्रवाशाने मीटरप्रमाणे भाडे देऊ असे म्हटल्यास रिक्षा चालकाने मीटरप्रमाणे भाडे घेणे अनिवार्य असुन ही बाब कायदेशिर आहे. परंतु उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, जळगाव येथे शहरातील अनेक प्रवाशांनी तक्रार केली आहे की, रिक्षा चालक मीटरप्रमाणे भाडे घेण्यास नकार देतात व ही बाब रिक्षा परवान्याचे उल्लंघन करणारी आहे.

सर्व ऑटोरिक्षा परवाना धारकांना आवाहन व सुचित करण्यात येते की, त्यांनी ऑटोरिक्षा फेअरमीटर कॅलिब्रेशन करुन घ्यावे तसेच प्रवाश्यांचा मागणी असल्यास फेअरमीटरचा वापर करुन प्रवाशी वाहतूक करावी अन्यथा अशाप्रकारचे पालन न करणाऱ्या परवाना धारकाविरुद्ध मोटार वाहन कायाद्यातील तरतुदीनुसार परवाना निलबंनाची दंडात्मक कारवाई करण्यात येईल.

तसेच जळगाव शहरातील तमाम नागरिकांना कळविण्यात येते की, जळगाव शहरात ऑटो रिक्षाचालक आपणाकडून मीटरप्रमाणे भाडे आकारणी करीत नसतील तर आपण अशा ऑटो रिक्षा चालकाविरुद्ध उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, जळगाव कार्यालयाच्या दुरध्वनी क्रं. 0257-2262619 किंवा [email protected]  या संकेतस्थळावर तक्रार करावी. त्यानुसार संबंधित परवाना धारकाविरुद्ध कायद्यातील तरतुदीनुसार दंडात्मक कारवाई करण्यात येईल. असे श्याम लोही, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, जळगाव यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.

मुरघास निर्मितीकरीता अर्थसहाय्य 15 मार्चपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

0
Collector-Office-Jalgaon

 

जळगाव लाईव्ह न्यूज । १० मार्च २०२१ । राष्ट्रीय पशुधन अभियान अंतर्गत मुरघास निर्मितीकरीता सायलेज बेलर मशीन युनिट स्थापन करणेसाठी जिल्ह्यातील फक्त एका संस्थेस अर्थसहाय्य देण्यात येणार आहे. सदर योजनेचा लाभ, दुध उत्पादक सहकारी संघ, संस्था, शेतकरी उत्पादक कंपनी, स्वयं सहाय्यता बचत गट, गोशाळा, पांजरापोळ संस्था अशा सर्वसाधारण प्रवर्गातील संस्थांनाच प्राध्यान्यक्रमाणे द्यावयाचा आहे. सदर संस्थेची शिफारस जिल्हास्तरीय राष्ट्रीय पशुधन अभियान समितीमार्फत करण्यात येणार आहे. 

 

सदर योजनेसाठी एका युनीटचा एकुण अंदाजित खर्च रुपये 20 लक्ष असून अनुदानाची रक्कम रुपये 10 लक्ष आहे. उर्वरित खर्च रुपये 10 लक्ष  इच्छुक संस्थेने करावयाचा आहे. सदर पात्र संस्था यांना शासन निर्णयातील सर्व अटी शर्तीचे पालन करुन व मागणीनुसार मुरघास उपलब्ध करणे बंधणकारक असणार  आहे याची नोंद घ्यावी. अर्ज सादर करणेची अंतिम मुदत दि. 15 मार्च, 2021 आहे.

 

सदर अर्ज पशुधन विकास अधिकारी विस्तार पंचायत समिती यांचेकडे उपलब्ध आहे. तरी पात्र संस्थांनी अर्ज करण्याचे आवाहन डॉ. शामकांत पाटील, जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त, जळगाव यांनी एका प्रसिद्घी पत्रकान्वये केले आहे.

पारोळ्यात विना माॅस्क फिरणाऱ्यांवर दंडात्माक कारवाई

0

 

 

पारोळा नगरपालिकेच्या वतीने आज शहरात विना मास्क वावरणाऱ्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली.

या कारवाईत  टी.डी.नरवाळे आरोग्य निरीक्षक, एच.एम पाटील, आशोक लोहार, संदीप पाटिल, अभियंता काकडे, न पा अभियंता तलवारे,श्री सौपुरे, निर्भय मोरे, अनिल नरवाळे, सतीश सानफ, राहुल साळवे, व पोलीस कॉन्स्टेबल राकेश पाटील, ईश्वर पाटील,यांनी कारवाई केली.

यावेळी शहरासह तालुक्यातील विना मास्क व ट्रिबल  सीट मोटारसायकल वाल्यांवर पोलीस व नगरपालिकेच्या माध्यमातून दंडात्मक कारवाई करण्यात आली. 

गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीत आढळला प्रौढाचा मृतदेह

0
crime

 

जळगाव लाईव्ह न्यूज । १० मार्च २०२१ । चाळीसगाव तालुक्यातील उंबरखेड येथील बेपत्ता झालेल्या प्रौढाचा देवळी शिवारातील विहिरीत मृतदेह आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. तुकाराम धर्मा महाले (वय- ४६ रा. उंबरखेड) असे मृत प्रौढाचे नाव आहे.  याप्रकरणी मेहुणबारे पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आले आहे. 

 

तुकाराम धर्मा महाले (वय- ४६ रा. उंबरखेड) ता. चाळीसगाव आपल्या पत्नी व मुलांबरोबर येथे वास्तव्यास होता. तुकाराम महाले हा लहानपणापासून मनोरूग्ण होता. दरम्यान त्यांच्यावर उपचार सुरू होता. तो आपला मामा रमेश बागूल रा. वरखेडे यांच्या सलूनच्या दुकानात कामाला जात असे. दि. २ मार्च रोजी सकाळी ६:३० वाजताच्या सुमारास तुकाराम महाले हा कामासाठी वरखेडे येथे गेले असता घरी परतलाच नाही. शोधाशोध केली असता मिळून आला नाही. म्हणून चुलत भाऊ रोहित महाले यांनी मेहूनबारे पोलिस ठाण्यात हरवल्याची खबर ५ मार्च रोजी देण्यात आली होती.

 

दरम्यान तालुक्यातील उंबरखेड शिवारातील देवळी येथील पाणीपुरवठा करणाऱ्या विहीरीत ९ मार्च रोजी एका इसमाचे मृतदेह असल्याचे दिसून आले. परिसरात एकच खळबळ उडाली असून याच विहीरीतून गावाला पाणीपुरवठा होत असल्याने गावकऱ्यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. याबाबत कुणाल महाले यांनी मेहूनबारे पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिस निरीक्षक पवन देसले यांच्या निर्देशानुसार पुढील तपास सुरू आहे.

जळगावात ‘जनता कर्फ्यू’ जाहीर होताच तेलाचे दर भडकले

0
oil

जळगाव लाईव्ह न्यूज । १० मार्च २०२१ । कालच जिल्हाधिकाऱ्यांनी जळगाव शहरात ३ दिवसांचा जनता कर्फ्यू जाहीर केलाय. त्यानंतर लागलीच चार महिन्यांपासून स्थीर असलेल्या तेलाच्या दरात अचानक वाढ झाली आहे.

साेयाबीन तेलाच्या दरात प्रतिकिलाे चार रुपये तर सनफ्लाॅवर तेलाच्या दरात ६ रुपयांची वाढ कंपन्यांतर्फे करण्यात आली आहे. दरम्यान, शेंगदाणा तेलाच्या दारात मात्र वाढ झाली नाहीये. गेल्याच वर्षी लाॅकडाऊनच्या काळात तेलाच्या दरात माेठी वाढ झाली हाेती. ती दिवाळीपर्यंत कायम राहिली हाेती.

साेयाबीन तेलाचे दर प्रति १५ किलाेचे २४५० रुपये हाेते. अर्थात, साेयाबिन तेल १८०० वरुन २०६० झाले हाेते. तर सूर्यफुलाचे तेल २१०० रुपयांवरुन २५०० रुपयांवर गेले हाेते. हे दर ८ मार्चपर्यंत कायम हाेते. काल जिल्ह्याधिकाऱ्यांनी ३ दिवसांत जनता कर्फ्यू लागू करताच साेयाबीन तेल १५ किलाे २०६० रुपयांवरुन २१२० रुपये तर सूर्यफुल १५ किलाे २५५० रुपयांवरुन २६५० रुपये झाले आहे.

सोनसाखळी चोरणाऱ्या टोळीचा पर्दाफाश : मुद्देमालासह तिघांना अटक

0
gold chain gang busted three arrested

 

 जळगाव लाईव्ह न्यूज । ९ मार्च २०२१ ।  शहर व इतर जिल्ह्यात महिलांच्या सोनसाखळी चोरी करणाऱ्या टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश केला असून तिघांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून तब्बल १८ गुन्हे उघडकीस आले असून त्यातील १३९ ग्रॅम वजनाच्या सोनसाखळ्या हस्तगत करण्यात आल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली.

 

आकाश ज्ञानेश्वर सूर्यवंशी (रा.प्रजापत नगर), अमोल उर्फ रामेश्वर राजेंद्र अहिरे (विठ्ठल पेठ) व सागर राजेंद्र चौधरी (रा.जुने जळगाव) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींचे नावे आहे. 

 

सोनसाखळी चोरल्यानंतर त्या कमी किमतीत विकत घेणारा सराफ व्यावसायिक दीपक शिवराम भडांगे (रा.ज्ञानदेव नगर) यालाही आरोपी करण्यात आले आहे, दुसरा एक सराफा मोहन घाटी हा मयत झालेला आहे. दरम्यान, गुन्ह्यात वापरलेल्या तीन महागड्या दुचाकीही जप्त करण्यात आलेल्या आहेत. २०२० या वर्षात अखेरच्या महिन्यात सोनसाखळी चोरीच्या तब्बल २० घटना घडल्या होत्या व त्यापैकी एकही घटना उघडकीस न आल्याने पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे व अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे स्वतंत्र पथक नियुक्त केले होते. आकाश व सागर हे सोनसाखळी चोरी करुन पुण्यात पलायन करीत असल्याची माहिती कॉन्स्टेबल परेश महाजन या कर्मचाऱ्याला मिळाली होती. त्यानुसार पोलीद निरीक्षक किरणकुमार बकाले यांनी उपनिरीक्षक सुधाकर लहारे, रवींद्र गिरासे, सहायक फौजदार विजय देवराम पाटील, हवालदार विजयसिंग पाटील, सुधाकर अंभोरे, शरद भालेराव, रामकृष्ण पाटील यांचे पथक पुण्याला रवाना केले होते. सलग दोन महिने पाळत व पुरावे गोळा करुन या पथकाने पुण्यातून आकाश याला अटक केली.

Padmalay Jalgaon- जगात एकमेव असणारे श्री क्षेत्र पद्मालय देवस्थान

0
padmalaya erandol

जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव (Jalgaon) शहरापासून केवळ ३० किलोमीटरवर असलेल्या एरंडोल तालुक्यातील श्री क्षेत्र पद्मालय विषयी आज आपण जाणून घेणार आहोत.

पद्मालय मंदिर (Padmalay Jalgaon) भारतातील अडीच गणपती पिठांमध्ये आहे. हे मंदिर अर्धा पीठ म्हणून सन्मानित आहे. मंदिरामध्ये दोन स्वयंभू दोन गणेश मूर्ती आहेत – आमोद आणि प्रमोद. जगात केवळ पद्मालय येथे श्रींच्या दोन मूर्ती असल्याचे सांगितले जाते. या दोन्ही मूर्तींमध्ये प्रवाळ आहेत आणि त्यांच्या उजव्या कवटीचे त्रिशंकण उजवीकडे आहे आणि दुसरा एक डाव्या बाजूला आहे. दोन्ही मूर्ती स्वयंभू आहेत हे मंदिर दगडांच्या आतील बाजूस बनले आहे.

padmalaya shri ganesha
श्री क्षेत्र पद्मालय येथील दोन स्वयंभू दोन गणेश मूर्ती – आमोद आणि प्रमोद

पद्मालय हा शब्द ‘पद्म’ आणि ‘आलय’ या दोन शब्दांचा मिलाफ आहे ज्याचा संस्कृतमध्ये अर्थ कमळाचे घर असा होतो. मंदिराच्या जवळील तलाव कायम कमळाच्या फुलांनी भरलेला असतो. त्यामुळे मंदिरांला पद्ममालय असे म्हटले जाते.

पौराणिक कथांनुसार असे म्हटले जाते की भीमाने बकासुराला लढाईत पराभूत केले. लढाई नंतर तहान भागवण्यासाठी त्याने जमिनीवर कोपर धरला आणि तेथे तलाव तयार झाला. या ठिकाणाला भीमकुंड असे म्हटले जाते आणि ते पद्मालय जवळ आहे.

हे मंदिर टेकडीच्या वरती आहे आणि अनेक लहान मंदिरे वेढलेला आहे. येथे 440 कि.ग्रा. वजनाचा एक मोठा घंटा आहे. विविध औषधी वनस्पती आणि औषधी वनस्पती पद्मलाय मंदिराच्या परिसरात आढळतात.

padmalaya
श्री क्षेत्र पद्मालय येथील निसर्गरम्य परिसर

मंदिर पुरातन असून मंदिराची संपूर्ण बांधकामाची रचना ही हेमाडपंथी आहे. मंदिरात डाव्या-उजव्या सोडेंचे गणपती आहे. मंदिरासमोर भव्य घंटा असून प्रवेशद्वाराजवळ मोठे जाते आहे. मंदिरापासून सुमारे दोन ते तिन किलोमीटरच्या अंतरावरील घनदाट अरण्यात भिमकुंड आहे. श्री क्षेत्र पद्मालय जागरूक देवस्थान समजले जाते. त्यामुळे अंगारकी चतुर्थी तसेच संकष्ट चतुर्थीला येथे मोठ्या प्रमाणावर भाविकांची गर्दी असते.

श्री क्षेत्र पद्मालायाला पर्यटन स्थळाचा दर्जा दिल्यास मंदिर परिसरात विकास होवून पर्यटक संख्येत वाढ होईल. पर्यायाने स्थानिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होईल. स्थानिक राजकारण्यांनी येथील विकासाकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे.

श्री क्षेत्र पद्मालय येथे कसे जावे?

जळगाव, एरंडोल, पारोळा येथून श्री क्षेत्र पद्मालय येथे जाण्यासाठी बसेस उपलब्ध आहेत. एरंडोल येथून अनेक खाजगी वाहने देखील उपलब्ध असतात. जळगाव व धरणगाव येथून सर्वाधिक जवळ असणारे रेल्वे स्थानक आहेत. तसेच विमानाने येण्यासाठी जळगाव व औरंगाबाद येथील विमानतळ जवळ आहेत.

लोकसेवा आयोग परिक्षा केंद्राच्या 100 मीटर परिसरात प्रवेशास बंदी

0
mpsc state service exam notification

जळगाव लाईव्ह न्यूज । ९ मार्च २०२१ । महाराष्ट्र लोकसेवा आयोग राज्यसेवा पुर्व परिक्षा 2021 जळगाव शहरात दि. 14 मार्च  2021 रोजी एकुण 16 उपकेंद्रावर सकाळी 10.00 ते दुपारी 12.00 व दुपारी 3.00 ते 5.00 या वेळेत घेण्यात येणार आहे.

सदर परीक्षेच्या वेळी गैरप्रकार होऊ नयेत. तसेच परीक्षा केंद्राच्या ठिकाणी शांतता व सुव्यवस्थेस बाधा उत्पन्न होवू नयेत.यासाठी खबरदारीचे उपाय म्हणून जिल्हादंडाधिकारी जळगाव अभिजीत राऊत हे फौजदारी प्रक्रीया संहिता 1973 चे कलम (1)(2 व (3) खाली प्रदान करण्यात आलेल्या अधिकारानुसार खालील प्रमाणे आदेश देत आहे.

दिनांक 14 मार्च 2021 रोजी सकाळी 10.00 ते दुपारी 12.00 व दुपारी 3.00 ते 5.00 वाजेपावेतो जळगाव शहरातील एकुण 16 परीक्षा केंद्राचे 100 मीटर परिसरात कोणीही प्रवेश करु नये. सदर आदेश परिक्षार्थी, नियुक्त कर्मचारी, अधिकारी, पोलीस होमगार्ड यांचेसाठी लागु होणार नाही.

सर्व संबंधितांवर वैयक्तिकरित्या नोटीस बजाविण्यास पुरेसा कालावधी नसलेने फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम (2) नुसार एकतर्फी काढण्यात येत आहे. असे आवाहन जिल्हादंडाधिकारी अभिजीत राऊत, जळगाव यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.

व्हिडीओ : जनता कर्फ्युचे पालन करण्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील आवाहन

0

जळगाव लाईव्ह न्यूज । ९ मार्च २०२१ । कोरोनाची साखळी तोडण्यासाठी नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे आणि जनता कर्फ्युचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन पालकमंत्री आमदार गुलाबराव पाटील यांनी केले आहे.

जळगाव शहरातील व्यापारी आणि स्वंयसेवी संस्थांनीदेखील प्रशासनास सहकार्य करावे. कोरोना साखळी तोंडणे आणि संसर्ग कमी करणे ही आपली सर्वांची जबाबदारी असून त्यादृष्टीने जनता कर्फ्युचे पालन करणे आवश्यक आहे. नागरीकांनी प्रशासनास सहकार्य करुन कोरोनाच्या विरुध्दच्या या लढ्यात आपला सहभाग नोंदवावा, असे पालकमंत्र्यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.