⁠ 
शुक्रवार, नोव्हेंबर 15, 2024

कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रूग्णांच्या अंत्यसंस्कारासाठी लागणाऱ्या साहित्याची जबाबदारी घेणार ; आ गिरीश महाजन

0
girish mahajan

जळगाव लाईव्ह न्यूज । २८ एप्रिल २०२१ । राज्यात रक्ताचा तुटवडा पाहता सर्वत्र रक्तदान शिबीरांचे आयोजन करण्यात येत आहे जामनेर तालुका भारतीय जनता पक्षाच्या युवा मोर्चा जामनेर तालुका यांच्या वतीने  दि २६ रोजी बाबाजी राघो पाटील मंगल कार्यालयात सकाळी १० वाजता राज्याचे माजी मंत्री आमदार गिरिष महाजन यांनी पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून शिबिराचा शुभारंभ केला.

या वेळी ७०० रक्तदात्यांनी रक्तदानासाठी नोंदणी केली होती. परंतु कोरोना च्या पार्श्वभूमीवर ५१ रक्तदात्यांनीच  रक्त दान करावे अशी माहिती तालुका युवक अध्यक्ष निलेश चव्हाण यांनी दिली या वेळी दोन युवकांनी आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने रक्तदान करून रक्तदान शिबिरास सुरवात केली. या प्रसंगी आमदार गिरिष महाजन यांनी कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रूग्णांची अंत्यसंस्कारासाठी लागणाऱ्या साहित्याची जबाबदारी भारतीय जनता पार्टी, जामनेर तालुक्याच्या वतीने घेण्यात येईल अशी माहिती जामनेरात पत्रकारांशी बोलतांना भाजपा नेते आ गिरीश  महाजन यांनी दिली .कोरोना या आजाराने सर्वत्र थैमान माजवल आहे , दिवसागणीक अनेक ठिकाणी कोरोना रुग्णांची मृत्यु पावल्याचे संख्या वाढीस लागत आहे.

सर्व सामान्य नागरिक घरातील नातेवाईकांना दवाखान्यात उपचारा साठी दाखल करतात , त्यांच्या उपचाराचा खर्च , व उपचार घेतांना रुग्ण दगावल्यास त्यांच्या वर करण्यात येत असलेले अंत्यसंस्कारा चा खर्च करने इतपत ही अनेकांची परिस्थिती राहत नाही. ही जाणीव ठेवता आपलं कर्तव्य  म्हणून कोरोना आजाराने मयत झालेल्या रुग्णांचा अंत्यसंस्काराचा खर्च जामनेर तालुका भारतीय जनता पक्षाच्या वतीने करण्यात येईल व स्मशानभूमी पर्यंत गाडीची व्यवस्था मोफत करण्यात येईल. तालुकभरासह जिल्हाभर कोईड च्या पार्श्वभूमीवर आपण स्वतः व कार्यकर्त्यांच्या माध्यमातून रुग्णसेवा अहोरात्र करीत आहोत याची पूर्ण माहिती जनतेला असून कुणीतरी हातात पोश्टर घेऊन आमदार गेले कुठे ही चमकोगिरी थांबवून त्यांनीही अश्या परिस्थितीत जनसेवा करावी असा टोलाही आ महाजन यांनी लगावला शहरातील बाबाजी राघो मंगल कार्यालय येथे रक्तदान शिबीर घेण्यात आले.

यावेळी आ गिरीश महाजन यांनी भेट दिली. सर्व नागरीकांनी स्वताः सह इतरांची काळजी घ्या , दिलेले शासन आदेश सुचना पाळा असे आवाहन ही केले.

याप्रसंगी भाजपा जिल्हाध्यक्ष राजुमामा भोळे, जिल्यातील पदाधिकारी, ता अध्यक्ष चंद्रकांत बावस्कर, जितेंद्र पाटील, युवक अध्यक्ष निलेश चव्हाण, मयूर पाटील, सुभाष पवार नगरसेवक प स सभापती, सदस्य, जि प सदस्य कार्यकर्ते हजर होते.

अल्पवयीन मुलीला फूस लावून पळविले

0
crime (1)

जळगाव लाईव्ह न्यूज । २८ एप्रिल २०२१ । जळगाव शहरातील शिवाजीनगर परिसरात असलेल्या राजमालती नगरातील १६ वर्षीय मुलीला अज्ञात आरोपींनी फूस लावून पळवून नेले आहे.

दि. २६ च्या रात्री १० वाजेपासून दि.२७ च्या पहाटे ५ दरम्यान हा प्रकार घडला आहे. याप्रकरणी शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोलीस उपनिरीक्षक जगदीश मोरे करीत आहे.

पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या नावे बनावट फेसबुक खाते ; मित्रांना पैशांची मागणी

0
crime

जळगाव लाईव्ह न्यूज । २८ एप्रिल २०२१ । गेल्या काही वर्षात सोशल मिडियाद्वारे होणाऱ्या फसवणुकीच्या प्रकारात मोठी वाढ झाली आहे. अलीकडच्या काळात चक्क वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या नावे बनावट फेसबूक खाते तयार करून त्यांच्याच मित्रांना पैशांची मागणी करण्याचे प्रकार वाढू लागले आहे. गेल्या ४ दिवसात दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बाबतीत हे प्रकार घडल्याने मोठी खळबळ उडाली आहे. यवतमाळ पोलीस अधीक्षक आणि धुळे अपर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव यांच्या नावे बनावट फेसबूक खाते तयार करण्यात आले होते.

जळगाव शहरात गेल्या महिन्यात पोलीस कर्मचारी मनोज सुरवाडे यांच्या नावे आणि पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या नावे बनावट फेसबूक खाते तयार करून मित्रांना पैसे मागण्याचा प्रकार घडला होता. दोन्ही प्रकार ताजे असतानाच आणखी दोन प्रकार समोर आले आहेत.

यवतमाळचे जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. दिलीप पाटील-भुजबळ हे असून ‘एसपी यवतमाळ’ हे कार्यालयीन फेसबुक अकाऊंट आहे. कुणीतरी ‘एसपी यवतमाळ’ नावाचे फेसबुक खाते तयार करुन त्यावर पोलिस अधिक्षकांचा फोटो अपलोड केला. आरोपीने त्यांचे मित्र आणि नातेवाईकांसोबत चॅटींग करत आर्थिक अडचण दाखवत पैशांची मागणी सुरु केली. गुगल पे असल्यास तातडीने पैशांची मागणी केल्यामुळे सकारात्मक प्रतिसाद मिळाला. या सर्व प्रकाराचा एका मित्राला संशय आला. त्याने थेट पोलिस अधिक्षकांसोबत संपर्क साधत हा गैरप्रकार लक्षात आणून दिला. त्यामुळे पोलिसांनी हे बनावट खाते तात्काळ बंद करत यवतमाळ शहर पोलिस स्टेशनला तक्रार दाखल केली आहे. त्या तक्रारीच्या आधारे बनावट खाते तयार करणाऱ्या अज्ञाताविरुद्ध विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला.

सोमवारी धुळे येथील अपर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव यांच्या नावे बनावट फेसबुक अकाउंट तयार करण्यात आले होते. मंगळवारी त्यांच्या ओळखीतल्या मित्रांना फ्रेंड रिक्वेस्ट पाठवून त्यांना पैशांची मागणी करण्यात आली. काही मित्रांसोबत हा प्रकार घडल्याने त्यांनी अपर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव यांना कळविले, त्यांनी तात्काळ सायबर सेलला याबाबत तक्रार केली.

पाचोरा ग्रामीण रुग्णलयात लसीकरण बंद ; नागरिक लसीकरणाच्या प्रतीक्षेत

0
pachora

जळगाव लाईव्ह न्यूज । २८ एप्रिल २०२१ । मागील काही दिवसापासून पाचोरा ग्रामीण रुग्णालयात लसीकरण बंद आहे. 27 तारखेपासून हे लसीकरण बंद आहे तसेच नागरिक रोज सकाळी 7.30 वाजे पासून लसीकरण केंद्रा बाहेर येऊन बसत आहे. ज्या दिवशी लसीकरण असते त्या दिवशी फक्त काहीच नागरिकांचे लसीकरण होत आहे व बाकीचे पुन्हा खाली हाथी घरी परत जात आहे. 

लसीकरण केंद्रा बाहेर नेहमी ‘लसीकरण बंद’ अशा प्रकारचा बोर्ड लागला आहे त्या मुळे नागरिकाना समजत नाही की लसीकरण चालू आहे की बंद आहे.यात वयवृद्ध नागरिकांचे हाल जास्त होत आहे. खेड्या पाड्या वरून रोज सकाळी येणे वाहन मोठ्या मुश्किलीने मिळत आहे. उन्हात बसणे त्यात अनेक प्रकारच्या अडचणी नंतर कळते आहे की लसीकरण बंद आहे.

आज 28 एप्रिल रोजी नागरिक लस घेण्यासाठी आले होते पण आज देखील लसीकरण बंद आहे.लसीकरण कधी सुरु होणार आहे यासाठी जळगाव लाईव्ह पाचोरा तालुका प्रतिनिधी विजय बाविस्कर यांनी पाचोरा तालुका आरोग्य अधिकारी डॉ समाधान वाघ याच्याशी संपर्क केला डॉ समाधान वाघ यांनी दिलेल्या माहिती नुसार 28 एप्रिल 29,30 एप्रिल असे दोन तीन दिवस लसीकरण बंद असणार आहे कारण लसीची पूर्तता  झाली नाही आहे. तसेच नागरिकांना हे उत्तर मिळताच तीव्र नाराजगी जाहीर केली आहे.

आजचा सोने चांदीचा भाव : २८ एप्रिल २०२१

0
gold
Image Credit : ansjewelry.com

जळगाव लाईव्ह न्यूज । २७ एप्रिल २०२१ । गेल्या काही दिवसांपासून स्थिर असलेल्या सोन्याच्या भावात आज किंचित घट झाल्याचे पाहायला मिळाले आहे.  तर आज चांदीच्या भावात कोणताही बदल झालेला नाही.

सोन्याचा भाव

२४ कॅरेट १ ग्राम सोन्याचा भाव  १६ रुपयांनी कमी होऊन  ४,७८६ रुपये झाला आहे. १० ग्रामचा दर ४७,८६० रुपये इतका आहे. २२ कॅरेट सोन्याचा प्रति ग्राम भाव ४,५५८ रुपये इतका असून १० ग्रामसाठी तुम्हाला ४५,५८० रुपये मोजावे लागतील.

 

चांदीचा भाव 

मात्र, आज चांदीच्या भावात कोणताही बदल झाल्याचे पाहायला मिळाला आहे.  १ ग्राम चांदीचा भाव आज ७४ रुपये इतका असून १ किलोचा दर ७४,००० रुपये इतका आहे.

 

दरम्यान, कोरोनामुळे जगभर अनिश्चिततेचे वातावरण आहे. त्यामुळे शेअर बाजारांत घसरण होत आहे. त्यामुळे गुंतवणूकदार तेथून गुंतवणूक काढून सोनेखरेदीवर भर देत आहेत. त्यामुळे सोन्याचा भाव वाढण्याची शक्यता आहे.

पातखेडे नजीक गँस टँकर व मालवाहू आयशरची समोरासमोर धडक ; तीन जण जखमी

0
erandol accident

जळगाव लाईव्ह न्यूज । २७ एप्रिल २०२१ । इन्डेन गँस टँकर व मालवाहू आयशर ट्रक या परस्पर विरूद्ध दिशेने जाणारी दोन्ही वाहने समोरासमोर धडकल्याने दोन्ही वाहनांच्या चालकांसह एक क्लिनर जखमी झाल्याची घटना आज मंगळवारी सायंकाळी ५ वाजेला सुमारास पातरखेडे गावानजीक घडली. 

जेजी- ०६ एएक्स ७६०० या क्रमांकाचा इन्डेन गँस टँकर पारोळ्याकडून येऊन जळगावच्या दिशेने जात होता तर जेजी- ०९ झेड ०७०१ या क्रमांकाचा रिकामा ट्रक पारोळ्याच्या दिशेने जात होता. या दोन्ही वाहनांची आमने-सामने टक्कर होऊन तीन जण जखमी झाली आहेत. घटनेचे वृत्त समजताच पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव,सहायक पोलिस निरीक्षक तुषार देवरे,संदीप सातपुते,राजेश पाटील,अकील मुजावर, अमीत तडवी, संतोष चौधरी, विलास पाटील हे घटनास्थळी दाखल झाले व जखमींना जळगावला हलविण्यासाठी मदतकार्य करण्यात आले. ट्रकचालक गंभीर जखमी झाला असुन त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात आले. तिघेही जखमी परप्रांतीय असुन त्यांची नावे व पत्ते याबाबत माहीती मिळू शकली नाही. 

प्रवाशांनो लक्ष द्या : राज्यातील विविध जिल्ह्यांत जाणाऱ्या ‘या’ १९ गाड्या रद्द, पाहा संपूर्ण यादी

0
new-trains-from-bhusawal-to-surat-and-nandurbar

जळगाव लाईव्ह न्यूज । २७ एप्रिल २०२१ । वाढत्या कोरोनाची साखळी तोडण्यासाठी राज्यात लॉकडाऊन लावण्यात आला आहे. त्यात जिल्हाबंदीही लादण्यात आली असून, अत्यावश्यक कामाशिवाय बाहेर फिरण्यासही मज्जाव केलाय. त्यामुळे अनेक जण घरीच राहणं पसंत करतायत.

दरम्यान, याचा परिणाम रेल्वे सेवेवर पडल्याचे दिसून येत आहे. प्रवासी संख्या कमी असल्याने रेल्वे प्रशासनाने मेल-एक्स्प्रेस रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई-पुण्यातून महाराष्ट्रातील उर्वरित भागात जाणाऱ्या 19 रेल्वे गाड्या रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.

रद्द करण्यात आलेल्या गाड्या पुढीलप्रमाणे!

1) ट्रेन क्रमांक 02147 दादर -साई नगर शिर्डी विशेषच्या फे-या दि. 30.04.2021 पासून दि. 07.05.2021 पर्यंत रद्द

2) ट्रेन क्रमांक -02148 साई नगर शिर्डी विशेषच्या फे-या दि. 01.05.2021 पासून दि. 08.05.2021 पर्यंत रद्द

3)ट्रेन क्रमांक 01131 दादर -साई नगर शिर्डी विशेषच्या फे-या दि. 28.04.2021 पासून दि. 10.05.2021 पर्यंत रद्द

4)ट्रेन क्रमांक -01132 साई नगर शिर्डी विशेषच्या फे-या दि. 29.04.2021 पासून दि. 11.05.2021 पर्यंत रद्द

5) ट्रेन क्रमांक 01404 कोल्हापूर -नागपूर विशेषच्या फे-या दि. 26.04.2021 पासून दि. 10.05.2021 पर्यंत रद्द

6) ट्रेन क्रमांक 01403 नागपूर -कोल्हापूर विशेषच्या फे-या दि. 27.04.2021 पासून दि. 11.05.2021 पर्यंत रद्द

7) ट्रेन क्रमांक 02041 पुणे -नागपुर विशेषच्या फे-या दि. 29.04.2021 पासून दि. 13.05.2021 पर्यंत रद्द

8) ट्रेन क्रमांक 02042 नागपुर -पुणे विशेषच्या फे-या दि. 30.04.2021 पासून दि. 14.05.2021 पर्यंत रद्द

9) ट्रेन क्रमांक 02239 पुणे अजनी विशेषच्या फे-या दि. 01.05 .2021 पासून दि. 15.05.2021 पर्यंत रद्द

10) ट्रेन क्रमांक 02240 अजनी -पुणे विशेषच्या फे-या दि. 02.05 .2021 पासून दि. 16.05.2021 पर्यंत रद्द

11) ट्रेन क्रमांक 02118 अमरावती -पुणे विशेषच्या फे-या दि. 29.04.2021 पासून दि. 13.05.2021 पर्यंत रद्द

12) ट्रेन क्रमांक 02117 पुणे -अमरावती विशेषच्या फे-या दि. 28.04.2021 पासून दि. 12.05.2021 पर्यंत रद्द

13) ट्रेन क्रमांक 02036 नागपुर -पुणे विशेषच्या फे-या दि. 01.05 .2021 पासून दि. 15.05.2021 पर्यंत रद्द

14) ट्रेन क्रमांक 02035 पुणे -नागपुर विशेषच्या फे-या दि. 29.04.2021 पासून दि. 13.05.2021 पर्यंत रद्द

15) ट्रेन क्रमांक 01137 नागपुर -अहमदाबाद विशेषच्या फे-या दि. 28.04.2021 पासून दि. 12.05.2021 पर्यंत रद्द

16) ट्रेन क्रमांक 01138 अहमदाबाद -नागपुर विशेषच्या फे-या दि. 29.04.2021 पासून दि. 13.05.2021 पर्यंत रद्द

17) ट्रेन क्रमांक 02223 पुणे – अजनी विशेषच्या फे-या दि. 30.04.2021 पासून दि. 14.05.2021 पर्यंत रद्द

18)  ट्रेन क्रमांक 09125 सुरत अमरावती विशेषच्या फे-या दि. 30.04.2021 पासून दि. 14.05.2021 पर्यंत रद्द

19) ट्रेन क्रमांक 09126 अमरावती -सुरत विशेषच्या फे-या दि. 01.05.2021 पासून दि. 15.05.2021 पर्यंत रद्द

एरंडोल येथे कासोदा दरवाजा भागात पडले भुयार

0
erandol

जळगाव लाईव्ह न्यूज । २७ एप्रिल २०२१ । एरंडोल येथे कासोदा दरवाजा भागात रामभाऊ गांगुर्डे यांचे घराचे नव्या आर.सी.सी बांधकामासाठी कॉलम खोदत असताना जवळपास दहा फूट खोल व अडीच ते तीन फुट व्यासाचे अचानक भुयार पडले. ही घटना सोमवारी संध्याकाळी उघडकीस आली. दगड व माती टाकून ते पुरण्यात आले.

एरंडोल हे ऐतिहासिक व प्राचिन शहर असून येथे भुयार पडल्याच्या घटना अनेकवेळा आढळून आल्या आहेत. पूर्वीच्या काळी धान्य साठविण्यासाठी धान्याची कोठारे असावित असा अंदाज जुन्या जाणकारांकडून व्यक्त केला जात आहे, दरम्यान भुयार पडल्याची वार्ता परीसरात पसरताच घटनास्थळी भूयार पाहण्यासाठी नागरीकांची गर्दी झाली होती.

Jalgaon Corona Update : जळगाव जिल्ह्यातील अधिकृत कोरोना आकडेवारी : २७ एप्रिल २०२१

0
corona (1)

जळगाव लाईव्ह न्यूज । २७ एप्रिल २०२१ । जळगाव जिल्ह्यात कोरोनाच्या दररोज आढळून येणाऱ्या नव्या बाधितांची संख्या स्थिर असली तरी मृत्यूसत्र सुरुच आहे. मंगळवारी प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यात २३ जणांचा बळी गेला. तर १०१२ नवे बाधित रुग्ण आढळले आहे. यात जळगाव शहरासह चोपडा, एरंडोल, रावेर, भुसावळ, मुक्ताईनगर, बोदवड तालुक्यात संसर्ग कायम आहे. हा संसर्ग कमी करण्यासाठी नागरीकांनी काळजी घेणे हाच एक पर्याय आहे.

मार्च व एप्रिलच्या प्रारंभी कोरोनाने घातलेले थैमान जिल्ह्यात काहीअंशी कमी झाले आहे. गेल्या दोन आठवड्यांपूासून नव्याने बाधितांची संख्या स्थिर असून बरे होणाऱ्यांचा आकडा समाधानकारक आहे. आज मंगळवारी  १०१२ नवे रुग्ण आढळून आले तर ९९५ रुग्ण दिवसभरात बरे झाले.

दरम्यान, जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या १ लाख १८ हजार ९२८ इतकी आहे. त्यापैकी बरे होणाऱ्यांची संख्या १ लाख ५ हजार ९०१ वर पोचली आहे. जिल्ह्यातील मृत्युदर अद्यापही चिंतेची बाब आहे. गेल्या २४ तासांत आणखी २३ रुग्णांचा बळी गेला. त्यामुळे बळींचा आकडा २ हजार १२२ झाला आहे.

जळगाव शहर- १६३, जळगाव ग्रामीण- ५६, भुसावळ-४९, अमळनेर-४६, चोपडा- ५३, पाचोरा- ५९, भडगाव-३३, धरणगाव- २७, यावल- २६, एरंडोल- १००, जामनेर- ५९, रावेर- ९६, पारोळा- ३७, चाळीसगाव- ६४, मुक्ताईनगर- १७, बोदवड-१२० आणि इतर जिल्हे ०७ असे एकुण १०१२ बाधित रूग्ण आढळले आहे.