⁠ 
शुक्रवार, नोव्हेंबर 15, 2024

महाराष्ट्रातील लॉकडाऊन ३१ मे पर्यंत वाढवला

0
lockdown

जळगाव लाईव्ह न्यूज । १२ मे २०२१ । कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्यातील लॉकडाऊन 31 मे पर्यंत वाढवण्यात आला असून तसे विधान आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी केले आहे. दरम्यान, काल जाहीर केल्याप्रमाणे केवळ 45 वर्षाच्या वरील नागरिकांनाच लसीकरणाचा लाभ मिळणार असून 18 ते 44 या वयोगटातील कोविड लसीकरण तुर्तास थांबवण्यात आल्याचे देखील टोपे यांनी म्हटले आहे.

लसींच्या तुटवड्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. सध्या ४५ वर्षांच्या वरच्या नागरिकांचं लसीकऱण करणं गरजेचं असल्याने खरेदी केलेल्या लसी त्यांच्या दुसऱ्या डोससाठी वापरण्यात य़ेणार असल्याचं त्यांनी जाहीर केलं. जर दुसरा डोस वेळेत घेतला नाही तर पहिल्या डोसचा काही उपयोग होणार नाही. त्यामुळे आता सर्वात आधी ४५ वर्षांवरील नागरिकांचं लसीकरण आधी पूर्ण करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. त्यामुळे १८ वर्षांवरील नागरिकांनी पहिल्या डोसची अपेक्षा करु नये असंही त्यांनी सांगितलं. लसीच्या उपलब्धतेनुसार पुढील निर्णय घेण्यात येणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.

ते पुढे म्हणाले की २० तारखेनंतर सिरमक़डून लसींचे अधिक डोस उपलब्ध होणार आहेत त्यामुळे त्यानंतर पुढचा निर्णय घेणार आहेत.

जळगाव जिल्ह्यातील अधिकृत कोरोना आकडेवारी : १२ मे २०२१

0
corona test

जळगाव लाईव्ह न्यूज । १२ मे २०२१ । जळगाव जिल्ह्यात मागील काही दिवसापासून कोरोना संसर्गाचा आलेख स्थिर आहे.  आज बुधवारी दिवसभरात ८४९ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर आज ८४७ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहे.

जळगाव जिल्ह्यात गेल्या जवळपास महिनाभरापासून कोरोना संसर्गाचा आलेख स्थिर आहे. तीन-चार आठवड्यांपासून दररोज आढळून येणाऱ्या नव्या रुग्णांची संख्या कमी होत आहे.बुधवारी प्राप्त ७ हजार २३६ चाचण्यांच्या अहवालातून ८४९ नवे रुग्ण समोर आलेत. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या १ लाख ३२ हजार ४२३ झाली असून ८४७ रुग्ण बरे होऊन घरी गेले. त्यामुळे बरे होणाऱ्यांचा आकडा १ लाख २० हजार १५५ झाला आहे.

दोन दिवसांपासून दररोजच्या मृत्युंची संख्याही थोडी कमी झाली आहे. आज ११ जणांचा बळी गेला, त्यामुळे बळींचा एकूण आकडा २३७४ वर पोचला आहे.

आजची आकडेवारी

जळगाव शहर ८६, जळगाव ग्रामीण २२, भुसावळ १६३, अमळनेर २६, चोपडा ४२, पाचोरा १५, भडगाव ०८, धरणगाव १५, यावल २५, एरंडोल २२, जामनेर ६१, रावेर ५२, पारोळा १६, चाळीसगाव ४८, मुक्ताईनगर १७१, बोदवड ५१, अन्य जिल्ह्यातील २६.

गणाक्षराची कला जोपासत इंडिया बुक ऑफ रेकॉर्डसह इतर 5 रेकॉर्ड मध्ये नोंद

0
bhadgaon

जळगाव लाईव्ह न्यूज । १२ मे २०२१ । १४ विद्या आणि ६४ कलांचा अधिपती म्हणजे गणपती. आज त्याच कलांपैकी एक कला म्हणजे गणाक्षर किंवा अक्षर गणेशा. आपल्या कुणाच्याही नावातून गणपती बाप्पा साकारणे म्हणजे गणाक्षर. ही आगळी वेगळी कला जोपासणारी भडगाव येथील कलाकार नेहा निलेश मालपूरे हिची या कलेसाठी इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड, OMG बुक ऑफ रेकॉर्ड, वर्ल्ड बुक ऑफ टॅलेंट रेकॉर्ड, आशिया बुक ऑफ रेकॉर्ड, ऑनलाइन वर्ल्ड रेकॉर्ड तसेच इंडियन बुक ऑफ रेकॉर्ड मधे नोंद झाली आहे. विविध अक्षरी नावे, एकापेक्षा अनेक नावे तसेच कधी आडनाव तर कधी वेगवेगळ्या भाषातुन देखील नेहा गणपतीची कलाकृती साकारते. या कलाकृतीतुन आजवर अनेकांची नावे नेहाने गणपती बाप्पाच्या कलाकृतीत साकारलेली आहेत. तसेच अनेकांनी आपल्या प्रियजणांना वाढदिवस किंवा इतर शुभदिनी त्यांच्या नावाने साकारलेली गणपतीची कलाकृती भेट दिली आहे. या कलेच्या माध्यमातून विविध नावातुन गणपतीची विविध रुप बघायला मिळतात.

नेहाचे भौतिकशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवीचे शिक्षण झाले असुन, त्याच विषयात संशोधन करण्याचा तिचा मानस आहे. गेल्या वर्षी देखील वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड अंतर्गत जगातील सर्वात मोठ्या ऑनलाइन सर्जनशीलता कार्यक्रमात नेहाने सहभाग नोंदवुन भडगावचे नाव जगाच्या नकाशावर कोरले आहे. तिच्या यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे. नेहा सामाजिक कार्यकर्ते तथा मानवराज प्रतिष्ठानचे संस्थापक श्री निलेश मालपूरे व चित्रा मालपूरे यांची कन्या आहे.

गेल्या ४ ते ५ वर्षांपासून मी ही कला जोपासत आहे. माझ्या कलेतुन आपल्या भारतीय संस्कृतीचे आराध्य दैवत गणेशाच साक्षात दर्शन होत. आणि छंद फक्त जोपासून चालत नाही तर त्याच कलेत रुपांतर व्हाव लागत; तेव्हाच त्या कलेचा आस्वाद घ्यायला आपण शिकतो.

– नेहा चित्रा-निलेश मालपूरे, भडगाव

हॉटेल, बार व्यवसायिकांप्रमाणे शेतकऱ्यांसह बारा बलुतेदारांना मदत करा : खा.रक्षा खडसेंचं शरद पवारांना पत्र

0
raksha khadse sharad pawar

जळगाव लाईव्ह न्यूज । १२ मे २०२१ । गेले वर्षभर कोविड या महामारीमुळे सतत सुरू असलेल्या लॉकडाऊन व जिल्हाबंदीमुळे शेतकरी संकटात सापडला आहे. शेतमालाला भाव नाही, केंद्र सरकारचे पॅकेज वगळता राज्य सरकारकडून कोणत्याही प्रकारची मदत नाही, जिल्हाबंदीमुळे वाहतूक बंद आहे. राज्य सरकारकडे पाठपुरावा करून शेतकऱ्यांसह बारा बलुतेदारांना योग्य ती मदत मिळवून द्यावी यासाठी खासदार रक्षा खडसे यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष खा.शरद पवार यांना पत्र पाठविले आहे.

राज्यात अनेक बाजार समित्या बंद असून हाताशी पैसा नसल्याने कर्जबाजारी होण्याची वेळ शेतकऱ्यावर आलेली आहे. अवकाळी पाऊस आणि वादळांसारख्या नैसर्गिक आपत्तींमुळे शेती उत्पादनाचे प्रचंड नुकसान होत असून उभी पिके नष्ट करण्याची वेळ शेतकऱ्यावर आली आहे. शेतात ओतलेला पैसा मातीत गेला असून शेतकरी कधी नव्हे एवढा निराशेच्या गर्तेत सापडला आहे. बाजार समित्यांमध्ये व्यवहार बंद झाल्याने नाशवंत शेतमालाची विल्हेवाट लावणेदेखील शेतकऱ्यास परवडेनासे झाले आहे. तरी शेतकऱ्यांना त्यांच्या मालाची विक्री करण्यासाठी सरकारकडून काही काळाची सवलत मिळावी यासाठी राज्यस्तरावरून पाठपुरावा करावा.

तसेच बार आणि हॉटेल व्यावसायिकांप्रमाणेच शेतकरीदेखील विजेच्या संकटात सापडला असून, वीजबिल माफी योजनेचा घोळ अजून संपलेला नाही. शेतकऱ्यांच्या थकित वीजबिलात ३३ टक्के सवलत देण्याची राज्याच्या अर्थमंत्र्यांनी केलेली घोषणा अजूनही शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचलेली नाही. दुष्काळी मदत आणि पिकविम्याच्या योजना शेतकऱ्यांपासून लांबच आहेत. शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्याचे कोणतेही नियोजन राज्य सरकारने याकाळात शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी केलेले नाही. लॉकडाऊनमुळे जेव्हा इतर सर्व उद्योगधंदे बंद होते, तेव्हा शेतकरी मात्र शेतात राबून पिके घेत होता.

टाळेबंदीच्या काळातही शेती व शेतीपूरक उद्योगच ग्रामीण कुटुंबांसाठी आधार असल्याने राज्य सरकारने अन्य उद्योगंधंद्यांप्रमाणे शेतकऱ्यांसाठीही पॅकेज जाहीर करावे, राज्यातील ९४ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात केंद्र सरकार प्रमाणे तातडीने सहा हजार रुपये जमा करावेत व तातडीने शेतकऱ्यांस मदत जाहीर करावी, शेतकऱ्यांसोबतच शेतमजूर, बारा बलुतेदार, वाजंत्रीवाले आणि हातावर पोट असलेल्या कष्टकऱ्यास मदत करण्यासाठीही शरद पवार यांनी राज्य सरकारकडे पाठपुरावा व्हावा. दूध, द्राक्षे, कांदा, भाजीपाला, केळी, आंबे, फळे, फुले आदी शेतमालाच्या बाजारपेठा टाळेबंदीमुळे बंद झाल्याने दररोजच्या उत्पन्नास शेतकरी मुकला आहे. महाविकास आघाडी सरकारने केलेली सरसकट कर्जमुक्तीची घोषणाही सध्या वाऱ्यावर आहे. तरी ज्याप्रमाणे शरद पवार यांनी महाराष्ट्रातील बार आणि हॉटेल मालकांची तत्काळ दखल घेतली, त्याचप्रमाणे सामान्य शेतकरी, शेतमजूर, बारा बलुतेदार, वाजंत्रीवाले आणि हातावर पोट असलेल्या कष्टकऱ्याच्या कुटुंबांचा आक्रोशही महाविकास आघाडीचे वरिष्ठ नेते यानात्याने त्यांनी माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्यापर्यंत पोहचवून या कठीण काळात थोडाफार का होईना परंतु दिलासा द्यावा अशी पत्रामध्ये विनंती केली आहे.

मे आणि जून महिन्याचे रेशन एकत्र वाटप करण्याची गुप्ता यांची मागणी

0
retion

जळगाव लाईव्ह न्यूज । १२ मे २०२१ । मे आणि जून या कालावधीत राज्य सरकार व केंद्र सरकार यांच्याकडून देणायत येणारे स्वस्त आणि मोफत धान्य एकत्रित रित्या देण्यात यावे अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते दीपककुमार गुप्ता यांनी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांना पत्राद्वारे केली आहे. याबाबतची दखल जिल्हा पुरावठा अधिकारी सुनील सूर्यवंशी यांनी घेतली असून याबाबतचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर केले आहे.

मे आणि जून महिन्यात गरीब गरजू नागरिकांना राज्य सरकारकडून तसेच केंद्र सरकार कडून वाटप करण्यात येणारे नियमित स्वस्त धान्य व मोफत धान्य याचे काही धान्य वितरकांकडून गैरव्यवहार होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. हा गैरव्यवहार रोखण्यासाठी सदर धान्य वाटप दोन टप्प्यात न वाटता मे आणि जून या महिन्याची वाटप एकत्र करण्यात यावी अशी मागणी सामाजिक कार्यरकर्ते दीपककुमार गुप्ता यांनी केली आहे. सोबतच अशा प्रकारे गैरव्यवहार करणाऱ्या वितरकांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे.

एका महिन्याचे वाटप करून दुसऱ्या महिन्याचे रेशन परस्पर गहाळ करण्याचा काही धान्य वितरकांचा मनसुबा असल्याचा संशय गुप्ता यांनी व्यक्त केला आहे. मात्र आहे अन्य आपण होऊ देणार नाही. हे धान्य गरीब गरजू लोकांपर्यंत पोचवल्याशिवर राहणार नाही असे गुप्ता यांनी सांगितले.

मानियार बिरादरीतर्फे शीरखुर्मा,जकात व कर्जे हसनाचे वाटप

0
jalgaon (1)

जळगाव लाईव्ह न्यूज । १२ मे २०२१ । लॉकडाउन ची परिस्थिती असल्याने याहीवर्षी गरजवंतांना मानियार बिरादरी तर्फे त्यांच्या घरी जाऊन ईद साजरी करता यावी म्हणून शीरखुर्मा साठी (ड्रायफ्रूट खरेदी साठी) त्यांना प्रत्येकी एक हजार रुपयाचे पाकीट देण्यात आले जेणेकरून त्यात त्यांनी ईद चा सण आपल्या कुटुंबीयांसोबतच आपल्या घरी आनंदाने साजरा करावा अशाप्रकारे ५० पाकीट बिरादरीचे वरिष्ठ संचालक हारून शेख व अब्दुल रऊफ रहीम यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.

जकात व कर्जे हसना चे सुद्धा वाटप

तसेच काही गरजवंतांना कर्ज हसना म्हणजे ज्या वेळी त्यांची आर्थिक परिस्थिती चांगली होईल तेव्हा त्यांनी ते पैसे परत करावे या अटीवर त्यांना आर्थिक साहाय्य करण्यात आले तर जकात शीर्षकाखाली सुद्धा सुमारे १४३  लोकांना मदत करण्यात आली.

पूर्ण वर्ष भर जकातीचे वाटप

श्रीमंता कडून आपल्या शिलकी उत्पन्नातून अडीच टक्के जकात काढून ती गरिबांना वाटप करण्याचे ईश्वरीय आदेश असल्याने बिरादरी ती जकात जमा करून वर्ष भर वाटत असते त्यात प्रामुख्याने शैक्षणिक, वैद्यकीय, स्वयरोजगार,नैसर्गिक नुकसान,कुटुंब उदर निर्वाह साठी मदत दिली जाते जो कोणी गरजवंत असेल परंतु तो मागण्यास हिचकत असेल तर त्याला गोपनीय रित्या मदत केली जाते

तरी यात श्रीमंतांनी सहभाग घेऊन मदत करावी तर गरिबांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन बिरदारीचे अध्यक्ष फारूक शेख यांनी एका पत्रकाद्वारे  केले आहे.जे कोणी गरजवंत असतील त्यांनी आपल्या गल्लीतील वार्डातील प्रमुखाकडून शिफारस पत्र असेल मन्या बिरादरीचे रथ चौक येथील कार्यालयात कसे आहात फारुख शेख एका पत्रकाद्वारे केले आहे.

परिचारिकांचे कार्य सुवर्णाक्षरांत नोंद व्हावे : डॉ. जयप्रकाश रामानंद

0
jalgaon

जळगाव लाईव्ह न्यूज । १२ मे २०२१ । कोरोना महामारीच्या काळात परिचारिकांचे कार्य सुवर्णाक्षरांत नोंद व्हावे असे झाले आहे. रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा मानणाऱ्या परिचारिकांचे वैद्यकीय सेवेतील योगदान खूप महत्वाचे आहे, असे प्रतिपादन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी केले आहे.

परिचारिका सेवेला अत्याधुनिक स्वरूपात आणणाऱ्या लेखक, परिचारिका, संख्याशास्त्रज्ञ फ्लोरेन्स नाइटिंगल यांच्या जन्मदिनानिमित्त जागतिक परिचारिका दिन साजरा केला जातो. त्यानिमित्त शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात कोरोना प्रतिबंधत्वाचे नियम पाळून कार्यक्रम घेण्यात आला. सुरुवातीला दीपप्रज्वलन करण्यात आले. त्यानंतर फ्लोरेन्स नाइटिंगल यांच्या प्रतिमेला अधिष्ठाता डॉ. रामानंद यांनी माल्यार्पण केले.

यानंतर अधिष्ठाता डॉ. रामानंद यांनी मनोगत व्यक्त करीत रुग्णालयात सेवा देत असलेल्या परिचारिकांना सदिच्छा देत, निःस्वार्थपणे सेवा देत असल्याने रुग्णांच्या मनात आदराचे स्थान निर्माण होत असल्याचे सांगितले. यावेळी अधिसेविका कविता नेतकर यांनी परिचारिकांच्या सेवेविषयी माहिती दिली. विद्यार्थिनी परिचारिका दिव्या सोनवणे, किरण साळुंखे यांचा ऑक्सिजन नर्स म्हणून सेवा बजावत असल्याने अधिष्ठाता डॉ. रामानंद यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

प्राचार्य अनिता भालेराव, सविता कुरकुरे, कविता पवार, राजश्री आडाळे, माने, त्रिमाळी, युगंधरा जोशी, रोजमेरी वळवी, छाया पाटील  यांचाहि  विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी वैद्यकीय उप अधीक्षक डॉ. संगीता गावित, अधिपरिचारिका जयश्री जोगी, योगिता पवार, नीला जोशी, अर्चना धिमते, संगीता शिंदे आदी उपस्थित होते.

सर्व पत्रकारांचे तातडीने लसीकरण करा : ना. गुलाबराव पाटलांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

0
gulabrao patil vaccined

जळगाव लाईव्ह न्यूज । १२ मे २०२१ । कोविडच्या प्रतिकारामध्ये मोलाची भूमिका पार पाडणार्‍या राज्यातील प्रिंट  व इलेक्ट्रॉनिक माध्यमांच्या पत्रकारांचे तातडीने लसीकरण करण्यात यावे अशी मागणी पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे  पत्राच्या माध्यमातून केली आहे.

याबाबत वृत्त असे की, एका वर्षापेक्षा जास्त कालावधीपासून महाराष्ट्र राज्यातील आरोग्य कर्मचारी, पोलिस, सफाई कर्मचारी अहोरात्र काम करत आहेत. या अत्यावश्यक सेवा देणार्‍या कर्मचार्‍यांप्रमाणेच विविध वृत्तपत्रांचे पत्रकार, वृत्तवाहिन्यांचे वार्ताहर व प्रतिनिधी हे देखील बातम्यांच्या शोधात संपूर्ण राज्यभर फिरत असतात. प्रत्येक जिल्हा,तालुका व गावाची कोविड १९ च्या संसर्गाबाबतची सद्यस्थिती विविध माध्यमाद्वारे शासनास अवगत करण्याचा प्रयत्न करत असतात. त्यामुळे ज्याप्रमाणे देशातील इतर काही राज्यांनी याबाबत सकारात्मक निर्णय घेतला आहे  त्याप्रमाणे आपणही आपल्या राज्यात पत्रकार व वृत्तवाहिन्यांचे प्रतिनिधी यांना फ्रंटलाईन वर्कर्सचा दर्जा देवून त्यांना तातडीने कोविड प्रतिबंधक लस देण्यात यावी अशी विनंती पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

ना. गुलाबराव पाटील यांच्या पुढाकाराने जळगाव येथे नुकतेच पत्रकारांचे लसीकरण करण्यात आले आहे. याच प्रमाणे राज्यभरात पत्रकारांना लस देण्यात यावी अशी मागणी त्यांनी या पत्रातून केली आहे.

विश्वपरिचारिका परिचारिका दिनी पाचोरा शासकीय ग्रामीण रुग्णालयामधील परिचारिकाचा सन्मान

0
pachora

जळगाव लाईव्ह न्यूज । १२ मे २०२१ । आज 12 मे रोजी विश्वपरिचारिका दिना निम्मित पाचोरा शहरातील शासकीय ग्रामीण रुग्णालयावतील परिचारिकाचा सन्मान करण्यात आला. सध्याच्या परिस्थिती आणि आरोग्य विभागाची मेहनत आणि रुग्णाला आपला समजून त्याची सेवा करणाऱ्या परिचारिका गेल्या दोन वर्षांपासून   रुग्णाची निःस्वार्थ सेवा करत आहे तसेच. घरचे काम करून ही परिचारिका आपली सेवा तत्परतरणे देत आहे सलाम आहे याच्या कर्तृत्वला.

याचा झाला सन्मान

परिचारिका -भारती पाटील, जिजा वाडेकर,  वनिता जाधव, दीपाली भावसार, भिलाबाई  ढोले, अश्विनी जगताप, जोत्स्ना पाटील.नैना वाघ,दुर्गा तेली,वैशाली,आकाश ठाकूर याचा सन्मान शिवसेनेचे किशोर बारवकर, पाचोरा शासकीय रुग्णालय अधिक्षक अमित साळूंखे, राष्ट्रवादी काँग्रेस विकास पाटील याच्या तर्फे करण्यात आला.

सन्मान मिळाल्यावर परिचारिका भारती पाटील व इतर परिचारिकांनी ह्या सन्मानासाठी सर्वाना धन्यवाद दिला आणिसांगितले सेवा करत असताना नेहमी इच्छा असते की ज्याची सेवा करत आहे तो रुग्ण बरा होऊन लवकर आंनदी घरी आपल्या परिवाजवळ जावा पण सध्याच्या परिस्थितीत अनेक रुग्ण दगावले मनाला असह्य वेदना झाल्या. पण वाईट वेळ आहे निघून जाईल सर्व जनतेला आजच्या दिवशी आव्हान केले आहे की मास्क घाला, स्वतःची घरच्यांची सुरक्षा घ्या लस जरूर घ्या.