⁠ 
शुक्रवार, नोव्हेंबर 15, 2024

चारचाकीच्या धडकेत दुचाकीस्वार रेल्वे कर्मचारी ठार

0

जळगाव लाईव्ह न्यूज । १३ मे २०२१ । भरधाव वेगाने येणाऱ्या चारचाकीने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार रेल्वे कर्मचा-याचा जागेवरच मृत्यू झाल्याची घटना आज गुरुवारी सकाळी भुसावळ-नशिराबाद रस्त्यावर घडलीय. रामा भादू शिरोळे (५७,रा.अष्टविनायक कॉलनी, भुसावळ) असे मयत रेल्वे कर्मचा-याचे नाव आहे.

याबाबत असे की, भुसावळ येथील रहिवासी रामा शिरोळे हे दुचाकीने (क्र.एमएच.१९.सीएम.७९३) सकाळी नशिराबादच्या दिशेने जात होते. माउली पेट्रोल पंपाजवळ त्यांच्या दुचाकीला मागून भरधावर येणा-या चारचाकी वाहनाने (एमएच.१९,बीयू.८९८८) जोरदार धडक दिली. धडक एवढी जबर होती की, शिरोळे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत होवून त्यांचा जागीच मृत्यू झाला.

अपघाताची माहिती मिळताच, नशिराबाद पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरिक्षक गणेश चव्हाण, पोलीस कर्मचारी प्रवीण हाके, किरण बाविस्कर, संतोष केदार आदींनी घटनास्थळी धाव घेवून पंचनामा केला. तसेच मृतदेह रूग्णालयात हलविला. तसेच शिरोळे यांचा मुलगा ज्ञानेश्वर हा देखील घटनास्थळी दाखल झालेला होता.

जळगाव शहरात दुचाकी चोरट्यांचा धुमाकूळ

0
crime

जळगाव लाईव्ह न्यूज । १३ मे २०२१ । गेल्या काही दिवसांपासून जळगाव शहरात  दुचाकी चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून दररोज एक किंवा दोन दुचाकी चोरीला जाण्याच्या घटना आता नित्याच्याच झाल्या आहेत. या घटनांमुळे वाहनधारकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे, दरम्यान, योगेश्वरनगर येथे घरासमोरून एकाची दुचाकी चोरीस गेल्याची घटना घडली. याबाबत शनिपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबत असे की, योगेश्वर नगरात गणपती मंदिराजवळ भाडेकरारावरील खोलीत संदीप सुरेश वाणी हे पत्नी व दोन मुली या कुटुंबासह वास्तव्यास आहेत. संदीप वाणी यांनी ४ मे रोजी रात्री नऊ वाजता नेहमीप्रमाणे त्यांची दुचाकी एमएच १९ सीडी  ३७६७ ही घरासमोर उभी केली होती. दुसऱ्या दिवशी ५ मे रोजी सकाळी ८.३० वाजता उठल्यावर घरासमोर त्यांची दुचाकी दिसून आले नाही.

सर्वत्र परिसरात तसेच बस स्थानक, शहर पोलिस ठाणे, रामानंदनगर एमआयडीसी पोलिस स्टेशन याठिकाणी दुचाकीचा शोध घेतला. मात्र दुचाकीबाबत कुठलीही माहिती मिळाली नाही. संदीप वाणी यांनी याबाबत शनिपेठ पोलिस ठाण्यात तक्रार दिली. पुढील तपास पोलिस नाईक अमोल विसपुते हे करीत आहेत.

धक्कादायक : शिवकॉलनीजवळ भरधाव डंपरने तरूणाला चिरडले; डंपर चालक फरार

0
accident

जळगाव लाईव्ह न्यूज । १३ मे २०२१ । जळगाव शहरातील शिवकॉलनी स्टॉपजवळ भरधाव डंपरने एका तरुणाला चरडले आहे. यात डंपरचे चाक डोक्यावरून गेल्या तरूणाचा मृत्यू झाला तर दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला आहे. धडक दिल्यानंतर डंपर चालकाने पळ काढला आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी कि, मंगळवारी रात्री दहा वाजता महामार्गावरील शिव काॅलनी थांब्याजवळ हा अपघात घडला आहे. श्याम सुरेश पाटील (३७, निवृत्ती नगर) असे मयत तरूणाने नाव असून दुचाकीस्वार परेश रवींद्र पाटील (२९, संभाजी नगर) हा गंभीर जखमी झाला आहे. परेश पाटील व श्याम पाटील दोघेही मित्र असून दूध फेडरेशनमध्ये कामाला होते.

मंगळवारी रात्री परेश हा टॉवर चौकात असताना श्याम पाटील याने ‘मी जैनाबाद मध्ये आहे मला घ्यायला ये’ असे सांगून परेशला बोलावून घेतले. तेथून परेशच्या (क्रमांक एम.एच.१९ सी.टी.०५९१) या दुचाकीने श्याम याला निवृत्तीनगरात घरी सोडण्यासाठी जात असताना रात्री दहा वाजता महामार्गावर शिव कॉलनी थांब्याच्या अलीकडे मागून भरधाव वेगाने आलेल्या पिवळ्या रंगाच्या डंपरने दुचाकीला जोरदार धडक दिली. त्यात मागे बसलेला श्याम खाली फेकला गेला. त्यात श्यामच्या डोक्यावरुन टायर गेले तर परेश लांब फेकला गेला. या घटनेत श्यामचा जागीच मृत्यू झाला. तर परेशच्या उजव्या हाताला व डोक्याला मार लागला आहे.

घटनेची माहिती मिळताच श्यामचा भाऊ अजय पाटील, राहुल पाटील, महेश पाटील, हितेश भदाणे आदींनी घटनास्थळी धाव घेतली. तातडीने दोघांना जिल्हा सरकारी रुग्णालयात हलविले. तेथे श्यामला मृत घोषित करण्यात आले तर परेश याला खाजगी रुग्णालयात हलवण्यात आले. त्याच्यावर उपचार सुरु असुन त्याच्या उजव्या भुवईवर सात टाके पडले आहेत तर डोक्याला व हाताला गंभीर दुखापत झाली आहे. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीसात फरार डंपरचालकाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर सोन घ्यायचं आहे? सोने चांदीचा भाव जाणून घ्या

0
gold rate

जळगाव लाईव्ह न्यूज । १३ मे २०२१ । जळगावच्या सुवर्णबाजारात मागील गेल्या तीन दिवसापासून सोन्याचा भाव स्थिर आहे. आज गुरुवारी देखील सोन्याच्या भावात विशेष वाढ अथवा घट झालेली नाहीय. परंतु चांदीच्या भावात आज १०० रुपयांनी घट झालेली आहे.

सोन्याचा भाव

२४ कॅरेट १ ग्राम सोन्याचा भाव ४,७९१ रुपये झाला आहे. सोन्याचा १० ग्रामचा दर ४७,९१० रुपये इतका आहे. २२ कॅरेट सोन्याचा प्रति ग्राम भाव ४,५६३ रुपये इतका आहे. तर १० ग्रामसाठी तुम्हाला ४५,६३० रुपये मोजावे लागतील.

चांदीचा भाव

आज चांदीच्या भावात १०० रुपयांची वाढ झाली असून १ ग्राम चांदीचा भाव आज ७१.५० रुपये इतका असून १ किलोचा दर ७१,५०० रुपये इतका आहे.

दरम्यान, हिंदू धर्मानुसार अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदी करणे शुभ मानलं जातं. यावेळी हा उत्सव १४ मे रोजी आहे. तज्ज्ञांच्या मते अक्षय तृतीयेला सोन्याच्या किंमतीत वाढ होऊ शकते.

मुख्यमंत्री महोदय आम्हाला वाचवा : जळगावच्या व्यापाऱ्यांचे साकडे

0
vyapari banner

जळगाव लाईव्ह न्यूज । १३ मे २०२१ । कोरोनामुळे गेल्या १५ महिन्यांपासून लॉकडाऊन आणि निर्बंधांचे पालन करणाऱ्या व्यापारी बांधवांची सहनशीलता आता संपली असून जळगाव जिल्हा व्यापारी महामंडळतर्फे थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील यांना साकडे घालण्यात आले आहे. जळगावात दोघांचे लक्ष वेधणारे तब्बल ५०० पोस्टर लावण्यात आले असून सोशल मीडियात देखील ते व्हायरल केले जात आहे.

जळगाव शहरात “मुख्यमंत्री महोदय, पालकमंत्री महोदय आम्हाला वाचवा” नॉन इसेंशियल व्यापाऱ्यांना समजून घ्या, आम्हाला दुकाने उघडण्याची परवानगी द्या असे संदेश असलेले पोस्टर जागोजागी लावण्यात आले आहे.

कोरोना आणि लॉकडाऊन काळात संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेकांची उदरनिर्वाहासाठी वाताहत होत असून व्यापारी देखील मोठ्या प्रमाणात अडचणीत आले आहे. प्रशासनाकडून गोर-गरिबांना मदत जाहीर केली जात असली तरी व्यापाऱ्यांना मात्र कसलीही सवलत देण्यात आलेली नाही. कोणताही कर शासनाने माफ केला नसून त्याचा भुर्दंड शासनाला सहन करावा लागत आहे.

img 20210511 wa0070

५०० पोस्टरद्वारे भावनिक साद

जळगाव जिल्हा व्यापारी महामंडळतर्फे संपूर्ण शहरात ५०० पोस्टर लावण्यात आले आहे. पोस्टरमध्ये मा.मुख्यमंत्री महोदय व्यापाऱ्यांनी दुकानाचे भाडे कसे भरायचे? बँकेचे हफ्ते कसे भरायचे? पगार कुठून द्यायचे? खायचं कसे ? आणि जगायचे कसे ? गव्हर्नमेंट टॅक्स, लाईट बिल, टेलिफोन बिल, घरपट्टी भरायची कुठून असे प्रश्न उपस्थित करण्यात आले आहे. पंधरा महिन्यापासून आम्ही सहकार्य करीत आहोत आता मात्र आम्ही हतबल झालो आहोत. पालकमंत्री मंत्री महोदय तुम्ही आमचे पालक आहात कृपया आमच्या वाढत असलेल्या अडचणी समजून घ्या, आम्हाला दुकाने उघडण्याची परवानगी द्या असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना जळगाव जिल्हा व्यापारी महामंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

महापौर महाजन, उपमहापौर पाटलांकडून परिचारिकांचा सन्मान

0
jalgaon

जळगाव लाईव्ह न्यूज । १२ मे २०२१ । महापौर सौ.जयश्री सुनिल महाजन व उपमहापौर श्री. कुलभूषण पाटील यांनी पहिल्या महासभेसाठी जाण्यापूर्वी जागतिक परिचारिका दिनानिमित्त आज (12 मे 2021) सकाळी दहाच्या सुमारास सिंधी कॉलनीतील महापालिकेचे कै. चेतनदास मेहता व पंचमुखी हनुमान मंदिराजवळील स्व. श्रीमती नानीबाई सूरजमल अग्रवाल रुग्णालयास भेट दिली.

तसेच सायंकाळी सव्वापाचला मोहाडी रोडवरील शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय व महिला रुग्णालयास महापौर सौ.जयश्री सुनिल महाजन यांनी भेट दिली. त्याचप्रमाणे ‘महापौर सेवा कक्ष’च्या माध्यमातून विविध रुग्णालयांशी संपर्क साधण्यात आला. अशा एकूण 142 हॉस्पिटलमधील 1200 हून अधिक परिचारिकांचा भेटकार्ड व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

कै. चेतनदास मेहता रुग्णालयात डॉ. सौ.सुजाता पाटील व डॉ. सौ.ठुसे यांनी महापौर, उपमहापौरांचे स्वागत केले. त्यानंतर महापौर सौ.जयश्री सुनिल महाजन व उपमहापौर श्री.कुलभूषण पाटील यांनी तेथील कर्मचार्‍यांची आस्थेवाईकपणे चौकशी करून ‘कोविड-19’च्या पार्श्वभूमीवर करीत असलेल्या कार्याचे कौतुक केले व जागतिक परिचारिका दिनाचे महत्त्व सांगणारे फलक रुग्णालयात लावण्यासाठी भेट दिले. तसेच शोभा कोगटे, हर्षदा शिलेदार, ममता बोदडे, अनिता भदाणे, शबिरा तडवी, लक्ष्मी सरघटे, सुरेखा वडनेरे, मीरा चंडाळे आदी परिचारिकांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करून शुभेच्छा दिल्या व सर्वांप्रती कृतज्ञताही व्यक्त केली.

स्व. श्रीमती नानीबाई सूरजमल अग्रवाल रुग्णालयास भेटीवेळी डॉ. सौ.सोनल कुलकर्णी व डॉ. सौ.प्रियंका अत्तरदे यांनी महापौर, उपमहापौरांचे स्वागत केले. त्यानंतर महापौर सौ.जयश्री सुनिल महाजन व उपमहापौर श्री.कुलभूषण पाटील यांनी तेथील कर्मचार्‍यांची आस्थेवाईकपणे चौकशी करून ‘कोविड-19’च्या पार्श्वभूमीवर करीत असलेल्या कार्याचे कौतुक केले व जागतिक परिचारिका दिनाचे महत्त्व सांगणारे फलक रुग्णालयात लावण्यासाठी भेट दिले. तसेच शिवानी परदेशी, दीपाली बोरनारे, सीमा परदेशी, सुमन सरताले, वैशाली वंजारी, मंगला दायमा, स्वाती रेखी, भावना भिरूड आदी परिचारिकांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करून शुभेच्छा दिल्या.

मोहाडी रोडवरील शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय व महिला रुग्णालयात अधीक्षक डॉ.मिलिंद निकुंभ, डॉ.रितेश पाटील डॉ. प्रवीण पाटील, डॉ. शिल्पा अमोल पाटील, डॉ. शिल्पा पाटील (आयुर्वेद) यांनी महापौर सौ.जयश्री सुनिल महाजन यांचे स्वागत केले. यावेळी उभयतांत रुग्णालयातील सोयी-सुविधा, कोविड रुग्णांची केली जात असलेली सुश्रूषा यासंदर्भात चर्चा झाली. त्यानंतर महापौर सौ. महाजन यांनी सविता शिर्के, नम्रता वानखेडे, सोनाली हसबंद, नेहा राजपूत आदी परिचारिकांचा भेटकार्ड व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला व परिचारिका दिनाच्या शुभेच्छा दिल्या. महापौरांकडून झालेल्या या छोटेखानी सत्कारामुळे परिचारिकांनी समाधान व्यक्त केले.

चंद्रदर्शन न झाल्याने शुक्रवारी ईद साजरी होणार

0
eid news

जळगाव लाईव्ह न्यूज । १२ मे २०२१ । आज बुधवारी रात्री रुहते हिलाल करण्यात येणार असल्याचा एकमुखी ठराव सर्वा नुमते करण्यात आला. बुधवारी रात्री झालेल्या रुहते हीलाल कमिटी च्या मीटिंग मध्ये इदगह ट्रस्टचे अध्यक्ष गफ्फार मलिक यांनी प्रस्तावना सादर केली सचिव फारुक शेख यांनी  आढावा सादर केला.

मौलाना नासिर यांनी ईद च्या चंद्राचे महत्व विशद केले. कारी झाकीर यांनी मार्गदर्शन केले.मौलाना उस्मान यांनी कुराण च्या माध्यमातून ईद चे व चाँद बाबत माहिती दिली. या सभेत जळगाव शहरातील मशिदीचे इमाम व उलमा तसेच ट्रस्टी यांची उपस्थिती होती.

 ईद ची नमाज घरी अदा करा — आवाहन 

शासनाचे आदेश नसल्याने यावर्षी सुद्धा ईद ची नमाज आप आपल्या घरी अदा करावी व शासनाच्या नियमांचे पालन करावे असे आवाहन सुद्धा समितीमार्फत करण्यात आलेले आहे.

 मीटिंगमध्ये यांची होती उपस्थित

मौलाना नसीर, मुफ्ती इम्रान,मौलाना रेहान,मौलाना वसीम, मौलाना शफी,मौलाना अब्दुल रहीम, कारी झाकीर,मौलाना कोनेन, मौलाना असरार, तसेच ईदगाह ट्रस्ट चे सैयद चाँद, अश्फाक बागवान,ताहेर शेख, अनिस शाह,मुकिम शेख, मुश्ताक अली, यांची उपस्थिती होती.*

व्हिडीओ : आमदारांच्या वाईनशॉपमधून शटर उचकावून मद्यविक्री

0
crime

जळगाव लाईव्ह न्यूज । १२ मे २०२१ । कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने अनेक निर्बंध लागू केलेले आहे. हॉटेल आणि मद्य विक्री दुकानांना देखील केवळ होम डिलेव्हरी करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत.

जळगाव शहरात मात्र चित्रा चौकात असलेल्या नीलम वाईन शॉपमधून चक्क शटर उचकावून मद्य विक्री केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. दरम्यान, वाईन शॉपच्या व्यवस्थापकाला याबाबत विचारणा केली असता सदरील दुकान आमदार राजुमामा भोळे यांचे असल्याचे त्याने सांगितले. प्रशासन पुढे काय कारवाई करणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

screenshot 2021 05 12 at 9.05.01 pm

हद्दच झाली ; जळगावात तरुणाच्या डोळ्यासमोर लांबवली दुचाकी

0
crime

जळगाव लाईव्ह न्यूज । १२ मे २०२१ । शहरात दुचाकी चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून दिवसेंदिवस घटना वाढतच आहे. यामुळे वाहनधारकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. दरम्यान, आता तर चक्क तरुणाच्या डोळ्यासमोरून दुचाकी लांबविल्याची घटना समोर आली आहे.

 शहरातील निवृत्तीनगरात काल मंगळवारी साडेआठ वाजता तरुण घराच्या गच्चीवर बोलत असतांना, त्याच्या डोळ्यादेखत दोघा चोरट्यांनी अंगणात उभी लांबविल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी आज बुधवारी दुपारी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

निवृत्ती नगरात निलेश दत्तात्रय पाटील वय ३१ हा कुटुंबासह वास्तव्यास आहे. तो खाजगी नोकरी करत असून त्याच्याकडे एम.एच.१९ बी.ई.८९५० या क्रमांकाची दुचाकी आहे.

काल मंगळवारी निलेशनेही दुचाकी नेहमीप्रमाणे अंगणात उभी केली होती. रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास निलेश घराच्या गच्चीवर बोलत उभा होता. यादरम्यान दोन चोरटे आले. त्यांनी डोळ्यादेखत अंगणात उभी दुचाकी सुरु केली. सुरुवातीला मित्र दुचाकी घेवून जात असल्याचे निलेशला वाटले, मात्र यानंतर निलेशने गच्चीवर पाहिले असता, त्याचे मित्र नव्हते, कुणीतरी अज्ञात दोन व्यक्ती आपली दुचाकी घेवून जात असल्याची खात्री झाल्यावर निलेशने आरडाओरड केला व चोरट्यांचा बजरंग बोगद्यापर्यंत पाठलाग केला. मात्र चोरटे हाती लागले नाही. आज बुधवारी दुपारी निलेश पाटील याने जिल्हापेठ पोलीस ठाणे गाठून त्याची २० हजार रुपये किंमतीची दुचाकी चोरी झाल्याबाबत तक्रार दिली. त्यावरुन जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अज्ञात दोघा चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक ज्ञानेश्‍वर सपकाळे हे करीत आहेत.