⁠ 
शुक्रवार, नोव्हेंबर 15, 2024

सर्वसामान्यांना इंधन दरवाढीचा झटका ; जळगावात पेट्रोलची शंभरी

0
petrol diesel

जळगाव लाईव्ह न्यूज । १५ मे २०२१ । गेल्या काही दिवसांपासून इंधनाच्या किंमतीत सातत्याने वाढ होत आहे. दोन दिवस स्थिर ठेवल्यानंतर पेट्रोलियम कंपन्यांनी शुक्रवारी पेट्रोल आणि डीझेल दरात पुन्हा एकदा वाढ केली आहे. यामुळे महाराष्ट्रातील बहुतांश शहरात पेट्रोलने शंभरी गाठली आहे. तर डिझेलचा दरही 90 रुपये प्रतिलीटर इतका झाला आहे.

जळगावात शहरात शुक्रवारी पेट्रोलचा दर हा ९९.८७ एवढा होता. त्यामुळे एक लिटर पेट्रोल घेतल्यावर ग्राहकांना शंभर रुपयेच मोजावे लागत आहेत. देशासह राज्यात आधीच कोरोनाचा प्रादुर्भाव तर दुसरीकडे लॉकडाऊनमुळे अनेक जण बेरोजगार झाले आहेत. त्यातच गेल्या काही दिवसात देशात महागाईचा भडका उडालेला दिसत आहेत.

गेल्या नोव्हेंबर ते मार्च या कालावधीत पेट्रोल आणि डिझेलचे दर सातत्याने वाढत होते. या काळात जवळपास ९ रुपयांनी पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढले. त्यानंतर एप्रिल महिन्यात हे दर कमी व्हायला सुरुवात झाली होती. सुरुवातीच्या आठवड्यात ३५ पैशांनी दर कमी झाले होते. नंतर पेट्रोलचे दर पुन्हा कमी झाले. ४ मे रोजी ९७.८७ असा पेट्रोलचा दर होता, तर ८७.४८ असा डिझेलचा दर होता. ११ मे रोजी हेच दर थेट ९९.३५ रुपये पेट्रोल आणि ८९.३१ रुपये डिझेल असे पोहोचले आहेत. आता १४ मेला ९९.८७ रुपयांवर पेट्रोल गेले आहे.

४ मे रोजी ९७.८७ हा पेट्रोलचा दर होता. त्यानंतर त्यात वेळोवेळी वाढ होत राहिली आता १४ मे रोजी पेट्रोलचा दर ९९.८७ एवढा झाला आहे. फक्त दहा दिवसांत दोन रुपयांनी पेट्रोल वाढले आहे. सरकारी कंपन्यांच्या पेट्रोलचा हा दर असला तरी खासगी कंपनीच्या पेट्रोलपंपावर ९९.९५ रुपये प्रतिलिटर एवढा पेट्रोलचा दर आहे.

आजचा सोने चांदीचा भाव : १५ मे २०२१

0
gold

जळगाव लाईव्ह न्यूज । १५ मे २०२१ । जळगावच्या सुवर्णबाजारात मागील गेल्या तीन दिवसापासून सोन्याचा भाव स्थिर आहे. परंतु आज शनिवारी सोन्याच्या भावात वाढ झाली आहे. आज सोने प्रति ग्रॅम १६ रुपयाने वाढले आहे. तर चांदीच्या भावात प्रति किलो ६३० रुपयांनी घट झालेली आहे.

सोन्याचा भाव
२४ कॅरेट १ ग्राम सोन्याचा भाव ४,८०७ रुपये झाला आहे. सोन्याचा १० ग्रामचा दर ४८,०७० रुपये इतका आहे. २२ कॅरेट सोन्याचा प्रति ग्राम भाव ४,५७८ रुपये इतका आहे. तर १० ग्रामसाठी तुम्हाला ४५,७८० रुपये मोजावे लागतील.

चांदीचा भाव
आज चांदीच्या भावात घट झाली आहे. आज चांदी ६३० रुपयांची घट झाली असून १ ग्राम चांदीचा भाव आज ७०.०५ रुपये इतका असून १ किलोचा दर ७०,५०० रुपये इतका आहे.

जळगाव उपविभागात जुगारावर धडक कारवाई, १६ लाखांचा मुद्देमाल जप्त

0
jugar

जळगाव लाईव्ह न्यूज । १५ मे २०२१ । जिल्ह्यात अक्षयतृतीयेच्या दिवशी जुगार मोठ्या प्रमाणात खेळला जातो हे लक्षात घेत जळगाव उप विभागाचे सहाय्यक पोलीस अधिक्षक कुमार चिंथा यांच्यासह पथकाने आपल्या उपविभागात विविध कारवाया केल्या. एमआयडीसी, रामानंद, तालुका, शनीपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत जुगाराच्या आणि अवैध दारू विक्रीच्या कारवाया करण्यात आल्या. पथकाने तब्बल १६ लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. सहाय्यक अधीक्षक कुमार चिंथा यांच्या पथकाने विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल केले आहे.

तालुका पोलिस स्टेशन हद्दीतील आव्हाणे या गावी सरपंच पतीसह एकुण १२ जणांवर जुगाराची कारवाई करण्यात आली. या धाडीत 3 लाख 36 हजार 530 रुपये रोख, 11 मोबाईल व 4 मोटार सायकली जप्त करण्यात आले आहेत. एमआयडीसी पोलिस स्टेशन हद्दीतील हुडको परिसरातील धाडीत 31 हजार 970 रुपये रोख, 4 मोबाईल व 9 जुगारी ताब्यात घेण्यात आले आहेत. एमआयडीसी शिरसोली भागातील धाडीत 1 लाख 59 हजार रुपये रोख, 3 मोबाईल व तिन जुगारी ताब्यात घेण्यात आले आहेत. शनीपेठ पोलिस स्टेशन हद्दीतील धाडीत 23 हजार 670 रुपये रोख, 2 मोबाईल व 6 जुगारी ताब्यात घेण्यात आले आहेत. एमआयडीसी व्ही सेक्टर भागातील धाडीत 14 हजार 516 रुपये रोख, 4 मोबाईल व 7 जुगारी ताब्यात घेण्यात आले आहेत. रामानंद नगर पोलिस स्टेशन हद्दीतील शिव कॉलनी भागातील धाडीत 12 लाख 80 हजार 820 रुपये रोख, 4 फोर व्हिलर, 3 मोटार सायकली, 7 मोबाईल व 7 जुगारी ताब्यात घेण्यात आले आहेत. याशिवाय दोन ठिकाणी प्रोव्हिबीशन कारवाई करण्यात आली असून त्यात 1650 रुपये रोख व 1 जण ताब्यात घेण्यात आला आहे.

या पथकाने केली कारवाई

सहाय्यक पोलीस अधिक्षक कुमार चिंथा यांच्यासह सहायक फौजदार भटू नेरकर, हे.कॉ. रामचंद्र बोरसे, कमलेश नगरकर, मनोज दुसाने, किरण धमके, विजय काळे, राजेश चौधरी, कैलास सोनवणे, पोलिस नाईक सुहास पाटील, महेश महाले, सुहास पाटील, पो.कॉ. रविंद्र मोतीराया, प्रसाद जोशी यांचा पथकात समावेश होता.

आव्हाणे येथे आखाजीचा जुगार उधळला, सरपंच पतीसह १२ जणांवर कारवाई

0
crime

जळगाव जिल्ह्यात आज पोलिसांनी अनेक ठिकाणी आखाजीनिमित्त रंगणारे जुगाराचे डाव उधळून लावले. आव्हाणे शिवारात सुरू असलेल्या जुगाराच्या डाववर सहाय्यक अधीक्षक कुमार चिंथा यांच्या पथकाने छापा टाकला. कारवाईत सरपंच पतीसह १२ जणांना ताब्यात घेण्यात आले असून साडेतीन लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

तालुका पोलिसात दाखल गुन्ह्यानुसार, आव्हाणे शिवारात भगवान नामदेव पाटील यांच्या मालकीचे शेत गट नं.१३५/१३६ मधील पत्री शेडचे खोलीत पत्ता जुगाराचा खेळ खेळतांना पथकाने छापा टाकला. पथकाने  १) भगवान नामदेव पाटील उर्फ पिंटू २) नामदेव गोपाल पाटील ३) सोपान धर्मराज पाटील ४) हिरालाल श्रीराम चौधरी ५) अशोक नारायण पाटील ६) विजय शामराव पाटील ७) संजय सुभाष पाटील ८) संजय शांताराम पाटील ९) रावसाहेब गोपाल चौधरी १०) अकाश लहु पाटील ११) शिवनाथ रधुनाथ चौधरी १२) यशवंत मंगल पाटील यांच्यावर कारवाई केली आहे. कारवाईत पत्त्याचे कॅटसह, ११ मोबाईल ४ मोटार सायकल व रोख रक्कम ३ लाख ३६ हजार ५३० रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. याप्रकरणी तालुका पोलिसात नोंद करण्यात आली आहे.

पाचोरा तालुक्यात जुगार अड्ड्यांवर पोलिसांचा छापा ; लाखो रुपयांचा मुद्देमालसह २१ जण ताब्यात

0
pachora (1)

जळगाव लाईव्ह न्यूज । १४ मे २०२१ । पाचोरा तालुक्यातील नगरदेवळा, आखतवाडे शिवारात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलिस अधिक्षक प्रविण मुंढे यांच्या आदेशाने भडगाव पोलिस स्टेशनचे पोलिस निरिक्षक अशोक उतेकर यांच्या नेतृत्वाखाली जळगाव येथिल एस. आर. पी प्लाटुन तुकडी व भडगाव पोलिस कर्मचार्‍यांच्या सहाय्याने छापा टाकला. या छाप्यात ७ लाख ५१ हजार रूपये किंमतीच्या ३१ मोटरसायकली सोबत १ लाख २१ हजार ५८० रूपये रोख व २१ आरोपी ताब्यात घेण्यात आले.

या गोपनीय कारवाहित रोख रक्कमसह  मुद्देमालाची रक्कम ही ८ लाख १५ हजार ५७० रूपयांची कारवाही चकित करणारी आहे. या कारवाहीमुळे नगरदेवळा आऊटपोस्ट पोलिस स्टेशन येथे कार्यरत असलेल्या अधिकारी व कर्मचार्‍यांच्या कार्यप्रणालीबाबत प्रश्न उपस्थित होत आहे. या कारवाही प्रकरणी पाचोरा पोलिसात गुन्हा नोंदविण्यात आला असुन आरोपींना जामिनवर सोडण्यात आले असुन घटनास्थळी ताब्यात घेतलेली दहा हजार रूपये किंमतीचे एक ईन्व्हर्टर बॅटरी, ३१ मोटरसायकली नगरदेवळा आउऊटपोस्ट पोलिस स्टेशन ताब्यात ठेवल्या आहेत.

याबाबत पाचोरा पोलिस सुञांकडुन मिळालेली माहीती अशी की, १३ मे रोजी राञी भडगाव पोलिस स्टेशनचे पोलिस निरिक्षक अशोक उतेकर यांना जळगाव जिल्ह्याचे पोलिस अधिक्षक प्रविण मुंढे यांनी फोन द्वारे नगरदेवळा ते आखतवाडे रस्त्यालगत काही नागरिक बेकायदेशीररित्या एकञ जमले असुन जुगार खेळत असल्याची गोपनीय माहीती प्राप्त झाली आहे. तुम्ही या ठिकाणावर छापा मारुन कारवाही करण्याचे आदेश दिले सोबत जळगाव येथुन आर. सी. पी. प्लाटुन तुकडी पाठवित असल्याचे कळविले. पोलिस निरिक्षक अशोक उतेकर यांनी लगेच भडगाव पोलिस स्टेशनला कर्तव्यावर असलेले पोलिस उपनिरिक्षक आनंद पटारे, पो. काॅ. ईश्वर पाटील, नितिन रावते व लक्ष्मण पाटील यांना कॅबिनला बोलवुन या कारवाहीची माहीती दिली व जळगाव येथुन येणार्‍या आर. सी. पी. प्लाटुनची वाट पाहत थांबले. राञी १२:१० वाजता पोलिस अधिक्षक यांनी पाठवलेली प्लाटुन व भडगाव येथील निवडक कर्मचारी घेऊन पोलिस निरिक्षक अशोक उतेकर यांनी घटनास्थळाकडे मार्गक्रमण केले. पोलिस अधिक्षक यांनी दिलेल्या माहीतीप्रमाणे त्या निंबुच्या बागेत लाईट लाऊन जुगार खेळला जात होता. तर शेताच्या बांधावर मोटारसायकली उभ्या करून ठेवल्या होत्या. अशोक उतेकर यांनी यावेळी दोन तुकड्यांमध्ये कर्मचारी विभागुन शेताच्या दोन बाजुंनी छापा टाकला.या छाप्यात २१ जण पोलिसांच्या ताब्यात आले तर काहीजण अंधाराचा फायदा घेउन पळुन जाण्यात यशस्वी झाले.यावेळी ताब्यात घेतलेल्या २१ जणांना नगरदेवळा आउटपोस्ट पोलिस स्टेशनला आणण्यात आले.सोबतच शेताच्या बांधावर असलेल्या ३१ मोटरसायकलीही पौलिस स्टेशनला आणल्या गेल्या.

या प्रकरणी २१ जणांविरुध्द भडगाव पोलिस स्टेशनचे पोलिस काॅस्टेबल स्वप्निल बाळासाहेब चव्हाण यांच्या फिर्यादिनुसार भाग ०६ गु.र.नं. १८७/२१ महाराष्ट जुगार अॅक्ट कलम १२(अ),भादवी कलम १८८,२६९,२७० सह महा.पोलिस कायदा कलम ३७ (१) ३ चे उल्लंघन कलम १३५  प्रमाणे गुन्हा नोंदविला आहे.या प्रकरणी पुढील तपास पोलीस उपनिरिक्षक नलावडे हे करित आहेत.

या छाप्यात ज्यांच्यावर गुन्हा नोंदविण्यात आला त्यांची नावे कंसात वय गावाचे नाव व त्यांच्याकडे मिळालेली रोख रक्कम पुढील प्रमाणे..

रमेश संभाजी बिरारी (वय – ३३ रा.  खाजोळा ३ हजार १०० रुपये )

हितेश बागुल पाटील ( वय – २२ रा. कजगाव ४ हजार २०० रुपये),

संजय केशव पाटील ( वय – ५१ रा.  खाजोळा ७ हजार ३०० रुपये),

नरेंद्र किसन शिंदे (वय – ३४ रा. राममंदिर चौक, पारोळा २ हजार ५२० रुपये),सुनिल बाबुलाल शेलार (वय –  ४५ रा. टाकळी ६ हजार ४६० रुपये),

भाऊसाहेब भानुदास मराठे (वय – ३२ रा. टाकळी ३ हजार ३३० रुपये),

कन्हैय्या फकिरासिंग परदेशी (वय – ५० रा. नगरदेवळा २ हजार ५१० रुपये), रतन चिंधा पाटिल (वय – ६५ नगरदेवळा ३४ हजार रुपये), राहुल ईश्वर पाटील (वय – २४ रा. टाकळी ५ हजार ५०० रुपये), दिनेश प्रकाश भोई ( वय – ३२ रा. कजगाव ७ हजाय६५० रुपये), रविंद्र सर्जेराव पाटील (वय – २६ रा. भोरटेक ५ हजार २२० रुपये),

नितिन गरबड शेळके ( वय -३० रा. टाकळी २ हजार ८१० रुपये), नवल ञ्यंबक महाजन (वय – ४२ रा. टाकळी ४ हजार ५०० रुपये), साबिरशाहा सुलेमानशाहा (वय – ३६ रा. आखतवाडे ३ हजार १५० रुपये),

मनोज हिलाल महाजन (वय – २४ रा. कजगाव १ हजार ७५० रुपये), सोनुसिंग खुशाल पाटील (वय – ३० रा. खाजोळा ४ हजार ६०० रुपये),

पंकज अरूण पाटील (वय – २९ रा. खाजोळा ३ हजार ४१० रुपये),

संदिप तुकाराम साळुंखे (वय – २८ रा. टाकळी ३ हजार६०० रुपये), निंबा विठ्ठल नागणे (वय – ४० रा. भोरटेक २ हजार ७०० रुपये), अमोल वाल्मिक मुलमुले (वय – ३० रा. टाकळी १ हजार ६० रुपये), उज्जवल रमेश पाटील (वय – ३० रा.  खाजोळे २ हजार रुपये), या प्रकरणी ताब्यात घेण्यात आलेल्या ३१ मोटरसायकली पुढील प्रमाणे.. एम. एच. – १९ – ए. सी. – ४२३१  (हिरोहोंडा – विस हजार), एम. एच. – १९ – डी. ए. – ६५५७  (हिरो कंपनी – तीस हजार), एम. एच. – १९ – बी. पी. – ०७९१ (हिरोहोंडा – विस हजार), एम. एच. – १९ – बी. ई. – ८०७३ (बजाज – अठरा हजार), एम. एच. -१९ – बी. ए. – ३६४४ (बजाज – विस हजार), एम. एच.- १९ – ए. ए. – ४५०० (हिरोहोंडा – अठरा हजार), एम. एच.  – १९ – डी. एल. – ०८३९ (हिरो पंचविस – हजार), एम. एच. – १९ – ए. व्ही. – ४३२६  (हिरो – तीस हजार), एम. एच. – ०४ – इ. एम. – ५००२ (हिरोहोंडा –  विस हजार), एम. एच. – १९ – डी. ए. – ०८६७ (बजाज –  पंचविस हजार), एम. एच. – ०५ – ए. सी. – ४७९५  (हिरो – विस हजार), एम. एच. – १९ – सी.के. – ५४९८ ( बजाज – पस्तिस हजार), एम. एच. – १९ – सी. डी. – ३१८४ (होंडा – तीस हजार), एम. एच. – १९ – ए. टी. – ३८४०  (हिरोहोंडा –  विस हजार), एम. एच. – १९ – डी. बी.  – ४०३२  (होंडा – तिस हजार), एम. एच. – १९ – सी. सी. – ३८९७ (बजाज – विस हजार), एम. एच. – १९ – डी. एफ. – ०४९७ (हिरोहोंडा – विस हजार), एम. एच. – १९ – डी. एल. – ९४४०  (हिरो – पंचविस हजार), एम. एच. – १९ – बी. एच. – ५१३८  (टी. व्ही. एस. स्टार – विस हजार), एम. एच. – १५ – आर  – ५२९० (होंडा – तिस हजार), एम. एच. – १९ – सी. डी.  – ८५२९  (होंडा – तिस हजार),  एम. एच. – १९ – डी. ए.  – ८२२२ (हिरो – तीस हजार), एम. एच. – १९ – ए. यु. – ०८४९ (होंडा – विस हजार), एम. एच. – १९ – डी. एम. – ४३६४ (बजाज – विस हजार), एम. एच. – १९ – डी. एच.  – ६९१६ (होंडा – तीस हजार), एम. पी. – ६८ – एम. ई. – ४६३५ (होंडा – तीस हजार), एम. एच – १९ – सी. क्यु. – ५६६९ (हिरो पंचविस हजार), विना नंबरची सुझुकी मॅक्स १०० (विस हजार) याप्रमाणे ३१ मोटरसायकली जप्त करण्यात आल्या आहेत.

जळगावात दुचाकी चोरीच्या प्रयत्नात असलेल्या तरुणास रंगेहात पकडले

0
crime

जळगाव लाईव्ह न्यूज । १४ मे २०२१ । जळगाव शहरात मागील काही दिवसापासून दुचाकी चोरीस जाण्याच्या घटना घडतच आहे. यामुळे वाहनधारकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. दरम्यान, आता दुचाकी चोरीच्या प्रयत्नात असलेल्या चोरास रंगेहात अटक करण्यात आली आहे.

शहरातील घाणेकर चौकात पार्किंगला लावलेली यावल येथील व्यापाऱ्याची २५ हजार रूपये किंमतीची दुचाकी लांबवितांना एका तरूणाला रंगेहात पकडले आहे. विनेश चंपालाल बंडोर (वय-२७ रा. अंजनगाव ता. सेंधवा जि. बडवाणी (म.प्र)) असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव असून याबाबत शनीपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत असे की, यावल येथील कटलरी किराणा मालाचे व्यापारी अझहर खान फारूख रेहमान खान (वय-३७)  हे किरणा भुसार माल घेण्यासाठी गुरूवारी १३ मे रोजी जळगाव शहरातील घाणेकर चौकात दुचाकीने आले. त्यांनी चौकातील हॉटेल सावरिया येथे दुचाकी (एमएच १९ एएफ १५८६) पार्किंगला लावली.  किराणाचा होलसेल माल घेण्यासाठी दुकानावर निघाले. दुकानावर उभे असतांना अज्ञात चोरट्याने दुचाकी चोरून गाडीला किक मारली असता दुचाकीच्या सायलेन्सरच्या आवाज अझहर यांनी ओळखला. त्यांनी दुचाकीकडे पाहिले तर चोरट्या दुचाकी घेवून पळ काढत होता. दरम्यान, त्यांचा पाठलाग करून रंगेहात पकडून शनीपेठ पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. विनेश चंपालाल बंडोर (वय-२७) रा. अंजनगाव ता. सेंधवा जि. बडवाणी (म.प्र) असे संशयित आरोपीचे नाव आहे. अझहर खान यांच्या फिर्यादीवरून शनीपेठ पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दिलासादायक : ॲक्टीव्ह रूग्णांची संख्या झाली कमी; जाणून घ्या आजची कोरोना आकडेवारी

0
corona (1)

जळगाव लाईव्ह न्यूज । १४ मे २०२१ । जळगाव जिल्ह्यात लॉकडाऊनमुळे कोरोना आकडेवारी झपाट्याने कमी होत आहे. जिल्ह्यात मागील काही दिवसापासून कोरोना संसर्गाचा आलेख स्थिर आहे. दरम्यान, आज शुक्रवारी ॲक्टीव्ह रूग्णांची संख्या झाली कमी झाली असून नव्या बाधित रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक आहे. आज दिवसभरात जिल्ह्यात ६८१ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर आज ८११ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहे. गेल्या २४ तासात ९ जणांचा बळी गेला आहे.

जळगाव जिल्ह्यात महिनाभरापासून कोरोना संसर्गाचा आलेख स्थिर असून बरे होणाऱ्यांचे प्रमाण वाढत आहे. तसेच आठवडाभरापासून रोजचे मृत्यूही काही प्रमाणात घटले आहेत. शुक्रवारी ५ हजार ०९८ चाचण्यांचे अहवाल प्राप्त झाले. पैकी८६१ नवे बाधित आढळून आले. यामुळे जिल्ह्यात एकूण रुग्णसंख्या १ लाख ३३ हजार ८९३ वर गेली आहे. आज दिवसभरात ८११ रुग्ण बरे झाल्यानंतर बरे होणाऱ्यांचा आकडा १ लाख २१ हजार ७८२ वर पोचला आहे. तर गेल्या २४ तासात ९ जणांचा बळी गेला आहे. त्यामुळे मृताचा एकूण आकडा २३९५ वर गेला आहे. जिल्ह्यात सध्या ९७१६ रुग्णांवर उपचार सुरु आहे.

जळगाव शहरासाठी दिलासा :

मार्च महिन्याच्या सुरुवातील जळगाव शहरात जिल्ह्यात सर्वाधिक रुग्ण आढळून येत होती. मात्र मागील महिन्यापासून जळगाव शहरात बाधित रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक आहे. आज तर शहरात २ ते ३ महिन्यानंतर सर्वात कमी रुग्ण आढळून आले आहे. आज दिवसभरात ६० नवे रुग्ण आढळून आले आहे तर १८९ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहे. तर २ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. शहरात सध्या १२३३ रुग्ण उपचार घेत आहे.

आजची आकडेवारी
जळगाव शहर ६०, जळगाव ग्रामीण १६, भुसावळ ८२, अमळनेर २९, चोपडा ६८, पाचोरा ४, भडगाव ३, धरणगाव २९, यावल ३२, एरंडोल ४४, जामनेर १६, रावेर ४७, पारोळा ३५, चाळीसगाव ९२, मुक्ताईनगर ७२, बोदवड ३४, अन्य जिल्ह्यातील १८.

ताप्ती सातपुडा जर्नालिस्ट फाउंडेशनकडून तृतीयपंथी यांना पाण्याची टाकी भेट

0
savda (1)

जळगाव लाईव्ह न्यूज । १४ मे २०२१ । सावदा येथील ताप्ती सातपुडा जर्नालिस्ट फाउंडेशन चे प्रयत्नातून व यशस्वी उद्योजक श्रीराम पाटील यांच्यातर्फे व यशस्वी उद्योजक हाजी बाबु शेठ यांच्या सहकार्याने येथील तृतीय पंथी समुदायाला २००० लिटर क्षमतेची पाण्याची टाकी भेट देण्यात आली.ती नुकतीच त्यांना सुपूर्द करण्यात आली.

कोरोना लॉक डाऊन मुळे तृतीय पंथी समुदायाचे भिक्षा मागणे बंद असल्याने तृतीय पंथी (हिजडा) अनेक अडचणींना सामोरे जात आहे.सध्या उन्हाळ्याचे दिवस आहे.त्यांना पाण्याच्या टाकीची खूप गरज भासत असल्याचे तृतीय पंथी शामिभा यांनी ही बाब ताप्ती सातपुडा जर्नीलिस्ट फाउंडेशन कडे बोलून दाखविली.त्याचा विचार करून संस्थेने उद्योजक श्रीराम पाटील याना विनंती केली असता त्यांनी ही टाकी उपलब्ध करून दिली.तर ती आणून देणे आदी.साठी उद्योजक बाबु शेठ यांनी पण सहकार्य केले आहे.या दोघ उद्योजकांनी मोलाची मदत केल्याबद्दल आभारी आहोत.

यावेळी बोलताना तृतीय पंथी शामिभा गुरू आरती जान म्हणाल्या आमच्या कुटुंबात ८ जण आहोत. पण कोरोना मुळे भिक्षा मागणे बंद आहे.आमच्या परिवाराला पाणी साठवण्यासाठी टाकी नसल्याने खूप मोठी गैरसोय होत होती.ही बाब आम्ही ताप्ति सातपुडा संस्थे कडे व्यक्त केली तर त्यांनी लागलीच प्रयत्न करून टाकी उपलब्ध करून दिली.आणि यासाठी उद्योजक श्रीराम पाटील,हाजी बाबु शेठ यांनीही सहकार्य केले.याबद्दल आम्ही तृतीय पंथी आभारी आहोत.

यावेळी ताप्ती सातपुडा फाउंडेशनचे अध्यक्ष श्यामकांत पाटील,उपाध्यक्ष प्रवीण पाटील, सरचिटणीस आत्माराम तायडे, कार्याध्यक्ष पंकज पाटील, राजू  दिपके, साजिद शेख,लाला कोष्टी, राजेंद्र भारंबे , रवींद्र हिवरकर, पिटू कुलकर्णी रोशन वाघुळदे, राजेश पाटील, मिलिंद टोके,भारत हिवरे,मिलिंद कोरेे,.कमलाकर पाटील, अज्जू शेख विक्की भिडे, सिद्धेश तायडे, आदि. उपस्थित होते.

ऑक्सिजन टॅंक संपला, मात्र हिम्मत कायम : ‘टीमवर्क’मुळे २७० रुग्णांचे वाचवले प्राण

0
jalgaon (2)

जळगाव लाईव्ह न्यूज । १४ मे २०२१ । जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील ऑक्सिजन समितीचे अध्यक्ष डॉ.  संदीप पटेल यांचा अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी शुक्रवारी १४ मे रोजी पुष्प देऊन सत्कार केला. गुरुवारी १३ मे रोजी रात्री ऑक्सिजन टॅंक संपल्यानंतर उत्तम ‘टीम मॅनेजमेंट’ करीत उपलब्ध ऑक्सिजन बॅकअप प्रणालीद्वारे शिस्तबद्ध व्यवस्थापन करून रुग्णांचा श्वास निरंतर सुरु ठेवल्याबद्दल तसेच, १४ रोजी त्यांचा वाढदिवस असतानाही त्यांनी कर्तव्याला प्राधान्य दिल्याबद्दल  त्यांचे कौतुक करण्यात आले.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात ऑक्सिजनचे नियोजन करण्यासाठी ऑक्सिजन समिती गेल्या १५ महिन्यांपासून कार्यरत आहे. या समितीचे कामकाज निरंतरपणे बधिरीकरण शास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. संदीप पटेल सांभाळत आहेत. त्यांनी यापूर्वी देखील आणीबाणीची परिस्थिती उदभवत असताना यशस्वीपणे ऑक्सिजन सिलेंडरचे नियोजन करून वैद्यकीय सेवेत अविरत सेवा दिली आहे. रुग्णाचा जीव गमवावा लागण्याची शक्यता असल्याने अधिक काळजी घेऊन ऑक्सिजन प्रणालीचे व्यवस्थापन डॉ. पटेल करीत आहे.

गुरुवारी १३ मे रोजी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील २० किलो लिटरचे ऑक्सिजन टॅंक संध्याकाळी ७. ३० वाजता पूर्णपणे संपले. मात्र हिम्मत न हरता  ऑक्सिजन टॅंक संपण्याच्या १० मिनिट आधी डॉ. पटेल यांनी  तातडीने १०० ऑक्सिजन सिलेंडरची बॅकअप प्रणाली सुरु केली. ज्यांची ड्युटी संपली आहे, त्या कर्मचाऱ्यांनाही तातडीने बोलावून ‘ऑपरेशन ऑक्सिजन’ सुरु केले. सर्व वॉर्डात जाऊन त्यांनी आढावा घेतला. मक्तेदाराला संपर्क करीत नव्याने १०० सिलेंडर आणखी मागवून घेतले. ऑक्सिजन टँकर मध्यरात्री १२ वाजून ४२ मिनिटांनी ऑक्सिजन टँकर आले त्यावेळी त्यांनी टँकर पूर्ण उतरवून घेतला, त्यानंतर त्यांनी सुटकेचा  निःश्वास सोडला.

तब्बल आठ तास ऑक्सिजन समितीची धावपळ सुरु होती.  यावेळी अधिष्ठाता डॉ. रामानंद हेदेखील तब्बल ६ तास थांबून डॉ. पटेल यांचे व्यवस्थापन पाहत वेळ पडल्यास त्यांना मार्गदर्शन करीत होते. रात्री १२ वाजेनंतर वाढदिवसानिमित्त त्यांना त्यांच्या कुटुंबीयांनी सदिच्छा देण्यासाठी फोन केले. मात्र, ‘महत्वाच्या कामात आहे, नंतर बोलूया’ म्हणत त्यांनी कर्तव्याला प्राधान्य देत ऑक्सिजन प्रणाली सुरळीत करण्यासाठी स्वतः:ला झोकून दिले होते. त्यामुळे एकही रुग्णाच्या जीवाला धोका निर्माण झाला नाही.

यावेळी त्यांना ऑक्सिजन समितीचे सदस्य तथा कार्यालय अधीक्षक संजय चौधरी, अनिल पाटील, गजानन चौधरी, नितीन चौधरी, दीपक पवार, भीमराव ढाकणे, किशोर माळी, किशोर सोनवणे, सुभाष असोदेकर, गणेश शिंपी, लोकेश मिस्त्री, उज्ज्वल गोयर, मिलिंद चौधरी, प्रवीण साळुंके, यशवंत राठोड, विनोद राठोड यांचे सहकार्य लाभले. समयसूचकता दाखवत ऑक्सिजन प्रणालीचे कार्य  उत्तम पद्धतीने केल्याबद्दल व वाढदिवसानिमित्त डॉ. संदीप पटेल यांचा  शुकवारी १४ रोजी  अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी पुष्प देत सत्कार केला. यावेळी वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रशांत देवरे, स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. संजय बनसोडे, सहयोगी प्रा. डॉ. विजय गायकवाड, डॉ. सतीश सुरळकर उपस्थित होते.