जळगाव लाईव्ह न्यूज । १७ मे २०२१ । सावदा येथील आकाश मनोजकुमार पाटील या युवकाने अमेरिकेतील सॅनदिॲगो येथे सुमारे १३ हजार ५०० फूट उंचीवरून स्काय डायव्हिंग विमातून उडी घेऊन चित्तथरारक कामगिरी केली. ही कामगिरी करताना विमानाने १३ हजार ५०० फूट उंचीवर जाऊन विमानातून बलूनच्या मदतीने बाहेर पडून अवकाशात झेप घेण्याची कामगिरी आकाशने पार पाडली.
मानसिक क्षमता आणि धाडसी वृत्तीचा कस लागणाऱ्या या खेळात , अत्यंत कमी संख्येने खेळाडू सहभागी होतात . ही कामगिरी सावदा येथील आकाश पाटील या खेळाडूने अमेरिकेत यशस्वीपणे पाडून देशाचा गौरव वाढवला आहे. आकाश पाटील सावदा येथील नानासाहेब विष्णू हरी पाटील यांचे पणतू व दादासाहेब वसंतराव पाटील औद्योगिक वसाहतीचे चेअरमन मनोजकुमार पाटील यांचा मुलगा आहे . अमेरिकेत त्याने एम.एस. अभियांत्रिकी पदवी प्राप्त केली आहे.
कामगिरीबद्दल आकाशचे सावद्याचे माजी नगराध्यक्ष रवींद्र विष्णू पाटील, माजी मसाका संचालक नरेंद्र नारखडे, डॉ.गिरीश लोखंडे , डॉ.ए.के. जावळे, अमूल्य डहाणूकर, डॉ.पद्माकर पाटील, अनिल नारखेडे , औद्योगिक वसाहतीचे संचालक मंडळ, श्री लक्ष्मी नागरी पतसंस्थेचे संचालक मंडळ, चंद्रशेखर चौधरी, योगेश भावसार, नितीन राणे , भास्करराव चौधरी , पंडित कोल्हे , शेखर चौधरी यांनी कौतूक केले.