⁠ 
शनिवार, नोव्हेंबर 16, 2024

जळगाव शहरात आज लस उपलब्ध नसल्याने लसीकरण बंद

0
vaccination on corona is effective

जळगाव लाईव्ह न्यूज । १८ मे २०२१ । जळगाव शहरातील केंद्रावर कोविशिल्ड लसीचेही डोस संपल्यामुळे लसीकरणाचे सर्वच केंद्र बंद राहणार आहे. दरम्यान, आज मंगळवारी सायंकाळपर्यंत कोविशिल्ड लसीचे ४७०० डोस प्राप्त होण्याची शक्यता असून बुधवारपासून हे केंद्रावर उपलब्ध होतील.

कोविशिल्ड लसीच्या दुसऱ्या डोस मध्ये अंतराचे नवे नियम लागू केल्याने जळगावात सोमवारी केवळ २ लाभार्थ्यांनी लसीचा दुसरा डाेस घेतला आहे. कोव्हॅक्सिनचीच दुसऱ्या डोससाठी नागरिकांना प्रतिक्षा असून कोव्हॅक्सिन नेमके डोस येणार कधी हे अनिश्चित असून कोविशिल्डच्या तुलनेत ते अत्यंत कमी येत आहेत. रविवारी आलेले डोस एकाच दिवसात दुपारपर्यंत संपले होते.

दरम्यान, मंगळवारी महापालिकेच्या केंद्रांसह रेडक्रॉस आणि रेाटरी हे अशी सर्वच केंद्र लस उपलब्ध नसल्याने बंद राहणार आहेत. महापालिकेचे केंद्र बंद राहणार असल्याची माहिती प्रमुख वैद्यकीय अधिकारी डॉ. राम रावलानी यांनी दिली.

सोने-चांदीच्या भावात मोठी वाढ ; जाणून घ्या आजचे जळगावातील भाव

0
gold

जळगाव लाईव्ह न्यूज । १८ मे २०२१ । मागील काही दिवसापासून सोने आणि चांदीच्या भावात चढ उतार दिसून येत आहे. दरम्यान, जळगावातील सुवर्णबाजारात सोन्याच्या भावात आज पुन्हा वाढ झाली आहे. तर चांदीच्या भावात तब्बल ५ हजार ६०० रुपयांनी वाढ झाली आहे. कोरोनाची दुसरी लाट देशात थैमान घालत असताना सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याला पुन्हा एकदा सुगीचे दिवस आले आहेत.

आजचा सोन्याचा भाव

२४ कॅरेट १ ग्राम सोन्याचा भाव २६ रुपयांनी वाढून ४,८५९ रुपये झाला आहे. त्यामुळे सोन्याचा १० ग्रामचा दर ४८,५९० रुपये इतका आहे. २२ कॅरेट सोन्याचा प्रति ग्राम भाव ४,६२८ रुपये इतका आहे. त्यात प्रति ग्रम २५ रुपयांची वाढ झाली असून १० ग्रामसाठी तुम्हाला ४६,२८० रुपये मोजावे लागतील.

चांदीचा भाव  

तर चांदीच्या भावात आज मंगळवारी मोठी वाढ झाली आहे. तब्बल ५ हजार ६०० रुपयांनी ही वाढ झाली आहे. त्यामुळे आज चांदीचा १ ग्राम चांदीचा भाव आज ७६.०६ रुपये इतका असून १ किलोचा दर ७६,६०० रुपये इतका आहे.

एरंडोल येथे नियम तोडणाऱ्यांवर स्वतः प्रांताधिकाऱ्यांनी केली कारवाई

0
erandol

जळगाव लाईव्ह न्यूज । १७ मे २०२१ । कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता शासनाकडून लॉकडाऊन 1 जून पर्यंत वाढवण्यात आले आहे. त्याअनुषंगाने एरंडोल शहरात  नियम बाह्य दुकानें सुरु ठेवणाऱ्या दुकानदारांनावर व सकाळी 11 वाजेनंतर बाहेर फिरणाऱ्यावर आज दि.१७ मे रोजी  दंडात्मक कार्यवाही करून फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आले.

याप्रसंगी एरंडोलचे  प्रांताधिकारी श्री विनय गोसावी हे स्वतः रस्त्यावर उतरुन कारवाई करीत होते.त्यांच्या सोबत पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव, एरंडोल न.पा. चे मुख्याधिकारी जनार्दन पवार,कार्यालयीन अधिक्षक हितेश जोगी,पोलीस उपनिरीक्षक अविनाश दहिफळे,तुषार देवरे,पोलीस कर्मचारी संदिप सातपुते,संतोष चौधरी,विकास खैरनार,रवी सफकाळे, बांधकाम अभियंता देवेंद्र शिंदे, विनोदकुमार पाटील, अजित भट,अशोक मोरे, आर.टी.महाजन,प्रकाश सूर्यवंशी, सर्व वसुली कर्मचारी व गृहरक्षक दलाचे महिला व जवान उपस्थित होते.

चाळीसगाव येथे गोवंशाची वाहतूक करणाऱ्यांना पकडले

0
chalisagaon (1)

जळगाव लाईव्ह न्यूज । १७ मे २०२१ । बोलेरो गाडीत संशयित रित्या गायी व बच्चे घेऊन जात असताना संशय आल्याने आज दि 17 रोजी सायंकाळी 5-30 वाजेच्या सुमारास बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी पकडले आहे.

दरम्यान, चाळीसगाव शहरातील छाजेड मिलजवळ हटकले असता गाडी घेऊन पळून गेले त्यांनी पाठलाग करून हुडको मध्ये त्रिमूर्ती बेकरीच्या पाठीमागे बोलेरो क्र MH19 BM3626 गाडी ताब्यात घेऊन गाडीत 2 गायी 4 बच्चे मिळून आले आहेत ठिकाणी जमावाने बजरंग दलाचे कार्यकर्ते योगेश चौधरी, सोमा चौधरी, भैय्या चौधरी, वसंत बच्छाव, प्रदीप मस्तुद यांना धमकी  दमदाटी केली असे त्यांनी सांगितले आहे. त्याठिकाणांहून 2 जण पळून गेले असून एकास संशयितास ताब्यात घेऊन गाडीसह पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.

माजी मंत्री गिरीश महाजनांच्या वाढदिवसानिमित्त पाचोरा व भडगाव तालुक्यात लोकाभिमुख उपक्रम

0
pachora

जळगाव लाईव्ह न्यूज । १७ मे २०२१ । पाचोरा येथील भारतीय जनता पार्टी पाचोरा व भडगाव च्या वतीने मा.मंत्री आमदार गिरीश महाजन यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने कुठल्याही पद्धतीचे बोर्ड-बॅनर  नलावता कोरोनासारख्या परिस्थितीत विविध लोकाभिमुख उपक्रम राबविण्यात आले.

चिटणीस सोमनाथ पाटील भाजपा तालुकाध्यक्ष अमोल शिंदे व अमोल पाटील आणि जिल्हा  यांच्या प्रमुख उपस्थितीत ग्रामीण भागातील वाढत्या कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर गावागावांत सोडियम हायपोक्लोराइट ची फवारणी करण्याचा संकल्प करून त्याची सुरुवात आज भडगाव तालुक्यातील श्रीक्षेत्र कनाशी या गावापासून करण्यात आली.  यामध्ये पाचोरा भडगाव तालुका मिळून जवळपास पन्नास गावांमध्ये ही फवारणी केली जाणार असून,त्यामुळे वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गावे निर्जंतुकीकरण करुन याचा नक्कीच लोकांच्या आरोग्यासाठी फायदा होईल असे यावेळी अमोल शिंदे यांनी बोलताना सांगितले.

तसेच आमदार महाजन यांनी जिल्ह्यातील कोरोणाच्या बिकट परिस्थितीमुळे वाढदिवस साजरा न करता लोकाभिमुख उपक्रम राबवावे असे आवाहन केले होते. त्या निमित्ताने आम्ही पाचोरा व भडगाव तालुक्यातून जवळपास पन्नास गावे ही फवारणी करून निर्जतुकीकरण करण्याचा संकल्प केला आहे. त्याची सुरुवात आज भडगाव तालुक्यातील श्रीक्षेत्र कनाशी या गावातून करीत आहोत. असे देखील त्यांनी बोलताना सांगितले तसेच यावेळी कोरोनाग्रस्त रुग्णांना फळ वाटप करून आमदार महाजन यांचा वाढदिवस साध्या पद्धतीने पाचोरा व भडगाव तालुक्यात साजरा करण्यात आला. या प्रसंगी स्थानिक पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.

क्रीडा संकुलात खेळाडूंना माफक दरात चांगल्या सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात ; पालकमंत्री

0
gulabrao patil

जळगाव लाईव्ह न्यूज । १७ मे २०२१ । जळगाव जिल्ह्यात अधिकाधिक दर्जेदार खेळाडू तयार व्हावेत, याकरीता जिल्हा क्रीडा संकुलात खेळाडूंना माफक दरात चांगल्या सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात. असे निर्देश राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी दिलेत.

जिल्हा क्रीडा संकुल कार्यकारी समितीची बैठक येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात पालकमंत्री श्री. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली, यावेळी ते बोलत होते. बैठकीस आमदार सुरेश भोळे, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील, पोलीस अधिक्षक डॉ. प्रवीण मुंढे, जिल्हा क्रीडा अधिकारी मिलींद दिक्षित, श्री. शिव छत्रपती पुरस्कार विजेते डॉ प्रदिप तळवेलकर, नगरसेवक नितिन बर्डे, श्याम कोगटा आदि उपस्थित होते.

यावेळी बोलतांना पालकमंत्री श्री पाटील म्हणाले की, शासनाच्या नवीन निर्देशानुसार जिल्हा व तालुका क्रीडा संकुल उभारणीचा मसुदा नव्याने तयार करण्यात यावा. जिल्ह्यातील 11 तालुक्यांच्या अपूर्ण क्रीडा संकुल बांधकामासाठी वाढीव निधी मागणीचा प्रस्तावही तयार करण्यात याव्यात. जिल्हा क्रीडा संकुलात विविध खेळांच्या सरावासाठी येणाऱ्या खेळाडूंना चांगल्या दर्जाच्या सुविधांबरोबरच चांगले मार्गदर्शक (कोच) उपलब्ध करुन द्यावेत. तसेच खेळाच्या सुविधा वापराचे दर माफक असावे अशी सुचनाही केली. जळगाव जिल्हा कुस्तीसाठी प्रसिध्द आहेत. जिल्ह्यात महाराष्ट्र केसरीसारखे खेळाडू आहेत. जिल्ह्यात अजून चांगले कुस्तीगीर निर्माण होण्यासाठी कुस्तीसाठी कोच मिळण्यासाठी क्रीडा आयुक्तांकडे मागणीचा प्रस्ताव पाठविण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिलेत. ग्रामीण भागातही चांगले खेळाडू तयार व्हावेत याकरीता निधीच्या उपलब्धतेनुसार खुल्या व्यायामशाळांना मंजूरी द्यावी. जिल्ह्यातील तालुका क्रीडा संकुलांचे अपूर्ण कामे पूर्ण होण्यासाठी क्रीडामंत्र्यांशी चर्चा करणार असून जिल्हयात क्रीडा सुविधा उपलब्ध होण्यासाठी अधिकाधिक निधी उपलब्ध करुन देण्यात येईल असेही त्यांनी यावेळी सांगितले.

क्रीडा संकुलातील जुन्या गाळ्यांबाबत निर्णय घेण्यासाठी उपसमिती

जिल्हा क्रीडा संकुलातील जुन्या गाळयांबाबत निर्णय घेण्यासाठी पाच जणांची उपसमिती नेमण्यात यावी असे निर्देश यावेळी पालकमंत्र्यांनी दिलेत. त्याचबरोबर जे गाळेधारक अनेक वर्षांपासून थकबाकीदार आहेत. त्यांचे गाळे बंद आहेत त्यांना रितसर नोटीस देऊन त्यांचे गाळे जप्तीबाबत पुढील कायदेशीर कारवाई करण्याची सुचनाही त्यांनी बैठकीत दिलीत.

बैठकीच्या सुरुवातीस पालकमंत्र्यांनी जिल्हा क्रीडा संकुलास भेट देऊन तेथील परिस्थितीची पाहणी केली. त्यानंतर बैठकीत जिल्ह्यातील क्रीडा संकुलांच्या बांधकामाचा, तेथील साहित्य, खेळाडूच्या सोईसुविधांचा आढावा घेतला. यावेळी क्रीडा संकुलातील कर्मचाऱ्यांचे मानधन, संकुलातील गाळ्यामधील भागीदारीचे नांव रेकॉर्डवरुन कमी करणे, गाळे हस्तांतरण मान्यता, संकुलातील दुरुस्ती व सुविधा, महापालिकेच्या थकीत पाणीपट्टी व मालमत्ता कर आदि विविध विषयांवर या बैठकीत चर्चा करण्यात आली.

मेहरूण तलावावर व्हिडीओ शूट करणाऱ्या तरुण-तरुणींना पोलिसांचा हिसका

0
jalgaon news

जळगाव लाईव्ह न्यूज । १७ मे २०२१ । कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्बंध लागू करण्यात आले असून मेहरूण तलावाच्या काठावर विनापरवानगी तोंडाला मास्क न लावता व्हिडिओ शूट करणाऱ्या तरुण-तरुणींना पोलिसांनी चांगलाच दणका दिला आहे.  एमआयडीसी पोलिसांनी दहा जणांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर कारवाई करीत ४ लाख २५ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

कोरोना असल्याने शासनाने विनाकारण फिरू नये असे आदेश केले आहेत. शासनाने निर्बंध लागू केलेले असताना देखील मेहरूण तलावावर काही तरुण तरुणी व्हिडीओ शूट करीत असल्याची माहिती सहाय्यक अधीक्षक कुमार चिंथा यांना मिळाली असता त्यांनी याबाबत  एमआयडीसी पोलिसांना कळविले.

एमआयडीसी पोलिसांनी केलेल्या कारवाईत व्हिडीओ शूटिंग करताना १) वृशाल नितीन राठोड (वय २० वर्ष रा.सुप्रीम कॉलनी नितीन साहीत्या नगर, जळगाव, मुळ रा.पळासखेड नाईक जिल्हा बुलढाणा) २) मनोज भिका जाय (वय-२० वर्ष रा.धोबी वराड ता.जि.जळगाव ३)सुरज रंज सोनार (वय १९ वर्ष रा.स्वामी समर्थ केंद्राजवळ, रामेश्वर कॉलनी जळगाव), ४)अभिजीत रमेश चव्हाण (वय २५ वर्ष रा. सुप्रीम कॉलनी जळगांव ६) आनंद उर्फ गणेश सोमनाथ भोई (वय २१ वर्ष रा.जुने गाव मेहणबारे ता.चाळीसगांव जि. जळगांव), ६) सचिन चंद्रकांत भिडे (वय २३ वर्ष रा.मशिदीच्या मागे पिंप्राळा जळगांव), ७) गोपाल जगदीश राठोड वय १९ वर्ष रा.धोबी वराड ता.जि. जळगांव), ८) ईश्वर रोहीदास राठोड (वय २२ वर्ष रा.धोबी वराड ता.जि.जळगांव) ९) रीना यशवंत जाधव (वय २० वर्ष रा. शिवकॉलनी, जळगांव), १०) अंकिता शरद बोदडे वय २० रा.जामनेर आयटीआयजवळ राजा कौतिक नगर जि.जळगांव हे घटनास्थळी मिळून आले.

तरुण-तरुणींनी सार्वजनिक ठिकाणी एकत्र येवून व्हीडीओ शूटिंग करतांना मिळुन आले असून त्यांनी सरकारी आदेशाची अवहेलना केल्याने एमआयडीसी पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई केली आहे. पोलिसांनी एक कॅमेरासह १० दुचाकी असा ४ लाख २५ हजारांचा ऐवज जप्त केला आहे.

नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर सावदा पालिकेची धडक कारवाई ; 16 हजारांचा दंड वसूल

0

जळगाव लाईव्ह न्यूज । १७ मे २०२१ । जिल्ह्यात आजपासून लॉकडाउनचे नियम अधिकच कडक केले असताना याच पार्श्वभूमीवर सावदा शहरात देखील नगरपालिकेतर्फे आज अनेक ठिकाणी कार्यवाही करून दंड वसूल करण्यात आला.

आज दी 17 रोजी सकाळी स्वत: मुख्याधिकारी सौरभ जोशी रस्त्यावर उतरले व त्यांनी 11 वाजे नंतर देखील व्यवसाय करणाऱ्या दुकान चालकाना दंडाच्या पावत्या दिल्या. यात 2 जणांना प्रत्येकी 5 हजार तसेच इतर ठीकानी 1 हजार अश्या प्रकारे एकूण 16 हजार रुपये दंड आकारण्यात आला. यावेळी मुख्याधिकारी सौरभ जोशी व पालिका कर्मचारी यांनी ही कार्यवाही केली.

दरम्यान सावदा पोलिसांनी देखील काही ठीकानी कार्यवाही केली यात शहरातील एका मोठा किराणा व्यवसायिकास मोठा दंड आकारण्यात आला असल्याचे समजते, यासर्व कार्यवाही मुळे शहरात व्यवसायिक मध्ये खळबळ उडाली.

जळगाव जिल्ह्यातील अधिकृत कोरोना आकडेवारी : १७ मे २०२१

0
corona

जळगाव लाईव्ह न्यूज । १७ मे २०२१ । गेले काही दिवसांपासून कोरोना संसर्गाची आकडेवारी जळगाव जिल्ह्याला दिलासा देणारी आहे. जिल्ह्यात आज पुन्हा नव्या रुग्णांपेक्षा बरे होणारे रुग्ण अधिक आहे. आज सोमवारी दिवसभरात ६२२ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर ६५२ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहे. रुग्ण कमी होत असताना आता मृताचाही आकडा कमी होत आहे. गेल्या २४ तसा १० जणांचा बळी गेला आहे.

मे महिन्यापासून जळगाव जिल्ह्यातील कोरोनाची स्थिती हळूहळू सुधारू लागली. १४ एप्रिलपासून राज्यात लागू करण्यात आलेल्या लॉकडाउनचा परिणाम आता दिसू लागला आहे. आज सोमवारी प्राप्त अहवालानुसार गेल्या २४ तासांत नवे केवळ ६२२ रुग्ण समोर आले. त्यामुळे एकूण रुग्णसंख्या १ लाख ३५ हजार ७६४ वर पोचली, तर ६५२ रुग्ण दिवसभरात बरे झाले असून, बरे होणाऱ्यांचा आकडा १ लाख २३ हजार ६८१ वर पोचला आहे. दरम्यान,  गेल्या २४ तासांत केवळ ४ हजार २७६ चाचन्याचे अहवाल प्राप्त प्राप्त झाले आहे.  गेल्या २४ तासांत १० बळींची नोंद झाली. त्यामुळे एकूण बळींची संख्या २ हजार ४२७ वर पोचली आहे.

आजची आकडेवारी

जळगाव शहरात ६२, जळगाव ग्रामीण ३४, भुसावळ ७२, अमळनेर २५, चोपडा ४८, पाचोरा २९, भडगाव ११, धरणगाव १७, यावल ६१, एरंडोल २०, जामनेर ३५, रावेर ५८, मुक्ताईनगर १९, बोदवड ३५, चाळीसगाव ५४, पारोळा २७, अन्य जिल्ह्यातील १५.